अकोल्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला, अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी मुख्यालय सोडू नका, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

अकोला शहरासह जिल्ह्यातही गुरुवारी धुवाँधार पाऊस पाहायला मिळाला. त्यामुळे सर्वत्र हाहा:कार उडाला आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

अकोल्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला, अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी मुख्यालय सोडू नका, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
Maharashtra Rain (फोटो प्रातनिधिक)

अकोला : राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. अकोला शहरासह जिल्ह्यातही गुरुवारी धुवाँधार पाऊस पाहायला मिळाला. त्यामुळे सर्वत्र हाहा:कार उडाला आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर पुढील आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मुख्यालय न सोडण्याचे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले आहे. (Akola heavy rain Many villages connection lost district collector order not leave the headquarters)

अनेक तालुक्यात पावसाचा तडाखा

अकोला शहरासह जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या धुव्वाधार पाऊस झाला आहे. यामुळे सर्वत्र हाहाकार उडाला आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शुक्रवारी पुन्हा जिल्हातल्या अकोला, मूर्तिजापूर, अकोट, तेल्हारा तालुक्यात पावसाचा तडाखा बसला आहे. तसेच अनेक तालुक्यातील गावांचा संपर्क तुटला असून तेल्हारा तालुक्यातील नाल्याला पूर आला आहे. त्यामुळे तेल्हारा-पाथर्डीमार्गे अकोट आणि तेल्हारा-वरवटचा संपर्क तुटला आहे.

लोकांच्या घरांमध्ये पाणी

अकोला जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती आणि पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच शहरात आणि ग्रामीण भागात नदी नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळे लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पावसाच्या पाण्याने जिल्हातील शेतीचे 4249 हेक्टर क्षेत्र खरडले आहे. सध्या या जिल्ह्यात पाऊस सातत्याने सुरु आहे. त्यामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

पुढील आदेशापर्यंत मुख्यालय न सोडण्याचे आदेश

अकोल्यातील अतिवृष्टी आणि पूरपरिस्थिती पाहता सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुढील आदेशापर्यंत मुख्यालय न सोडण्याचे निर्देश दिले आहे. अकोला जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी ही आदेश दिले आहे.

(Akola heavy rain Many villages connection lost district collector order not leave the headquarters)

संबंधित बातम्या : 

मृत्यूनंतरही ससेहोलपट, गावाला स्मशानभूमी नाही, दुसऱ्या गावात जाऊन अंत्यसंस्कार, असं कुठंवर चालायचं?

Video : वीर धरणातून 21 हजार 505 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग, नीरा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Satara Rain | साताऱ्यात ढगफुटीसदृश्य पाऊस, महाबळेश्वरमध्ये विक्रमी पावसाची नोंद, कोणत्या धरणातून किती पाण्याचा विसर्ग?

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI