वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी चोरी, खून, दरोडे; सांगलीतील पाटील टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई

सांगलीतील चार कुख्यात गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. सांगलीतील पाटील टोळीवर पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. यामध्ये पाटील टोळीचा म्होरक्या करण रामा पाटीलसह आणखी चार जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी चोरी, खून, दरोडे; सांगलीतील पाटील टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई
पाटील टोळीवर मोक्काअंतर्गत कारवाई

सांगली : सांगलीतील चार कुख्यात गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. सांगलीतील पाटील टोळीवर पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. यामध्ये पाटील टोळीचा म्होरक्या करण रामा पाटीलसह आणखी चार जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

सांगली शहरातल्या संजयनगर, विश्रामबाग आणि कुपवाड परिसरातील सराईत गुन्हेगार करण रामा पाटील यांच्या पाटील टोळीने वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी दहशत निर्माण करत खुनी हल्ला, चोरी, लूटमार, दरोडा यांसारखे 23 गंभीर गुन्हे केले आहेत.

सांगलीतील पाटील टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई

पाटील टोळीचा म्होरक्या करण रामा पाटील (वय 22) राहणार कुपवाड याच्यासह विकास गोसावी, आकाश जाधव, अमोल साठे या सर्व जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

विशेष पोलीस महानिरीक्षकांकडून तातडीने प्रस्ताव मंजूर

सांगली जिल्हा पोलिस अधीक्षक दिक्षित कुमार गेडाम याच्या आदेशानुसार सांगली शहर पोलीस निरीक्षक अजय सिद्कर यांनी प्रस्ताव तयार करून कोल्हापूर परीक्षेत्रातील विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला. तो प्रस्ताव तातडीने मंजूर करण्यात आला. आधिक तपास डीवायएसपी अजित टिके करत आहेत.

सांगलीच्या तासगावमधील रहस्यमय खुनाचा उलगडा, पती-पत्नीस बेड्या

दुसरीकडे, सांगलीच्या तासगाव येथे जेसीबी मालक हरी पाटील यांचा निर्घृण खून करून मृतदेह विहिरीत टाकून देण्यात आला होता. या रहस्यमय खुनाचा उलघडा स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने केला आहे. जेसीबीवरील ऑपरेटर आणि त्याच्या पत्नीस अटक करण्यात आली आहे. अनैतिक संबंधातूनच हा खून झाल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले होते. तसेच मृतदेह दोन दिवस घरी ठेवून मग विल्हेवाट लावण्यात आली होती, अशी माहिती समोर आली आहे.

(Action under Mocca on Patil gang in maharashtra Sangli Crime News)

हे ही वाचा :

Video : प्रवाशांची नजर चुकवायच्या, मौल्यवान वस्तू लंपास करायच्या, 7 महिलांची टोळी पोलिसांकडून जेरबंद

भोसरी पोलीस स्थानकात किरण गोसावी विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल; परदेशात नोकरी देण्याच्या बहाण्याने घातला लाखोंना गंडा

Published On - 10:48 am, Fri, 12 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI