AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मृत्यूनंतरही ससेहोलपट, गावाला स्मशानभूमी नाही, दुसऱ्या गावात जाऊन अंत्यसंस्कार, असं कुठंवर चालायचं?

सातारा शहराजवळच असणाऱ्या मौजे शेळकेवाडीमध्ये शासन आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे लोकांची मृत्यू नंतरही ससेहोलपट चालू आहे. गावाला स्वतःची स्मशान भूमी नसल्याने दुसऱ्या गावात जाऊन अंत्यसंस्कार करावे लागत आहेत.

मृत्यूनंतरही ससेहोलपट, गावाला स्मशानभूमी नाही, दुसऱ्या गावात जाऊन अंत्यसंस्कार, असं कुठंवर चालायचं?
साताऱ्याच्या शेळकेवाडीत स्मशानभूमी नसल्याने सोनगावात येऊन अंत्यसंस्कार करावे लागतात.
| Edited By: | Updated on: Jul 24, 2021 | 9:18 AM
Share

सातारा : शहराजवळच असणाऱ्या मौजे शेळकेवाडीमध्ये शासन आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे लोकांची मृत्यूनंतरही ससेहोलपट चालू आहे. गावाला स्वतःची स्मशान भूमी नसल्याने दुसऱ्या गावात जाऊन अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. शेळकेवाडीत स्मशानभूमी नसल्याने त्यांना जवळच्या सोनगावमध्ये अंत्यसंस्कारासाठी यावं लागतं.

इथे ओशाळला मृत्यू…

शेळकेवाडीत स्मशानभूमी नसल्याने तिथून मृतदेह सोनगावमध्ये आणला गेला आणि सोनगावच्या सरपंचांच्या सहकार्याने सोनगावच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.पण निसर्गाच्या कोपामुळे सदर अंत्यविधी अर्धवट झालेला असताना नदीचे पाणी वाढले आणि अर्धवट अवस्थेत जळालेल्या प्रेत नदीत वाहून जाऊ लागलं.

पुन्हा वाहत्या पाण्यातून मृतदेह काढून अंत्यविधी करण्यात आला. हा अंत्यविधी पाणी नसलेल्या जागी करण्यात आला. पणअंत्यविधीची जागा सध्या पाण्याखाली गेलीय, म्हणजेच आता तिथे रक्षाविसर्जन होऊ शकत नाही.

गावाला स्मशानभूमी बांधून द्या, मृत्युनंतर होणारी विटंबना थांबवा

गावाला स्मशानभूमी नसल्याने मौजे शेळकेवाडी येथील जनता त्रस्त असून झालेल्या गोष्टीस प्रशासन जबाबदार आहे, अशी गावातील लोकांची तक्रार आहे. प्रशासनाने हक्काची स्मशानभूमी उपलब्ध करून द्यावी आणि मृत्युनंतर होणारी विटंबना थांबवावी, अशी जनभावना गावातील लोकांची आहे.

साताऱ्यात कृष्णेचं पाणी स्मशानभूमीत, मृतदेह निम्म्या जळालेल्या अवस्थेत पाण्यात

सातारा जिल्ह्यात संगम माहुली येथे कृष्णा नदीला आलेल्या पुराचं पाणी थेट कैलास स्मशानभूमीमध्ये शिरलं आहे. त्यामुळे अंत्यसंस्कार होत असलेले निम्मी अर्धी जळालेले मृतदेह पाहून कर्मचाऱ्यांची मोठी धांदल उडाली.

साताऱ्यातील संगम माहुली येथे अचानक स्मशानभूमीत पाणी आल्यानं नुकताच अंत्यसंस्कार केलेल्या मृतदेहांपर्यंत पाणी पाहचलं. त्यामुळे निम्मे अर्धे जळालेले मृतदेह पाहून येथील कर्मचाऱ्याची धांदल उडाली. पुराच्या पाण्यानं जळणारे मृतदेह विझण्याची शक्यता आहे. मात्र, व्यवस्थापन या मृतदेहांवरील अंत्यसंस्कार पूर्ण व्हावेत यासाठी प्रयत्न करत आहे. असं असलं तरी पाऊस मोठ्या प्रमाणात असल्याकारणाने त्यांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागत आहे.

(Satara Shelkewadi village has no cemetery, go to Songaon village for cremation)

संबंधित बातमी :

VIDEO: साताऱ्यात कृष्णेचं पाणी थेट स्मशानभूमीत, मृतदेह निम्मी अर्धी जळालेल्या स्थितीत पाहून कर्मचाऱ्यांची धांदल

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.