AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कष्टाने जमवलेले दागिने दरडीखाली गेले, पूरग्रस्त पूजा चव्हाणच्या लग्नाचा खर्च दीपाली सय्यद उचलणार

पोलादपूर तालुक्यातील साखर सुतारवाडी येथील पूरग्रस्त पूजा चव्हाणच्या लग्नाची जबाबदारी घेतली आहे. दीपाली सय्यद त्यांच्या चँरिटेबल ट्रस्टतर्फे पूजाच्या लग्नाचा खर्च उचलणार आहेत.

कष्टाने जमवलेले दागिने दरडीखाली गेले, पूरग्रस्त पूजा चव्हाणच्या लग्नाचा खर्च दीपाली सय्यद उचलणार
DEEPALI SAYED
| Edited By: | Updated on: Aug 08, 2021 | 10:22 PM
Share

रायगड : सोसाट्याचा पाऊस आणि पुरामुळे महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले. पूरग्रस्तांना पुन्हा उभं राहण्यासाठी अनेकांनी सढळ हाताने मदत केली. अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी पूरग्रस्तांना यापूर्वी तब्बल 10 कोटींची मदत जाहीर केली होती. या मदतीनंतर दीपाली सय्यद यांनी आणखी एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी पोलादपूर तालुक्यातील साखर सुतारवाडी येथील पूरग्रस्त पूजा चव्हाणच्या लग्नाची जबाबदारी घेतली आहे. दीपाली सय्यद त्यांच्या चँरिटेबल ट्रस्टतर्फे पूजाच्या लग्नाचा खर्च उचलणार आहेत. (Actress Deepali Syed has taken responsibility of marriage of  flood affected girl Pooja Chavan)

जमवलेले दागिने दरडीखाली गेले

मागील काही दिवसांपूर्वी पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पावसाने हाहा:कार माजवला. यामध्ये कोट्यवधीचे नुकसान तर झालेच पण प्रचंड जीवितहानी झाली. या पुरामुळे अनेकांची घरं उद्धवस्त झाली. पोलादपूर तालुक्यातील साखर सुतारवाडी येथील पूजा चव्हाण या मुलीचे लग्न होते. पूजाच्या लग्नासाठी तिच्या घरच्यांनी काही दागिने जमवले होते. हे सर्व दागिने पूजाच्या आई-वडिलांनी शेजारी राहणाऱ्या भरत सुतार यांच्या घरात ठेवले होते. मात्र, पावसामुळे सुतार यांच्या घरावर दरड कोसळली आणि यातच पूजाच्या लग्नासाठी ठेवलेले सर्व दागिने दबून गेले.

पूजाच्या लग्नाचा खर्च दीपाली सय्यद करणार 

दीपाली सय्यद मागील काही दिवसांपासून पूरग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. यावेळी आज त्यांनी साखर सुतारवाडी येथे भेट दिली. तसेच येथे सय्यद यांनी दरडग्रस्त घरांची पहाणी केली. ही पाहणी करत असताना सय्यद यांना पूजा चव्हाणसोबत घडलेला प्रकार समजला. त्यानंतर सय्यद यांनी पुजा चव्हाण तसेच आईची भेट घेतली. या भेटीनंतर पूजाच्या लग्नाचा सर्व खर्च उचल्याची घोषणा केली. अभिनेत्री दीपाली सय्यद चँरिटेबल ट्रस्टतर्फे पुजा चव्हाणच्या लग्नाचा सर्व खर्च उचलला जाणार आहे.

इतर बातम्या :

Tokyo Olympics 2021 : टोक्यो ऑलिम्पिकची सांगता, भारताकडून बजरंग पुनियाने फडकावला तिरंगा!

देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर दिल्लीत दाखल; दिल्ली दरबारी भाजपची काय खलबतं होणार?

Pune Unlock : व्यापाऱ्यांच्या आक्रमकतेनंतर अखेर पुण्यातील कोरोना निर्बंधांत शिथिलता! काय सुरु, काय बंद?

(Actress Deepali Syed has taken responsibility of marriage of  flood affected girl Pooja Chavan)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.