Gopichand Padalkar | गोपीचंद पडळकर यांच्यासह भावावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा, फसवणूक केल्याचाही आरोप

भाजप नेते तथा आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर फसवणूक आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यासोबत पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांच्यावरदेखील फिर्यादीने अनेक आरोप केले आहेत.

Gopichand Padalkar | गोपीचंद पडळकर यांच्यासह भावावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा, फसवणूक केल्याचाही आरोप
gopichand padalkar
Follow us
| Updated on: Jan 05, 2022 | 7:20 AM

सांगली : भाजप नेते तथा आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर फसवणूक आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यासोबत पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांच्यावरदेखील फिर्यादीने अनेक आरोप केले आहेत. सांगली जिल्ह्यातील आटपाडी पोलीस ठाण्यात झरे येथील फिर्यादी महादेव वाघमारे यांनी तशी तक्रार दिली आहे.

बनावट कागदपत्रे देऊन फसवणूक केल्याचा आरोप 

गोपीचंद पडळकर आणि ब्रह्मानंद पडळकर या दोन्ही बंधूंविरोधात आटपाडी पोलीस ठाण्यात IPC 420 सह म्हणजेच फसवणुकीसह अॅट्रॉसिटीचा हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तक्रारीत जमीन व्यवहारात फसवणूक केल्याचा आरोप आहे. फिर्यादी वाघमारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 2011 साली त्यांचा गोपीचंद पडळकर आणि त्यांच्या बंधूंसोबत जमिनीचा व्यवहार झाला होता. याच व्यवहारासंदर्भात वाघमारे यांना काही आक्षेप आहेत. बनावट कागदपत्रे करुन फसवणूक केल्याचा त्यांचा आरोप आहे. तसेच फिर्यादी वाघमारे यांच्या मालकीच्या विहिरीतील पाणी वापरण्याच्या कारणावरून देखील त्यांनी फसवणूक आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.

माझ्या हत्येचा कट, गोपीचंद पडळकर यांचा आरोप

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारवर सातत्याने आरोप करणारे पडळकर यांनी त्यांच्या जीवाला धोका असल्याचे याआधी सांगितले होते. माझ्या हत्येचा कट रचला जातोय असा, आरोप त्यांनी केला होता. हे आरोप करताना गोपीचंद पडळकर यांनी एक व्हिडीओ जारी केला होता. गोपीचंद पडळकर यांनी तो व्हिडीओ 7 नोव्हेंबर 2021 असल्याचा दावा केला होता. तो व्हिडीओ आटपाडी पोलीस स्टेशनच्या दारातला असून तिथं माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा पडळकर यांनी केला होता. तो हल्ला सुनियोजित होता, माझी गाडी ज्या दिशेने येत होती त्याच्या बरोबर दुसऱ्या बाजूनं 200 ते 300 लोकांचा जमाव लाठ्या काठ्यांसह उभा होता. पहिल्यांदा माझ्या गाडीवर दगडफेक करायची आणि गाडीचं स्पीड कमी झाल्यानंतर भरधाव वेगानं डंपर अंगावर घालायचा आणि जमावाकडून हमला करुन घ्यायचा असा सुनियोजित कट आखला होता, असं गोपीचंद पडळकर म्हणाले होते.आश्चर्याची बाब म्हणजे या सर्व हल्ल्याचं चित्रीकरण पोलीस करताना बघायला मिळतात. हा सगळा कट पोलीस सरंक्षणात घडवून आणला जात आहे. सदर घटना थांबवण्याचऐवजी पोलीस चित्रीकरणात मग्न होते, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला होता.

इतर बातम्या :

Sindhutai Sapkal Death | माई गेली आणि अवघा महाराष्ट्र पोरका झाला!

Video | ‘उद्धवा, बेटा एवढा सिंपल मुख्यमंत्री, वाटलं नव्हतं रे…’ सिंधुताईंचा जुना Video पुन्हा Viral

Samsung चे Galaxy A33 5G आणि Galaxy A13 5G लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या फोनमध्ये काय असेल खास?

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.