AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन; 36 गरजू जोडप्यांचे लग्न

पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी आपला वाढदिवस अनेख्या पद्धतीने साजरा केला आहे. त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त पारनेर तालुक्यातील हंगा गावात सामाजिक बांधिलकी जपत सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते. या सामूहिक विवाह सोहळ्यात 36 गरजू  जोडप्यांची लग्न लावण्यात आली.

निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन; 36 गरजू जोडप्यांचे लग्न
सामूहिक विवाह सोहळा
| Edited By: | Updated on: Mar 11, 2022 | 8:35 AM
Share

अहमदनगर : पारनेरचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी आपला वाढदिवस अनेख्या पद्धतीने साजरा केला आहे. त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त पारनेर (parner) तालुक्यातील हंगा गावात सामाजिक बांधिलकी जपत सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते. या सामूहिक विवाह सोहळ्यात 36 गरजू  जोडप्यांची लग्न लावण्यात आली. या लग्न सोहळ्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची प्रमुख उपस्थिती होती. या सामूहिक विवाह सोहळ्याला शरद पवार यांचं नाव देण्यात आलं होतं. विशेष म्हणजे या विवाह सोहळ्यात 14 दिव्यांग जोडप्याचे लग्न लावण्यात आले. या विवाह सोहळ्याचे जिल्ह्यातूनच नव्हे तर राज्यभरातून कौतुक होत याहे.या लग्न सोहळ्यासाठी भव्य सभामंडप, आकर्षक प्रवेशद्वार, कारंजे, सजवलेला स्टेज तसेच मिरवणुकीसाठी डीजे आणि ढोल पथकाची देखील व्यवस्था करण्यात आली होती.

जोडप्यांना संसारोपयोगी वस्तुंचे वाटप

पारनेर तालुक्यातील हंडा गावात मोठ्या थाटामाटात 36 जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा पार पडलाय. या सामूहिक विवाह सोहळ्याला शरद पवार यांचं नाव देण्यात आलं होतं. तसेच यात 14 दिव्यांग जोडप्यांचा समावेश होता. आमदार निलेश लंके यांनी हा अनोखा उपक्रम राबवून एक नवा आदर्श निर्माण केलाय. अनेक आमदारांचे वाढदिवस मोठ्या दणक्यात साजरे होतात. वाढदिवसावर लाखो रुपयांचा खर्च केला जातो. मात्र लंके यांनी अशा पद्धतीने आपला वाढदिवस साजरा न करता सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले. यावेळी नवविवाहित जोडप्यांना संसारोपयोगी भांडे तसेच वधूसाठी मंगळसूत्र आणि जोडवे देण्यात आले.

शरद पवारांकडून लंकेंचे कौतुक

लंके यांच्या या अनोख्या उपक्रमाला शरद पवार यांची देखील उपस्थिती होती. शरद पवार यांनी निलेश लंके यांच्या कामाचे कौतुक केले आहे. लंके यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सामुहिक विवाहसोहळ्याचे आयोजन केले. या सोहळ्यात विविध जातीधर्मचाे लोक सहभागी झाले. खऱ्या अर्थाने लंके यांनी एकतेचं उदाहरण सर्वांसमोर ठेवल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. दरम्यान यावेळी बोलताना निलेश लंके म्हणाले की, कोरोनामुळे लोक हातबल झाले आहेत. त्यामुळे वाढदिवसानिमित्त काहीतरी समाजोपयोगी काम करायचे असा निर्णय कार्यकर्त्यांच्या बैठकीत झाला होता. यातून सामुहिक विवाहसोहळ्याची कल्पना पुढे आली. या सामुहिक विवाहसोहळ्यामध्ये सर्व जातीधर्मातील जोडपे सहभागी झाले.

संबंधित बातम्या

सोमवार, मंगळवारी मुंबईतल्या काही भागात पाणीपुरवठा बंद, कोणत्या भागाला फटका?

गडचिरोलीत 116 युवक-युवती विवाहबंधनात अडकणार! 16 आत्मसर्मपित नक्षलवाद्यांचा समावेश

परीक्षेचं टेंशन आलंय घाबरू नका! नागपूर विभागातील दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन नंबर

फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.