AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकरी फाशी घ्यायला निघाला होता, प्रीतम मुंडे यांचा फोन येताच रडू लागला; म्हणाला, ताई काही राहिलच नाही

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्याने काल आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गावच्या सरपंचाने त्या सरपंचाला आत्महत्या करण्यापासून परावृत्त केलं. त्यानंतर खासदार प्रीतम मुंडे यांनी या शेतकऱ्याशी संवाद साधून त्याला दिलासा दिला.

शेतकरी फाशी घ्यायला निघाला होता, प्रीतम मुंडे यांचा फोन येताच रडू लागला; म्हणाला, ताई काही राहिलच नाही
pritam mundeImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Apr 10, 2023 | 1:59 PM
Share

बीड : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. अनेक ठिकाणी गारपीटही झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त झाली आहेत. हाता तोंडाशी आलेला घास निघून गेल्याने शेतकऱ्यांवर तर आभाळच कोसळलं आहे. काल बीडच्या केज, परळीमध्ये दुपारी प्रचंड पाऊस झाला. संध्याकाळपर्यंत धोधो पाऊस सुरू होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात चिखल झाला आहे. सर्व पिके नष्ट झाली आहेत. लाखोंचा माल हातातून गेला आहे. वर्षभर उन्हातान्हात कष्ट केलं आणि पावसाने वाहून गेलं… त्यामुळे हवादिल झालेल्या एका शेतकऱ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही माहिती मिळताच भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी त्यांच्याशी फोनवर संवाद साधला आणि त्यांना धीर दिला. प्रीतम मुंडे धीर देत असताना या शेतकऱ्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते.

अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे बीड जिल्ह्यातील जवळपास शंभर गावे बाधित झाली आहेत. परळी आणि केजमध्ये काल अवकाळी पावसाने थैमान घातलं. त्यामुळे संपूर्ण पिके नष्ट झाल्याने एक शेतकरी पुरता कोलमडून पडला. या शेतकऱ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याला गावच्या सरपंचाने आत्महत्या करण्यापासून परावृत्त केलं. त्यानंतर हा प्रकार खासदार प्रीतम मुंडे यांना सांगण्यात आला. त्यावेळी प्रीतम मुंडे यांनी फोन करून या शेतकऱ्याशी संवाद साधत दिलासा दिला. हिंमत हारु नका, तुम्हाला तात्काळ मदत मिळवून देऊ. पण तुम्ही आत्महत्येचा विचार डोक्यातून काढून टाका, असं मुंडे यांनी सांगितलं. प्रीतम मुंडे आणि या शेतकऱ्याच्या संभाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियातून चांगलाच व्हायरल होत आहे.

प्रीतम मुंडे आणि शेतकऱ्याचा संवाद जशाच्या तसा

शेतकरी : हां ताई

प्रीतम मुंडे : हां दादा

शेतकरी : दोन एकर ज्वारीचं नुकसान हे. अजूनही 3 वाजता गारा पडल्यात हे. मी फाशी घ्यायला लागलो होतो. पण सरपंच आणि माजी चेअरमनने मला खाली उतरवलं.

प्रीतम मुंडे : फाशी कशामुळे घेताय तुम्ही…?

शेतकरी : अहो ताई काही राहिलच नाही ताई…

प्रीतम मुंडे : नाही नाही नाही… राज्यातलं सरकार आता बदललेलं आहे. आपण मदत करू. आपण मुख्यमंत्र्यांकडे मागणी करू जीव कशाला देताय?

शेतकरी : जगावं कशावर आता…? ज्वारी आणि गहू सर्व गेली. वांगी गेली. पाऊस काल दुपारी 3 वाजता जे सुरू झाला ते संध्याकाळी 6.30ला उघडला.

प्रीतम मुंडे : मी दवाखान्यात आहे. माझी आई अॅडमिट आहे. मी अचानक दौरा रद्द केला आहे. बीडीओ आले आहेत ना? मी त्यांच्याशी बोलते. जिल्हाधिकाऱ्यांशी बोलते. काळजी करू नका. हिंमत हारू नका. तुम्हाला मदत मिळवून देण्याची जबाबदारी आमच्यावर आहे.

शेतकरी : ताई तुमच्या बोलण्यावर विश्वास आहे.

प्रीतम मुंडे : शंभर टक्के तुम्हाला मदत मिळवून देऊन. काळजी करू नका.

प्रीतम मुंडे : केजची काय परिस्थिती आहे?

अधिकारी : आठ दहा गावात पिके उद् ध्वस्त झाली आहे. पंचनामे करायला सांगितले आहेत… सरपंच आणि तलाठ्यांना.

प्रीतम मुंडे : मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलते. मदत करायला सांगते. तात्काळ पंचनामे करा. आपल्या जिल्ह्याचा अहवाल लवकरात लवकर सादर करा. मी मुख्यमंत्र्यांशी बोलते

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली