AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनाच्या 2700 लसी अतिथंड झाल्यानं खराब, आरोग्य सहायक निलंबित, जिल्हा प्रशासनाची कारवाई

चंद्रपूर जिल्ह्यातील भिसी आरोग्य केंद्रावर कोरोनाच्या 2700 लसी खराब झाल्या होत्या. कोरोना प्रतिबंधक लसी झाल्या खराब झाल्या प्रकरणी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

कोरोनाच्या 2700 लसी अतिथंड झाल्यानं खराब, आरोग्य सहायक निलंबित, जिल्हा प्रशासनाची कारवाई
आरोग्य केंद्र
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Oct 22, 2021 | 6:35 PM
Share

चंद्रपूर: जिल्ह्यातील भिसी आरोग्य केंद्रावर कोरोनाच्या 2700 लसी खराब झाल्या होत्या. कोरोना प्रतिबंधक लसी झाल्या खराब झाल्या प्रकरणी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. निलंबित कर्मचाऱ्याकडून खराब झालेल्या लसींची किंमत वसूल करण्यात येणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील भिसी येथे उघडकीस आला होता प्रकार, कोरोना प्रतिबंधक लसी अतिथंड झाल्याने गोठल्या होत्या. केंद्रातील महिला आरोग्य कर्मचाऱ्याने चुकीची कबुली दिली होती.

खर्च वसूल होणार

चंद्रपूर जिल्ह्यातील भिसी या आरोग्य केंद्रावर 2700 लसी वाया गेल्याच्या प्रकरणात एका कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे. आरोग्य सहायक  शीला कराळे असं निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. 13 ऑक्टोबर रोजी या केंद्रावरील 2600 कोविशील्ड आणि 100 कोवॅक्सीन लसी डीप फ्रीझर मध्ये ठेवण्यात आल्यामुळे खराब झाल्याची बाब उघड झाली होती. ही बाब उघड होताच प्रशासनाने याची गंभीर दखल घेत चौकशी केली आणि त्यानंतर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे या प्रकरणात निलंबित कर्मचाऱ्याकडून खराब झालेल्या लसींची किंमत वसूल करण्याची कारवाई देखील कऱण्यात येणार आहे. प्रशासनाला यासंदर्भातील अहवालाची प्रतीक्षा आहे.

लसी कशा खराब झाल्या?

भिसी आरोग्य केंद्रावर कोरोनाच्या 2700 लसी खराब झाल्या होत्या. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील भिसी आरोग्य केंद्र असून तिथं हा प्रकार घडला होता. लसी डीप फ्रीझ केल्याने झाल्या खराब झाल्या होत्या प्रशासनाने वाया गेलेल्या लसींची गंभीर दखल घेत वैद्यकीय अधिकारी प्रियंका कष्टी आणि आरोग्य सहाय्यक शीला कराळे यांना कारणे दाखवा नोटीस दिली होती. कामाच्या अति ताणाने चूक झाल्याची कर्मचाऱ्यांची कबुली दिली होती. तब्येत बरी नसल्याने ही चूक झाल्याचे संबंधित कर्मचाऱ्याने मान्य केले आहे.

इतर बातम्या:

महाविकास आघाडीच्या नेत्यांना अडकवण्यासाठी भाजपची 8 महिन्यांपूर्वी बैठक, रोहित पवार यांच्या दाव्यानंतर खळबळ

अजित पवारांनी कारखाने विक्रीची लिस्टच दिली; सोमय्या म्हणतात, दुनिया की सैर करलो, पण मूळ मुद्दा बाजूलाच राहिला

‘थोडी चाड शिल्लक असेल तर नवाब मलिकांचा राजीनामा घ्या’ राधाकृष्ण विखे यांचा घणाघात

Chandrapur 2700 corona vaccine wasted due to deep cooling nurse suspended by administration

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा