अकोल्यात जातीचे खोटे प्रमाणपत्रावर महाबीजमध्ये नोकरी मिळवणाऱ्या 11 अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई

बोगस प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवून शासनाची दिशाभूल करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्याकडून व्याजासह पैसे वसुल करावे तसेच रिक्त झालेल्या जागेवर लवकरात लवकर नवीन पदभरती करून आदिवासी प्रवर्गातील उमेदवारांना न्याय द्यावा अशी मागणी महाबीजचे माजी केंद्र अभियंता तथा अकोला येथील सामाजिक कार्यकर्ता राजेश भगत यांनी केली आहे.

अकोल्यात जातीचे खोटे प्रमाणपत्रावर महाबीजमध्ये नोकरी मिळवणाऱ्या 11 अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई
महाबीज कंपनी
Follow us
| Updated on: Mar 06, 2022 | 9:10 PM

अकोला : जातीच्या खोट्या प्रमाणपत्रा (Fake Cast Certificate)च्या आधारावर महाबीज (Mahabeej)मधील नोकरी मिळवणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांच्याविरुध्द महाबीजने कठोर कारवाई केली आहे. महाबीजच्या प्रशासनाने अशा प्रकारच्या विविध पदावर कार्यरत असणाऱ्या एकूण 11 अधिकारी कर्मचारी यांच्याविरुध्द माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या आधारावर कठोर कारवाई केली आहे. यामध्ये नागपूर येथील जिल्हा व्यवस्थापक गणेश महादेव चिरुटकर, गडेगाव भंडारा येथील कनिष्ठ प्रशासन सहाय्यक भिमराव मारोतराव हेडाऊ, शिवनी अकोला येथील तर कनिष्ठ प्रशासन सहाय्यक एम. एन. गावंडे, हिंगोली केंद्र व्यवस्थापक राजेंद्र जुनघरे, परभणी येथील घावट, जालना येथील आणि शिपाई अजापसिंग घुसिंगे यासह एकूण 11 कर्मचारी अधिकारी यांचा समावेश आहे. कार्यालयीन आदेशाद्वारे महाबीजने खोटे प्रमाणपत्र लावून नोकरी बळकावणाऱ्या विरुध्द रितसर कारवाई करण्यात आली आहे. (Action against 11 officers and employees who got jobs in Mahabeej on fake caste certificate in Akola)

बोगस प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवून शासनाची दिशाभूल

बोगस प्रमाणपत्राच्या आधारावर महाबीजमध्ये नोकरी मिळवल्याची बाब महाबीज प्रशासनाला माहित झाल्यानंतर महाबीज प्रशासनाने अनेक वर्ष कुठल्याही प्रकारची ठोस अथवा दंडात्मक कारवाई केली नव्हती. परंतु महाबीज बहुजन कर्मचारी अधिकारी संघटना नागपूर यांचे निवेदन व सर्वोच्च न्यायालयाचा निकाल यामुळे महाबीज प्रशासनाला कारवाई करणे भाग पडले आहे. बोगस प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवून शासनाची दिशाभूल करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्याकडून व्याजासह पैसे वसुल करावे तसेच रिक्त झालेल्या जागेवर लवकरात लवकर नवीन पदभरती करून आदिवासी प्रवर्गातील उमेदवारांना न्याय द्यावा अशी मागणी महाबीजचे माजी केंद्र अभियंता तथा अकोला येथील सामाजिक कार्यकर्ता राजेश भगत यांनी केली आहे.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत मोठा अपहार

गोरगरिबांची बँक अशी ओळख असलेल्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माढा तालुक्यातील पिंपळनेरच्या शाखेत येथील 55 ग्राहकांच्या खात्यातून त्यांच्या परस्पर 78 लाख 19 हजार 529 रुपये काढून बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी शाखाधिकाऱ्यासह चौघांवर कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. विशेष म्हणजे खातेदारांच्या खोट्या सह्या व अंगठे करुन त्यांचे नावे पैसै काढल्याची खोटी वाऊचर तयार केली आहेत. खोटी व बनावट दस्तऐवज तयार करुन ठकबाजी करुन 55 खातेदारांच्या खात्यातून परस्पर रक्कमा काढल्या आहेत. तसेच मुदत ठेव पावत्या देखील बोगस तयार केल्याचे समोर आले आहे. (Action against 11 officers and employees who got jobs in Mahabeej on fake caste certificate in Akola)

इतर बातम्या

Malegaon Accident : मालेगावात टेम्पोचा भीषण अपघात, 4 जण जागीच ठार तर 15 जखमी, घटना कशी घडली?

Nalasopara Crime : नालासोपाऱ्यात तीन वर्षांच्या चिमुरड्यासह पित्याचा लोकलखाली आत्महत्येचा प्रयत्न

Non Stop LIVE Update
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.