मनात भाव असला की देव भेटतो, याची वृद्ध महिलेला प्रचिती

सईबाईंना विठुरायांच्या दर्शनाची आस होती (Old Woman get Darshan of Vitthal)

मनात भाव असला की देव भेटतो, याची वृद्ध महिलेला प्रचिती
Follow us
| Updated on: Dec 30, 2020 | 8:48 PM

पंढरपूर (सोलापूर) : मनात भाव असला की देव भेटतो, असं म्हणतात. याची प्रचिती मोहोळ तालुक्यातील एका वृध्द महिलेला आली आहे. कोरोना संसर्गामुळे गेल्या दहा महिन्यांपासून विठुरायाच्या मंदिराचे दरवाजे बंद होते. भाविकांना दर्शन दुर्लभ झाले होते. कोरोनाचे संकट दूर व्हावे आणि माझ्या सावळ्या विठुरायाची भेट व्हावी, अशी इच्छा लाखो विठुभक्तांची होती. पण तरीही दर्शन लांबणीवर पडले. अशाच विठुरायाच्या भेटीसाठी अतुर झालेल्या एका वृद्ध महिलेला दर्शनाची आस होती. या महिलेचं नाव सईबाई बंडगर असं आहे (Old Woman get Darshan of Vitthal).

सईबाईंना विठुरायांच्या दर्शनाची आस होती. त्यांना एकेदिवशी मोहोळ बसस्थानक परिसरात एका विठाई बसवर विठुरायाचे चित्र दिसले. त्याचक्षणी सईबाई बंडगर ही वृध्द महिला बसवरील विठुरायाच्या चरणी लीन झाली. कित्येक दिवस सावळ्या विठुरायाच्या दर्शनाची ती वाट पाहात होती. तिला एसटी बसवरील चित्राच्या रूपात भगवंत भेटला. अगदी मनोभावे तीने एसटीवरील त्या देवाच्या प्रतिमेचे दर्शन घेतले. त्यावेळ एका अनोळखी प्रवाशाने तिचे दर्शन घेतानाचे छायाचित्र टीपले आणि ते सोशल मीडीयावर टाकले. तो फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला.

दोन दिवसापूर्वी सईबाई बंडगर या दर्शनासाठी पंढरपुरात आल्या होत्या. सध्या ऑनलाई पासधारकांनाच मुख दर्शन सुरू असल्याने ती वृध्द महिला मंदिर परिसरात फिरत होती. सोशल मीडीयावर एसटीवरील चित्राचे विठ्ठल दर्शन घेणारी हीच ती महिला असल्याचे काही स्थानिक नागरिकांच्या लक्षात आलं (Old Woman get Darshan of Vitthal).

स्थानिकांनी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांना सांगितले. तीच महिला असल्याची खात्री पटल्यानंतर मंदिर समितीने सईबाई बंडगर या महिलेला विठुरायाचे मुखदर्शन घडवून तिचा यथोचित रुक्मिणी मातेची साडी भेट देवून सत्कार केला. मनात देवाचा भाव असला की, देव भेटतो ही म्हण सईबाई बंडगर या महिलेच्या विठ्ठल दर्शनाने खरी ठरली.

हेही वाचा : राष्ट्रवादीचे नेते मेहबूब शेख भर पत्रकार परिषदेत ढसाढसा रडले, नार्को टेस्टचीही तयारी

Non Stop LIVE Update
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.