Virar : विरारमध्ये इमारतीच्या गॅलरीत खेळत होती चिमुरडी, खाली वाकून बघताना तोल गेला अन्…!

केसवानी यांची सहा वर्षांची मुलगी रिजल रविवारी दुपारी गॅलरीत खेळत होती. तर कुटुंबीय घरात आपापल्या कामात व्यस्त होते. खेळता खेळता रिजल गॅलरीतून खाली वाकून बघत होती.

Virar : विरारमध्ये इमारतीच्या गॅलरीत खेळत होती चिमुरडी, खाली वाकून बघताना तोल गेला अन्...!
चौथ्या मजल्यावरुन तोल जाऊन पडल्याने चिमुकलीचा मृत्यू

विरार : इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन तोल जाऊन पडल्याने एका सहा वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास विरारमध्ये घडली आहे. रिजल केसवाणी (6) असे इमारतीतून मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. याबाबत विरार पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून पोलीस तपास करीत आहेत. चिमुकलीच्या मृत्यूमुळे परीसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

गॅलरीत खेळता खेळता खाली वाकून बघताना तोल गेला

विरार पूर्व सहकार नगर येथील गीता अपार्टमेंटमध्ये चौथ्या मजल्यावर केसवाणी कुटुंब वास्तव्यास आहे. केसवानी यांची सहा वर्षांची मुलगी रिजल रविवारी दुपारी गॅलरीत खेळत होती. तर कुटुंबीय घरात आपापल्या कामात व्यस्त होते. खेळता खेळता रिजल गॅलरीतून खाली वाकून बघत होती. यावेळी खाली वाकताना रिजलचा तोल गेला आणि ती चौथ्या मजल्यावरुन खाली कोसळली. या घटनेत रिजलचा जागीच मृत्यू झाला. अचानक घडलेल्या घटनेने केसवाणी कुटुंबियांवर मात्र दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे प्रत्येक पालकांनी आपल्या लहान मुलांना सांभाळणे किती गरजेचे आहे हे स्पष्ट होत आहे. कारण थोडासा निष्काळजी पणा सुद्धा जीवावर बेतू शकतो असे पालिसांनी आवाहन केले आहे.

भिवंडीतही पालकांच्या हलगर्जीपणामुळे एक वर्षाचा मुलाचा मृत्यू

भिवंडीतही पालकांच्या हलगर्जीपणीमुळे एक वर्षाच्या मुलाचा बाथरुममधील बादलीत बुडून मृत्यू झाल्याची घटना गेल्या आठवड्यात घडली होती. आई किचनमध्ये स्वयंपाक बनवत होती तर कुटुंबातील बाकी सदस्य हॉलमध्ये टीव्ही पाहत बसले होते. चिमुकला रांगता रांगता बाथरुममध्ये घुसला. बाथरुममध्ये पाण्याने भरलेल्या बादलीजवळ गेला असता त्याचा तोल जाऊन तो भरलेल्या बादलीत पडला. कुटुंबातील कुणाचे त्याच्याकडे लक्ष नव्हते. त्यामुळे पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली होती. (A 6-year-old girl died after falling from the fourth floor of a building in Virar)

इतर बातम्या

Pune crime| पुण्यात हेअर स्पा करण्यासाठी आलेल्या तरुणीबरोबर कर्मचाऱ्याने केलं असं काही की …

Nashik Gas Leakage|गॅसच्या भडक्याने काचा फुटल्या, दरवाजा तुटला, 6 जण होरपळले!

Published On - 9:10 pm, Mon, 10 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI