VIDEO: बुलडाण्यात बीएसएनएलच्या टॉवरवर चढलेल्या व्यक्तीचा साडे पाच तास थरार, नेमकं काय घडलं?

बुलडाण्यात बीएसएनएलच्या टॉवरवर चढलेल्या एका व्यक्तीनं जवळपास 5-6 तास अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवला. संबंधित व्यक्ती बुलडाणा शहरातील BSNL कार्यालयाच्या टॉवरवर चढला.

VIDEO: बुलडाण्यात बीएसएनएलच्या टॉवरवर चढलेल्या व्यक्तीचा साडे पाच तास थरार, नेमकं काय घडलं?


बुलडाणा : बुलडाण्यात बीएसएनएलच्या टॉवरवर चढलेल्या एका व्यक्तीनं जवळपास 5-6 तास अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवला. संबंधित व्यक्ती बुलडाणा शहरातील BSNL कार्यालयाच्या टॉवरवर चढत जीव देण्याचा इशारा दिला. त्यामुळे आता ही व्यक्ती आपल्या जीवाचं तर बरंवाईट करुन घेणार नाही ना या शंकेनं आणि शक्यतेनं आजूबाजूच्या सर्वांमध्ये भीती तयार झाली. यानंतर अनेकांनी या व्यक्तीला खाली उतरण्याची विनंती केली, पण या व्यक्तीने खाली येण्यास नकार दिला. हा सर्व प्रकार 5-6 तास सुरू होता. या व्यक्तीचं नाव संजय लक्ष्मण जाधव असं आहे. ही 55 वर्षीय व्यक्ती मिलींद नगरमधील रहिवासी आहे.

संजय जाधव हा व्यक्ती सोमवारी सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास बुलडाण्यातील बीएसएनएलच्या टॉवरवर चढला. यानंतर तब्बल साडेपाच तासानंतर म्हणजेच रात्री साडे नऊ वाजता त्याला खाली उतारवण्यात प्रशासनाला यश आलं. यावेळी बघ्यांची भली मोठी गर्दी झाली होती. बुलडाणा शहरात कोर्टासमोर असलेल्या BSNL कार्यालयाच्या आवारात असलेल्या जवळपास 300 फुटापेक्षा अधिक उंच टॉवरवर संजय जाधव अचानक चढला. त्यामूळे प्रशासनाची एकच तारंबळ उडाली.

टॉवरवर चढण्याचं कारण काय?

टॉवरवर चढलेल्या व्यक्तीला पाहण्यासाठी टॉवरखाली शहरवासियांनी एकच गर्दी केली. ही व्यक्ती नेमकी कशामुळे या उंच टॉवरवर चढली असाही प्रश्न अनेकांना पडला. मात्र, आता समोर आलेल्या माहितीनुसार या व्यक्तीने घरगुती वादातून वैतागून टॉवरवर चढत आत्महत्येचा इशारा दिला. मात्र, प्रशासनाने योग्यवेळी हस्तक्षेप करत त्याला खाली उतरवण्याचा पुरेपूर प्रयत्न आला.

अखेर साडेपाच तासानंतर प्रशासनाला यात यश आलं. शेवटी रात्री साडे 9 वाजता संजय जाधव या व्यक्तीला टॉवरवरुन खाली उतरवण्यात आलं. यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन शहर ठाण्यात नेले, अशी माहिती ठाणेदार प्रदीप साळुंके यांनी दिली.

संबंधित व्हिडीओ पाहा :

हेही वाचा :

बाळाची हत्या करुन आईची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लिहिलं…

फार्मसीचे शिक्षण घेणाऱ्या 19 वर्षीय विद्यार्थ्याची औरंगाबादेत आत्महत्या

लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात, औरंगाबादमध्ये तरुणाची राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या

A person climb on BSNL tower for suicide attempt in Buldhana

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI