Sindhutai Sapkal Death | माई गेली आणि अवघा महाराष्ट्र पोरका झाला!

सिंधुताईंच्या अतुलनीय कामगिरीची दखल घेत त्यांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय अशा 900 हून अधिक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. तर मानाचा पद्मश्री पुरस्कार केंद्र सरकारने देऊन त्यांना नुकताच गौरवलं होतं.

| Updated on: Jan 04, 2022 | 10:41 PM
अनेक संघर्षांना सामोरं जात सिंधूताई यांनी हजारो अनाथ बालकांचं पालकत्व स्विकारलं होतं. दरम्यान, वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अत्यंत मनमिळावू, प्रेमळ आणि सगळ्यांना हव्याहव्याशा वाटणाऱ्या सिंधूताईंच्या निधनानं हजारो लेकरं पोरकी झाली आहे. (Photo Source - सिंधूताई सपकाळ यांच्या फेसबुक अकाऊंटवर साभार)

1 / 12
1994 साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात  सिंधुताई यांनी अनाथ बालकांसाठी एक संस्था स्थापन केली. ममता बाल सदन असं या संस्थेला नाव देण्यात आलं होतं. (Photo Source - सिंधूताई सपकाळ यांच्या फेसबुक अकाऊंटवर साभार)

2 / 12
चिमुकल्यांच्या शिक्षणापासून ते त्यांच्या उज्जव भविष्याची जबाबदारी सिंधुताईंनी आपल्या खांद्यावर घेतली होती. अनेक वर्ष अविरतपणे त्यांनी हे काम प्रामाणिकपणे आणि मन लावून केलं. (Photo Source - सिंधूताई सपकाळ यांच्या फेसबुक अकाऊंटवर साभार)

3 / 12
आपल्या संस्थेच्या माध्यमातून हजारपेक्षा जास्त बालकांना त्यांनी लहानाचं मोठं केलं. वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून अनाथ बालकांची जबाबदारी सिंधुताईंनी आपल्या खांद्यावर सक्षपणे पेलली. (Photo Source - सिंधूताई सपकाळ यांच्या फेसबुक अकाऊंटवर साभार)

4 / 12
संपूर्ण जगभरात सिंधूताईंच्या कामाची दखल घेण्यात आली असून अनेक मुलाखतींमधून त्यांचा जीवनप्रवास आणि त्यांचं काम याचा आढावा घेण्यात आला आहे. त्यांच्यावर आधारीत एक मराठी सिनेमाही प्रकाशित झाला होता. तेजस्विनी पंडीत यांनी या सिनेमात सिंधूताईंची भूमिका वढवली होती. (Photo Source - सिंधूताई सपकाळ यांच्या फेसबुक अकाऊंटवर साभार)

5 / 12
सिंधूताईंनी आपल्या आयुष्यात अनेक संघर्ष केले. अत्यंत खडतर प्रवास केला. सर्व कठीण प्रसंगांना तोंड देत त्यांनी हजारो अनाथ मुलांचा सांभाळ केला. (Photo Source - सिंधूताई सपकाळ यांच्या फेसबुक अकाऊंटवर साभार)

6 / 12
जन्मापासूनच सिंधुताई यांचा खडतर प्रवास सुरु झाला होता. त्यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1947 रोजी वर्धा जिल्ह्यातील नवरगाव येथे झाला. (Photo Source - सिंधूताई सपकाळ यांच्या फेसबुक अकाऊंटवर साभार)

7 / 12
घराला वंशाचा दिवा हवा असताना मुलगी जन्माला आली म्हणून सिंधूताई यांचं नाव चिंधी ठेवण्यात आलं होतं, असं त्यांनीच एका मुलाखतीत सांगितलं होतं. (Photo Source - सिंधूताई सपकाळ यांच्या फेसबुक अकाऊंटवर साभार)

8 / 12
गाव लहान असल्याने सुविधांचा अभाव आणि इतर कारणांमुळे सिंधुताई यांचं फक्त इयत्ता चौथीपर्यंत शिक्षण झालं. मात्र त्यानंतर त्यांचा व्यासंग इतका होता, की सुरेश भटांच्या अनेक गझला त्यांना तोंडपाठ होत्या. अनेक कविताही त्यांना पाठ होता.  (Photo Source - सिंधूताई सपकाळ यांच्या फेसबुक अकाऊंटवर साभार)

9 / 12
वयाच्या 9 व्या वर्षी सिंधूताईंचं लग्न झालं होतं. आपल्यापेक्षा वयाने 26 वर्षांनी मोठ्या असलेल्या व्यक्तीशी त्यांचं लग्न झालं होतं. श्रीहरी सपकाळ यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. (Photo Source - सिंधूताई सपकाळ यांच्या फेसबुक अकाऊंटवर साभार)

10 / 12
सिंधूताई यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत नुकतच पद्मपुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं.  (Photo Source - सिंधूताई सपकाळ यांच्या फेसबुक अकाऊंटवर साभार)

11 / 12
नेहमी हसतखेळत असणाऱ्या, आनंदाचा निखळ झरा ज्यांच्या डोळ्यातून वाहत असायचा, त्यांच्या निधनानंतर अनेकांनी दुःख व्यक्त केलंय. त्यांच्या निधनानं निर्माण झालेली पोकळी पुन्हा कधीच भरुन येणार नसल्याची खंत अनेकांच्या मनात आहे. (Photo Source - सिंधूताई सपकाळ यांच्या फेसबुक अकाऊंटवर साभार)

12 / 12
Non Stop LIVE Update
Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.