Nalasopara Crime : नालासोपाऱ्यात तीन वर्षांच्या चिमुरड्यासह पित्याचा लोकलखाली आत्महत्येचा प्रयत्न

नालासोपारा पूर्वेला वाघेला कुटुंबीय राहतात. राजीव वाघेला यांनी रविवारी पहाटे 5 वाजून 11 मिनिटांनी विरार चर्चगेट लोकल खाली उडी घेत आपला तीन वर्षाचा मुलगा कृष्णा वाघेला याच्यासह आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. यात दुर्दैवाने तीन वर्षाचा लहानगा कृष्णा वाघेला हा मयत झाला असून, राजीव वाघेला याची स्थिती चिंताजनक आहे.

Nalasopara Crime : नालासोपाऱ्यात तीन वर्षांच्या चिमुरड्यासह पित्याचा लोकलखाली आत्महत्येचा प्रयत्न
महावितरणचा भोंगळ कारभार दोन भावंडांच्या जीवावर बेतलाImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 06, 2022 | 5:36 PM

नालासोपारा : नालासोपारा आणि वसई रेल्वे स्थानकादरम्यान एका पित्याने आपल्या तीन वर्षाच्या चिमुरड्यासह लोकल (Local) ट्रेनखाली येवून आत्महत्ये (Suicide)चा प्रयत्न केला असल्याची धक्कादायक घटना रविवारी पहाटे घडली आहे. यात पिता गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक (Critical) आहे. तर तीन वर्षाच्या चिमुरड्याचा यात मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. राजीव वाघेला असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या पित्याचे नाव असून, कृष्णा वाघेला असे मयत झालेल्या 3 वर्षाच्या चिमुरड्याचे नाव आहे. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. पोलिस याबाबत अधिक तपास करीत आहेत. (Man attempts suicide with three-year-old son in Nalasopara)

आत्महत्येचे कारण अद्याप अनभिज्ञ

नालासोपारा पूर्वेला वाघेला कुटुंबीय राहतात. राजीव वाघेला यांनी रविवारी पहाटे 5 वाजून 11 मिनिटांनी विरार चर्चगेट लोकल खाली उडी घेत आपला तीन वर्षाचा मुलगा कृष्णा वाघेला याच्यासह आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. यात दुर्दैवाने तीन वर्षाचा लहानगा कृष्णा वाघेला हा मयत झाला असून, राजीव वाघेला याची स्थिती चिंताजनक आहे. त्याला नालासोपारा येथील रुग्णालयात अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं आहे. राजीव वाघेलानं आपल्या मुलासोबत आत्महत्या का केली याबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही. मात्र कौटुंबिक कारणामुळे त्याने हे पाउल उचलं असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

रत्नागिरीत पेपर कठिण गेला म्हणून बारावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

सध्या राज्यात बारावीची परीक्षा सुरु आहे. बारावीचा इंग्रजीचा पेपर कठिण गेल्याने नैराश्येतून एका विद्यार्थिनीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना रत्नागिरीत घडली आहे. वैष्णवी श्रीनाथ असे मयत विद्यार्थिनीचे नाव असून ती सामाजिक उपक्रमातही सक्रिय होती. रत्नागिरीतील संकल्पनगरमध्ये वैष्णवी आपल्या आई-वडिलांसोबत राहत होती. वैष्णवीचा 4 मार्च रोजी इंग्रजीचा पेपर होता. हा पेपर कठिण गेल्याने वैष्णवी अस्वस्थ होती. वैष्णवीच्या वडिलांचा भाजी विक्रीचा व्यवसाय आहे. शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे ते मुलासह भाजीच्या दुकानात निघून गेले. घरी आई आणि वैष्णवी दोघीच होत्या. अभ्यास करण्यासाठी खोलीत जाते असे सांगून वैष्णवी खोलीत निघून गेली. मात्र बराच वेळ झाला तरी वैष्णवी बाहेर आली नाही म्हणून आईने खोलीत जाऊन पाहिले असता वैष्णवीने गळफास घेतल्याचे दिसले. या घटनेची नोंद रत्नागिरी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. (Man attempts suicide with three-year-old son in Nalasopara)

इतर बातम्या

Satara Murder : साताऱ्यात एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीची हत्या, आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

अमरावती पोलिसांची मोठी कारवाई! धाडीत 10 किलो सोने सापडले, रोख रक्कमही जप्त

Non Stop LIVE Update
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.