भूगर्भातून येतोय गूढ आवाज, परळीच्या लाडझरी गावकरी भयभीत, नेमकं काय घडतंय?

मागील दोन आठवड्यापासून बीड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये भूगर्भातून येणाऱ्या आवाजाचं प्रमाण वाढले आहे. परळी तालुक्यातील लाडझरी गावातील लोक आवाजामुळे भयभीत होत आहेत.

भूगर्भातून येतोय गूढ आवाज, परळीच्या लाडझरी गावकरी भयभीत, नेमकं काय घडतंय?
लाडझरीतील ग्रामस्थ भयभीत


संभाजी मुंडे, टीव्ही 9 मराठी, परळी, बीड: मागील दोन आठवड्यापासून बीड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये भूगर्भातून येणाऱ्या आवाजाचं प्रमाण वाढले आहे. परळी तालुक्यातील लाडझरी गावातील लोक आवाजामुळे भयभीत होत आहेत. विशेषतः रात्री होणाऱ्या आवाजामुळे ग्रामस्थ अक्षरशहा रात्र जागून काढत आहेत. धारूर तालुक्यातील आवरगाव मध्ये त्यानंतर परळी तालुक्यातील लाडझरी येथे भूगर्भातून मोठ्या आवाज ऐकायला मिळत आहेत. त्यामुळे नागरिक भयभीत झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. लाडझरी ग्रामस्थांनी प्रशासनानं या आवाजामागील सत्य शोधून काढावां अशी मागणी केली आहे.

भीतीपोटी गावकऱ्यांचं स्थलांतर

गेल्या चार दिवसांपासून भूगर्भातून असे भयंकर मोठे आवाज येत आहेत त्यामुळे लोक भयभीत झालेल आहेत. आवाज येत असल्यानं लाडझरी गावकऱ्यांनी रात्र जागून काढली आहे. लाडझरी गावातील ग्रामस्थ रानात स्थलांतरीत झाले आहेत. तर, काही ग्रामस्थ पाहुण्यांकडे निघून गेले आहेत. गावकऱ्यांनी भूगर्भ तज्ज्ञांना बोलावून नक्की काय घडतंय याचा शोध प्रशासनानं घ्यावा, अशी मागणी केलीय.

तहसीलदारांनी सांगितलं नेमकं काय घडतंय?

तहसीलदार सुरैश शूजूळ यांनी भूगर्भ तज्ज्ञांकडून मिळालेल्या माहितीनुसार लाडझरी गावात येणारा आवाज हा भूकंपाचा धक्का नाही. भूगर्भ तज्ज्ञांनी पाणी जमिनीत मुरत असल्यानं जमिनीतून हवा पास होते त्यामुळं हा आवाज येत आहे. जीएसडीएच्या टीम दोन वेळा गावात पाठवून तपासणी केली आहे. जोपर्यंत पाणी जमिनीत मुरत राहील तोपर्यंत आवाज येत राहील त्यामुळे नागरिकांनी भीती बाळगू नये. पावसाचे दिवस असल्यानं नागरिकांनी मोडकळीस आलेल्या घरांमध्ये राहू नये, असं आवाहन परळीच्या तहसीलदारांनी केलं आहे. नागरिकांचं गावामध्ये जाऊन समुपदेशन करण्यात येत असल्याचंही परळीचे तहसीलदार सुरेश शूजूळ यांनी सांगितलं आहे.

भूजल तज्ज्ञ म्हणातात

बीडच्या धारुर तालुक्यातील आवरगाव आणि परळी तालुक्यातील लाडझरी या गावात भूगर्भातून येत असलेला आवाज हा डेक्कन ट्रॅप बेसाल्ट आवाज असल्याचे भूजल तज्ज्ञ सांगत आहेत. भूस्तरातील पोकळीमध्ये पावसानंतर भूजल व हवेची पोकळी यामधील परस्परक्रिया घडून येत असल्याने त्यावेळी आवाज ऐकायला येतात असं भूजल तज्ञांनी सांगितले आहे.

इतर बातम्या:

‘मी पुन्हा येईन’ हे वाक्य अडीच वर्षांपासून ऐकतो, सत्यात कधी येईल ते तुम्हीच सांगा; जयंत पाटलांचा टोला

‘मंत्री टीव्हीवर घोषणा करतात, पण प्रत्यक्ष शेतकऱ्यांना खडकू मिळत नाही’, फडणवीसांचा घणाघात

Beed Parali Ladzari village people fear due to Mysterious sound

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI