AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमरावतीत कोरोनाचा धोका वाढला, जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांच्या वेळेत बदल, ‘या’ वेळेत राहणार सुरु

महाराष्ट्रात अनलॉक केल्यानंतर काही शहरांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा हळूहळू वाढू लागली आहे. याशिवाय कोरोनाच्या डेल्टा प्लस या व्हेरिएंट्सचा धोकादेखील वाढताना दिसत आहे.

अमरावतीत कोरोनाचा धोका वाढला, जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांच्या वेळेत बदल, 'या' वेळेत राहणार सुरु
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Jun 26, 2021 | 10:51 PM
Share

अमरावती : महाराष्ट्रात अनलॉक केल्यानंतर काही शहरांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा हळूहळू वाढू लागली आहे. याशिवाय कोरोनाच्या डेल्टा प्लस या व्हेरिएंट्सचा धोकादेखील वाढताना दिसत आहे. त्यामुळे प्रशासन आणि सरकार पुन्हा एकदा बॅकफूटवर आलं आहे. त्यामुळे सोमवारपासून (28 जून) अमरावतीत नवीन निर्बंध लागू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. सोमवारपासून अमरवातीत जीवनावश्यक व बिगर जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांची वेळ आता सकाळी 7 ते दुपारी 4 अशी करण्यात आली आहे. केवळ याच कालावीत दुकानं सुरु राहणार आहेत. (Corona threat increases in Amravati, Changes in the timing of grocery stores)

बिगर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वीकेंडला बंद ठेवली जातील. तर सर्व प्रकारच्या जिवनावश्यक वस्तू व अत्यावश्यक असलेली किराणा दुकाने, भाजीपाल्याची दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी, मिठाई, खाद्य पेय विक्रेत्यांची दुकाने, पिठाची गिरणी, इत्यादी सर्व प्रकाराची खाद्य पदार्थ विक्रीची दुकाने (कोंबडी, मटण, पोल्ट्री मासे व अंडी यांसह) दुग्ध विक्री केंद्रे, दुग्धालय, डेअरी, दूध संकलन केंद्र, दूध वितरण व्यवस्था सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु राहील.

कृषीसंबंधित दुकानं 7 ते 4 या वेळेत सुरु

पाळीव प्राण्यांच्या खाद्यपदार्थांची विक्री करणारी दुकानं, कृषी सेवा केंद्रे, कृषी निविष्ठांची दुकाने, कृषी प्रक्रिया उद्योगगृहे, शेती अवजारे आणि शेतातील उत्पादनांशी संबंधित दुकाने, सर्व प्रकारची बिगर जीवनावश्यक सेवाअंतर्गत असलेली दुकाने, प्रतिष्ठाने, कृषी संबंधित सर्व प्रकारची कामे, बांधकामे, सर्व प्रकारची शासकीय रास्त भाव दुकाने सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील.

रविवारी लसीकरण बंद

दरम्यान, अमरावतीकरांना प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे की, 27 जून रोजी (रविवारी) शहरातील कोव्हिड-19 लसीकरण बंद राहील. सोमवारपासून (28 जून) लसीकरण होणार की नाही, झाल्यास ते कोणत्या वेळेत होईल, याबाबतच्या सूचना लवकरच देण्यात येतील असेही सांगण्यात आले आहे.

सोमवारपासून नागपुरात नवे निर्बंध

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता आणि राज्यात काही ठिकाणी कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटचे रुग्ण आढळून आल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी निर्बंध कठोर करण्यात आलेले आहेत. त्यानुसारच राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी नवे निर्बंध लागू केले आहेत. हे निर्बंध सोमवार 28 जून ते 5 जुलैपर्यंत लागू राहणार आहेत.

नवे निर्बंध

  • सर्व दुकाने दुपारी चार वाजेपर्यंत खुली राहणार
  • मॉल्स बंद
  • हॉटेल आणि रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेने दुपारी चार वाजेपर्यंत खुली राहणार
  • लग्नकार्य 50% क्षमतेने किंवा पन्नास लोकांमध्येच करता येणार
  • जिम, सलून, स्पा दुपारी चार वाजेपर्यंत खुले राहणार
  • अंतयात्रेला केवळ 20 लोकांना परवानगी असणार
  • स्विमिंग पूल बंद असणार

इतर बातम्या

मोठी बातमी ! पुण्यात संध्याकाळी 5 नंतर संचारबंदी लागू, दुकानं 4 वाजेपर्यंतच सुरु राहणार, नवी नियमावली जारी

नागपुरात कोरोना लसीकरणाला तुफान प्रतिसाद, एकाच दिवसात तब्बल 42 हजार नागरिकांचे लसीकरण

नागपूरच्या ‘त्या’ हत्याकांडातले महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती, हत्यारा आणि मेहुणीच्या कनेक्शननं पोलीस चक्रावले, आता डीएनए टेस्ट होणार

(Corona threat increases in Amravati, Changes in the timing of grocery stores)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.