Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर, गेल्या 3 दिवसांत नेमकं काय घडलं?

सिरोंचा, आलापल्ली, तेलंगणा राष्ट्रीय महामार्ग मागील दोन दिवसापासून पूर्णपणे बंद होता. या राष्ट्रीय महामार्गावर बामणी, मेडारम, रेपनपल्ली हे छोटे नाले राष्ट्रीय महामार्गावरून वाहत होते. हा राष्ट्रीय महामार्ग आज सुरू झाला.

Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर, गेल्या 3 दिवसांत नेमकं काय घडलं?
गडचिरोलीतील भामरागड तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून अशी पूर परिस्थिती आहे. Image Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Jul 11, 2022 | 8:08 PM

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात पूरपरिस्थिती पाहण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. संध्याकाळी ते सातपर्यंत गडचिरोली पोहचतील. त्यानंतर ते अधिकाऱ्यांकडून पूर परिस्थितीचा आढावा (review of flood situation) घेतील. एकनाथ शिंदे हे महाविकास आघाडी सरकारमध्ये गडचिरोलीचे पालकमंत्री होते. त्यामुळं त्यांना गडचिरोली जिल्ह्माची चांगली जाण आहे. गडचिरोली जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसाच्या फटका अनेक नदी-नाल्यांना बसलेला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील प्राणहिता (Pranhita), गोदावरी, इंद्रावती, वैनगंगा या नद्यांना पूर आला आहे. महाराष्ट्र-तेलंगणा सीमावर्ती भागात असलेल्या मेडीगट्टा धरणाचे (Medigatta Dam) 81 दरवाजे सोडण्यात आले. त्यातून मोठ्या पाण्याचा विसर्ग होत आहे. बॅक वॉटरचा फटका गोदावरी व प्राणहिता या दोन नद्यांचा बसण्याच्या संकेत आहेत.

हे सुद्धा वाचा

3 दिवस 70 गावांचा संपर्क तुटला

गेल्या तीन दिवसांपासून भामरागड तालुक्याचा व तालुक्‍यातील 70 गावांचा तालुका, व जिल्हा मुख्यालयाशी संपर्क पूर्णपणे तुटला होता. आलापल्ली भामरागड छत्तीसगड हा राष्ट्रीय महामार्गाच्या काम सुरू असून का मग रस्त्यात काम केल्याने हा रस्ता वाहून गेला. भामरागड तालुक्यात मागील दोन दिवसांअगोदर एक ट्रक वाहून गेल्याने त्यात त्यांचा मृत्यू झाला. विद्युत विभागाच्या एका कर्मचाऱ्याचाही पाण्यात अंदाज ना टाळल्यामुळे मृत्यू झाला.

सिरोंचाचा 2 दिवस तेलंगणाशी संपर्क नाही

सिरोंचा, आलापल्ली, तेलंगणा राष्ट्रीय महामार्ग मागील दोन दिवसापासून पूर्णपणे बंद होता. या राष्ट्रीय महामार्गावर बामणी, मेडारम, रेपनपल्ली हे छोटे नाले राष्ट्रीय महामार्गावरून वाहत होते. हा राष्ट्रीय महामार्ग आज सुरू झाला. परंतु दोन दिवस बंद असल्यामुळे वाहतूक ठप्प होती. अहेरी तालुका मुख्यालयी तलावाच्या पाण्यात वाढ झाली. अहेरीतील प्रभाग नंबर 14 व 15 मध्ये जवळपास वीस ते बावीस घरांमध्ये पाणी शिरले होते. त्या सर्व परिस्थितीवर अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार आहेत. गडचिरोली जिल्ह्यात NDRF पथक असून हे पथक व परिस्थितीबाबत प्रत्येक क्षणाची अपडेट घेत आहेत.

Non Stop LIVE Update
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?.
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे.
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?.
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार.