VIDEO | भंडाऱ्यात “नेटवर्क झाड”, रेंजसाठी तरुणांची झाडाजवळ सतत मांदियाळी

झाडाजवळ बसा आणि निवांत इंटरनेट सर्फिंग करा... हे ऐकून धक्का बसला ना? पण हे खरे आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील जेवनाळा गावात चक्क मुलं नेटवर्क सर्फिंगसाठी कडुलिंबाच्या झाडाजवळ गर्दी करताना दिसत आहेत. | Bhandara mobile tower is 200 meters away but has range on Neem tree called as Nework Tree

VIDEO | भंडाऱ्यात नेटवर्क झाड, रेंजसाठी तरुणांची झाडाजवळ सतत मांदियाळी
Bhandara internet Tree
अनिल आक्रे

| Edited By: Nupur Chilkulwar

Jul 02, 2021 | 11:29 AM

भंडारा : झाडाजवळ बसा आणि निवांत इंटरनेट सर्फिंग करा… (Bhandara Neem tree) हे ऐकून धक्का बसला ना? पण हे खरे आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील जेवनाळा गावात चक्क मुलं नेटवर्क सर्फिंगसाठी कडुलिंबाच्या झाडाजवळ गर्दी करताना दिसत आहेत. (Bhandara mobile tower is 200 meters away but has range on Neem tree called as Nework Tree)

गावात टॉवर असतांनासुद्धा मोबाईलवर साधी रेंज मिळत नसल्यामुळे आणि टॉवरपासून जवळजवळ 200 मीटर अंतरावर असलेल्या कडुलिंबाच्या झाडाजवळ इंटरनेटची स्पीड चांगली मिळत असल्यामुळे गावातील तरुण आणि विद्यार्थी इंटरनेट मिळवण्यासाठी या कडूनिंबाच्या झाडाजवळ आश्रय घेताना दिसून येतात.

नेटसर्फिंग करण्यासाठी जेवनाळा गावातील युवकांची या कडूनिंबाच्या झाडाजवळ सतत मांदियाळी राहात असल्याने गावात हे झाड “नेटवर्क झाड” म्हणून प्रसिद्ध झाले आहेत.

जेवनाळा गावात मोबाईल टॉवर असूनही कित्येक वर्षांपासुन मोबाईल रेंजची समस्या आहे. गावात साधा कॉलही लागात नसल्याने तिथे इंटरनेटची काय बिसाद ही परिस्थिती उद्भवली आहे. यात मात्र विद्यार्थ्यांची घुसमट होत असून शाळा ऑफलाईन तर शिक्षण ऑनलाईन झाल्याने ऑनलाईन शिक्षणासाठी जेवनाळा गावातील विद्यार्थ्यांना आणि नेटसर्फिंग करणाऱ्या युवकांना तारेवरची कसरत करावी लागात आहे.

तर, पाऊस आला तर क्लास मिस करण्याशिवाय पर्याय उरत नाही. आता तर पावसाळा लागलाय, त्यामुळे परिस्थिती आणखी बिकट होण्यास सुरुवाच झाल्याचे गावातील युवक सांगतात. आपल्या पाल्याच्या या अभ्यासासाठी धडपडीने पालकही गहिवरले असून प्रशासनाने नेटवर्कची समस्या सोडवण्याची मागणी पालकांकडून केली जात आहे.

Bhandara mobile tower is 200 meters away but has range on Neem tree called as Nework Tree

संबंधित बातम्या :

मुंबईतील नामांकित कॉलेजचा ऑनलाईन वर्ग, टवाळखोरांनी पॉर्न व्हिडीओ सुरु केला आणि…

शुभमंगल ऑनलाईन ! मुलगा सातासमुद्रापार, वडिलांचा पुढाकार, डोंबिवलीतून अनोख्या पद्धतीत विवाह

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें