कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी अहमदनगर सज्ज, वीकेंड लॉकडाऊन लागू, नवी नियमावली काय?

नगर जिल्हा हा कारोना संसर्गाच्या तिसऱ्या लेवलमध्ये आहे. त्यानुसार उद्यापासून नवीन निर्बंध जिल्ह्यात लागू केले जाणार आहे. (Ahmednagar District Administration order to new restriction)

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी अहमदनगर सज्ज, वीकेंड लॉकडाऊन लागू, नवी नियमावली काय?
Corona

अहमदनगर : महाराष्ट्रात अनलॉक केल्यानंतर काही शहरांमध्ये पुन्हा कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. याशिवाय कोरोनाच्या डेल्टा प्लस या व्हेरिएंट्सचा धोकादेखील वाढताना दिसत आहे. यामुळे प्रशासन आणि सरकार पुन्हा एकदा बॅकफूटवर आलं आहे. या पार्श्वभूमीवर अहमदनगरमध्ये उद्यापासून नवीन नियमावली लागू करण्यात येणार आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी ही नवी नियमावली तयार करण्यात आली आहे. नुकतंच अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी याबाबतचा आदेश जारी केला आहे. (Ahmednagar District Administration order to new restriction amid corona pandemic third wave)

नगर जिल्हा कारोना संसर्गाच्या तिसऱ्या लेवलमध्ये 

अहमदनगरचे जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, नगरमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका हळहळू वाढत आहे. या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी उद्यापासून नवीन नियमावली लागू केली जाणार आहे. नगर जिल्हा हा कारोना संसर्गाच्या तिसऱ्या लेवलमध्ये आहे. त्यानुसार उद्यापासून नवीन निर्बंध जिल्ह्यात लागू केले जाणार आहे.

दिवसभर जमावबंदी लागू

अहमदनगरमध्ये शनिवारी आणि रविवार मेडिकल दुकान वगळता सर्व दुकाने बंद राहणार आहेत. तर इतर दिवशी सर्व आस्थापना आणि दुकाने सुरू राहतील. मात्र यासाठी सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंतची वेळ निश्चित करण्यात आली आहे, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्याशिवाय नगरमध्ये वीकेंड लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. तसेच संध्याकाळी 5 नंतर संचारबंदी लागू केली जाणार आहे. तर त्या आधी दिवसभर जमावबंदी लागू असेल.

सोमवारपासून नवे निर्बंध काय?

  • शनिवारी आणि रविवारी मेडिकल वगळता सर्व बंद राहणार
  • इतर दिवशी सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत सर्व आस्थापना आणि दुकाने सुरू राहणार
  • अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने दुपारी 5 वाजेपर्यंत खुली
  • सायंकाळी 4 नंतर संचारबंदी लागू, त्या आधी दिवसभर जमावबंदी
  • विवाहासाठी 50 तर अंत्यविधीसाठी 20 जण उपस्थितीत राहण्यास परवानगी
  • हॉटेल 50 टक्के क्षमतेने सुरु
  • सार्वजनिक वाहतूक 100 टक्के सुरू
  • शनिवार व रविवार सर्व बंद

(Ahmednagar District Administration order to new restriction amid corona pandemic third wave)

संबंधित बातम्या : 

अमरावतीत कोरोनाचा धोका वाढला, जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांच्या वेळेत बदल, ‘या’ वेळेत राहणार सुरु

मोठी बातमी ! पुण्यात संध्याकाळी 5 नंतर संचारबंदी लागू, दुकानं 4 वाजेपर्यंतच सुरु राहणार, नवी नियमावली जारी

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका, मॉल्स बंद, दुकानं 4 वाजेपर्यंत सुरु, सोमवारपासून नागपुरात नवे निर्बंध

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI