Eknath Shinde : विदर्भातील गडचिरोलीत पूरपरिस्थिती, आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री गडचिरोलीच्या दिशेने रवाना, यंत्रणा अलर्ट असल्याची माहिती

मुख्यमंत्री शिंदे गडचिरोलीला निघण्यापूर्वी नागपुरात म्हणाले, मालमत्ता आणि जीवितहानी होणार नाही. नागरिकांना स्थलांतर करण्यासाठी सूचना दिल्या आहेत. राज्यातील इतर भागातही विशेष सूचना दिल्या आहेत.

Eknath Shinde : विदर्भातील गडचिरोलीत पूरपरिस्थिती, आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री गडचिरोलीच्या दिशेने रवाना, यंत्रणा अलर्ट असल्याची माहिती
विभागीय आयुक्तांकडून पूरपरिस्थितीचा आढावा घेताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Image Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Jul 11, 2022 | 5:45 PM

नागपूर : विदर्भात गेल्यात तीन-चार दिवसांपासून चांगलाच पाऊस कोसळतोय. त्यामुळं काही भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली. गडचिरोलीतील भामरागडमधील (Bhamragad) रस्ते तीन दिवस बंद होते. सिंरोच्यातही दोन दिवस रस्ते बंद होते. या सर्व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे गडचिरोलीच्या दिशेने रवाना झालेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हेलिकॅप्टरनं जाणार होते. परंतु, वातावरण योग्य नसल्यानं त्यांना हा दौरा नागपूरवरून कारनं करावा लागत आहे. गडचिरोलीत ते संध्याकाळी सात वाजता पोहण्याची शक्यता आहे. त्याठिकाणी अधिकाऱ्यांची चर्चा करतील. गडचिरोलीला निघण्यापूर्वी नागपूर विमानतळावर (Airport) त्यांनी नागपूरच्या विभागीय आयुक्त ( Divisional Commissioner) माधवी खोडे चवरे यांच्याकडून विदर्भातील पूर परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, गडचिरोलीत पूरग्रस्त परिस्थिती असल्याने पाहणी करणार आहोत. अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहोत. प्रशासकीय यंत्रणा अलर्ट आहे. जीवितहानी होणार नाही, यासाठी अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सैन्यदल, एनडीआरएफशी चर्चा

मुख्यमंत्री शिंदे गडचिरोलीला निघण्यापूर्वी नागपुरात म्हणाले, मालमत्ता आणि जीवितहानी होणार नाही. नागरिकांना स्थलांतर करण्यासाठी सूचना दिल्या आहेत. राज्यातील इतर भागातही विशेष सूचना दिल्या आहेत. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन विभाग, सैन्यदल, एनडीआरएफ या सर्वांशी चर्चा झाली आहे. त्यांना अलर्ट करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. कुठलीही यंत्रणा कमी पडणार नाही, असं आश्वासन यावेळी त्यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

पावसामुळं रस्तेमार्गाने दौरा

गडचिरोली जिल्ह्यातील पूर परिस्थितीची पाहणी करण्याकरिता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज दुपारी सव्वाचार वाजता नागपूर विमानतळावर आगमन झाले. नागपूर व परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने विमानतळावरून रस्ते मार्गाने गडचिरोलीकडे त्यांनी प्रयाण केले. तत्पूर्वी विमानतळावर त्यांचे विभागीय आयुक्त माधवी खोडे -चवरे, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज सुर्यवंशी, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे, अतिरिक्त पोलीस आयुक्त अश्वती दोरजे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, पोलीस अधीक्षक विजय मगर यांनी स्वागत केले.

गडचिरोलीत घेणार पूरपरिस्थितीचा आढावा

विभागीय आयुक्त माधवी खोडे-चवरे यांनी त्यांना विमानतळावर पूर्व विदर्भातील पूर परिस्थितीचा आढावा दिला. त्यानंतर खराब हवामानामुळे हेलिकॅप्टरऐवजी रस्ते मार्गाने त्यांनी गडचिरोलीकडे प्रयाण केले. संध्याकाळी सात वाजतापर्यंत ते गडचिरोलीला पोहचतील. त्याठिकाणी पूरपरिस्थितीचा अधिकाऱ्यांकडून आढावा घेतील. त्यानंतर रात्री अकराच्या सुमारास परत निघणार असल्याची माहिती आहे.

Non Stop LIVE Update
अंधारेंचा पलटवार, व्हिडीओचा सपाटा लावत राज ठाकरेंच्या भूमिकेची चिरफाड
अंधारेंचा पलटवार, व्हिडीओचा सपाटा लावत राज ठाकरेंच्या भूमिकेची चिरफाड.
'मविआ'ला 35 जागा तर 'इंडिया'ला बहुमत, शरद पवारांनंतर बाबांचा मोठा दावा
'मविआ'ला 35 जागा तर 'इंडिया'ला बहुमत, शरद पवारांनंतर बाबांचा मोठा दावा.
14 जीव गेलं पण अनधिकृत होर्डिंग लावणारा भावेश भिंडे कुठं लपला?
14 जीव गेलं पण अनधिकृत होर्डिंग लावणारा भावेश भिंडे कुठं लपला?.
पृथ्वीराज चव्हाणांनी किती जागा मिळणार थेट आकडाच सांगितला, म्हणाले....
पृथ्वीराज चव्हाणांनी किती जागा मिळणार थेट आकडाच सांगितला, म्हणाले.....
बीड लोकसभा मतदारसंघात काय घडतंय? फेर निवडणूक घेण्याची कुणाची मागणी?
बीड लोकसभा मतदारसंघात काय घडतंय? फेर निवडणूक घेण्याची कुणाची मागणी?.
ते ज्या ठिकाणी जातात तिथला उमेदवार पराभूत...; राज ठाकरेंना कोणी डिवचलं
ते ज्या ठिकाणी जातात तिथला उमेदवार पराभूत...; राज ठाकरेंना कोणी डिवचलं.
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली.
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?.
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?.
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्...
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्....