बंदी असताना बैलगाडा शर्यतीचं आयोजन, गोपीचंद पडळकरांकडून बक्षिसांची खैरात, ठाकरे सरकार कारवाई करणार ?

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकारविरोधात बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून एल्गार पुकारलाय. पडळकर यांनी येत्या 20 ऑगस्टला सांगली जिल्ह्यातील झरे गावात मोठी बैलगाडा शर्यत आयोजित केली आहे.

बंदी असताना बैलगाडा शर्यतीचं आयोजन, गोपीचंद पडळकरांकडून बक्षिसांची खैरात, ठाकरे सरकार कारवाई करणार ?
gopichand padalkar
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: prajwal dhage

Aug 13, 2021 | 10:04 PM

पुणे : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकारविरोधात बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून एल्गार पुकारलाय. पडळकर यांनी येत्या 20 ऑगस्टला सांगली जिल्ह्यातील झरे गावात मोठी बैलगाडा शर्यत आयोजित केली आहे. विशेष म्हणजे या बैलगडा शर्यतीसाठी पडळकर यांनी लाखो रुपयांचं बक्षीस ठेवलं आहे. (BJP leader MLC Gopichand Padalkar organised Bullock Cart Race in Sangli Jhare village)

प्रथम येणाऱ्यास 1 लाख 11 हजार रुपयांचं बक्षीस

महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यास कायद्यानुसार बंदी आहे. ही बंदी उठवण्याची मागणी राज्यातील काही संघटना तसेच पक्षांनी केली आहे. या मुद्द्याला घेऊन अनेक ठिकाणी आंदोलनदेखील करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर बैलडागा शर्यतीसाठी पडळकरसुद्धा मैदानात उतरले आहेत. त्यांनी सांगली जिल्ह्यातील झरे या गावात भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले आहे. या शर्यतीत प्रथम येणाऱ्यास त्यांनी 1 लाख 11 हजार रुपयांचं बक्षीस देणार असल्याचं जाहीर केलंय. द्वितीय तसेच तृतीय आणि चौथा क्रमांक पटकावणाऱ्यांनाही वेगवेगळे बक्षीस देण्यात येणार आहे.

बैलगाडा शर्यती सुरु करण्यासाठी निलेश लंकेंच्या मंत्र्यांना भेटीगाठी

बैलगाडा शर्यती (Bullock Cart Race) सुरु करण्याची मागणी घेऊन राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंकेसुद्धा (Nilesh Lanke) मैदानात उतरले आहेत. त्यांनी 12 ऑगस्ट रोजी पशुसंवर्धन राज्यमंत्री सुनील केदार यांना भेटून यासंदर्भातील निवेदन दिलं होतं. राज्य सरकारने पुढाकार घेऊन सुप्रीम कोर्टाचे वकील आणि संघटनांची बैठक लावून मार्ग काढला पाहिजे, अशी मागणी त्यांनी निवेदनाच्या माध्यमातून केली होती. बैलगाडा शर्यत हा शेतकऱ्याचा जिव्हाळ्याचा, आपुलकीचा विषय आहे. बैलगाडा शर्यतीसंदर्भात राज्य शासनाने केलेल्या कायद्या विरोधातील सर्वोच्च न्यायालयातील याचिकेची सुनावणी तत्काळ घेण्यात यावी, अशी मागणी लंके यांनी केली होती.

ठाकरे सरकार काय भूमिका घेणार ?

दरम्यान, बैलगाडा शर्यतीच्या पार्श्वभूमीवर येत्या 20 ऑगस्ट रोजी पडळकर यांनी शर्यतीसाठी छकडा घेऊन सहभागी होण्याचं आवाहन केलंय. राज्यात बैलगाडा शर्यत बंदीचा कायदा लागू असूनदेखील पडळकर यांनी शर्यतीचे आयोजन केले आहे. येत्या 20 ऑगस्ट रोजी बैलगाडा शर्यत भरलीच तर ठाकरे सरकार काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

पाहा व्हिडीओ :

इतर बातम्या :

मोठी बातमी ! औरंगाबादेत भंडाऱ्याच्या कार्यक्रमात विषबाधा, गावातील तब्बल 70 टक्के लोकांची प्रकृती बिघडली

नाकाबंदी सुरु असताना गाडी थांबवली, वाहतूक पोलिसाला दगडाने मारहाण, कल्याणमधील धक्कादायक घटना

एमपीएससी आयोग अ‍ॅक्शन मोडवर, उमेदवारांच्या मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर

(BJP leader MLC Gopichand Padalkar organised Bullock Cart Race in Sangli Jhare village)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें