AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thakceray : पक्षाची गळती रोखण्यासाठी अखेर ठाकरेंनी घेतला महत्त्वाचा निर्णय, येत्या 20 आणि 25 तारखेला…

Uddhav Thakceray : माजी आमदार राजन साळवी यांनी मागच्या शुक्रवारी ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. चिपळूणचे ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी क्षमतेनुसार आपल्याला संधी मिळाली नाही, अशी खंत व्यक्त केली.

Uddhav Thakceray : पक्षाची गळती रोखण्यासाठी अखेर ठाकरेंनी घेतला महत्त्वाचा निर्णय, येत्या 20 आणि 25 तारखेला...
Uddhav Thackeray
| Updated on: Feb 17, 2025 | 9:50 AM
Share

सत्ताधारी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर सुरु आहे. ठाकरे गटातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करत आहेत. दोनच दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांची आभार सभा झाली. त्यावेळी कोकणातील ठाकरे गटातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने शिवसेनेत प्रवेश केला. आता कोकणात ठाकरे गटाकडे भास्कर जाधव यांच्या रुपाने फक्त एकमेव आमदार उरला आहे. माजी आमदार राजन साळवी यांनी मागच्या शुक्रवारी ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. चिपळूणचे ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी क्षमतेनुसार आपल्याला संधी मिळाली नाही, अशी खंत व्यक्त केली. त्यानंतर ते सुद्धा ठाकरे गटात नाराज असल्याची चर्चा सुरु झाली. भास्कर जाधव यांची खंत दूर करण्यासाठी ठाकरे गटातील नेत्यांनी त्यांच्यासोबत एक बैठक करुन मन वळवण्याचा प्रयत्न केला.

फक्त कोकणच नाही, राज्यभरातील ठाकरे गटाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने शिवसेना आणि भाजपमध्ये प्रवेश करत आहे. विधानसभा निवडणूक 2024 च्या निकालानंतर हे प्रमाण वाढलं आहे. विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला 57 जागांवर विजय मिळवला, तेच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या गटाला फक्त 20 जागा मिळाल्या. एकप्रकारे या निकालाने खरी शिवसेना कोणाकडे आहे? या प्रश्नाच उत्तरही मिळालं. त्यामुळे ठाकरे गटाची साथ सोडून शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करण्याचं प्रमाण वाढलं. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गळती रोखण्यासाठी ठाकरे गट सुद्धा सक्रीय झाला आहे.

दिल्लीत झालेली बैठक

ठाकरे गटाच्या खासदारांची येत्या 20 फेब्रुवारीला तर आमदारांची 25 तारखेला बैठक होणार आहे. खासदार-आमदारांना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. पक्षातील अनेक पदाधिकारी ठाकरेंची साथ सोडत असताना उद्धव ठाकरे यांनी बोलवली आमदार खासदारांची बैठक. दिल्लीत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असताना आदित्य ठाकरे यांनी खासदारांची दिल्लीत बैठक घेतली होती.

बैठक का होतेय?

अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असताना काही खासदार ठाकरेंची साथ सोडणार अशी चर्चा सुरु होती. त्या सोबत ऑपेरेशन टायगर अशा चर्चा सुरु असताना ठाकरे खासदारांची बैठक घेणार आहेत. विधानसभेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आमदारांची बैठक होणार आहे. आगामी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर यां बैठकीत विरोधी पक्ष नेत्याचे नाव निश्चितीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. 20 तारखेला खासदार आणि 25 तारखेला आमदारांना बैठकीला उपस्थित राहण्याचे शिवसेना भवन येथून आदेश देण्यात आले असल्याचे सूत्रांची माहिती.

Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?