VIDEO: वेड्यावाकड्या घोषणा करणार नाही; केंद्राकडेही वेडीवाकडी मागणी करणार नाही: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

संकट आलं रे आलं की केंद्राकडे मदतीची मागणी केली जाते. एवढे हजार कोटी द्या, तेवढे हजार कोटी द्या असं म्हटलं जातं. मी केंद्राकडे अजून कोणतीही मागणी केली नाही. (cm uddhav thackeray reaction on relief package from central government)

VIDEO: वेड्यावाकड्या घोषणा करणार नाही; केंद्राकडेही वेडीवाकडी मागणी करणार नाही: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


कोल्हापूर: संकट आलं रे आलं की केंद्राकडे मदतीची मागणी केली जाते. एवढे हजार कोटी द्या, तेवढे हजार कोटी द्या असं म्हटलं जातं. मी केंद्राकडे अजून कोणतीही मागणी केली नाही. कारण मी वेड्यावाकड्या घोषणा करणार नाही आणि केंद्राकडे वेडीवाकडी मागणीही करणार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. (cm uddhav thackeray reaction on relief package from central government)

कोल्हापुरातील पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मीडियाशी संवाद साधला. संकट आलं रे आलं की केंद्राकडे आर्थिक मदतीची मागणी होते. एवढे हजार कोटी द्या. तेवढे कोटी द्या. मी मागणी केलेली नाही. कारण मी वेड्यावाकड्या घोषणा करणार नाही आणि वेडीवाकडी मागणी करणार नाही. माझ्या राज्याला जे पाहिजेत तेच केंद्राकडे मागेल. माझ्या राज्याला जिथे केंद्राची गरज आहे, तिथेच मदत मागेल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. गुजरातला आर्थिक मदत दिली. मग महाराष्ट्रालही द्या असं मी बोललो नाही आणि बोलणार नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.

मी मदत करणारा मुख्यमंत्री

मी पॅकेज घोषित करणारा मुख्यमंत्री नाही. मी मदत करणारा मुख्यमंत्री आहे. सवंग लोकप्रियतेसाठी मी काहीही घोषणा करणार नाही, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीत राजकारण नको. मी स्वत: आज शाहूपुरी येथे देवेंद्र फडणवीस यांना भेटलो आणि बोललो. मुंबईत आम्ही परत एकदा सर्वाना बोलावून पूर परिस्थितीत सर्वांना कशी मदत करता येईल ते पाहू, असंही ते म्हणाले.

एनडीआरएफचे निकष बदला

एनडीआरएफचे निकष 2015 चे आहेत. जुने आहेत. ते बदलण्याची गरज आहे असे आम्ही केंद्राला विनंती केली आहे, असं सांगतानाच मागच्यावेळी आम्ही एनडीआरएफच्या निकषापलिकडे जाऊन नागरिकांना मदत केली होती, असं त्यांनी स्पष्ट केलं.

विम्याची रक्कम तातडीने मिळावी

केंद्रीय वित्तमंत्री सितारामन यांना विनंती पत्रं लिहिलं आहे. त्यांना आज हे पत्र मिळेल. त्यात विमा कंपन्यांना महसूल विभागाचे पंचनामे ग्राह्य धरून किमान 50 टक्के विमा रक्कम देण्याचे निर्देश देण्याची विनंती अर्थमंत्र्यांना केली आहे. विमा कंपन्या उशिरा येतात. ते कचरा पाहून मदत ठरवतात. पण कंपन्या येईपर्यंत कचरा ठेवणे योग्य नाही. त्यामुळे रोगराई पसरू शकते. म्हणून महसूल विभागाचे पंचनामे विमा कंपन्यांनी ग्राह्य धरले पाहिजे, असं ते म्हणाले.

कायमस्वरूपी तोडगा काढणार

अतिवृष्टीचा इशारा मिळाल्यावर स्थानिक प्रशासनाने काही लाख नागरिकांचे स्थलांतर करून जीव वाचवले. पशुधनही त्याचप्रकारे वाचवण्यात आलं. महाराष्ट्रावर कोसळलेले हे अस्मानी संकट भयानक आहे. या संकटातून बाहेर पडताना कोविड तसेच पुराच्या पाण्यामुळे होऊ शकणारी रोगराई रोखण्यासाठी साफसफाई करणं, नागरिकांना दिलासा देणं, त्यांचं पुनर्वसन करणं यास आमचं प्राधान्य आहे. हे संकट नेहमीचंच झालं आहे आणि त्यात आमचे संसार वाहून जात आहेत, तेव्हा त्यावर कायमस्वरुपी तोडगा काढावा अशी नागरिकांची अपेक्षा आहे, असंही त्यांनी सांगितलं. (cm uddhav thackeray reaction on relief package from central government)

 

संबंधित बातम्या:

नदीपात्रातील ब्लू, रेड लाईनमध्ये बांधकामास परवानगी नाही, पूर परिस्थिती रोखण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागणार: मुख्यमंत्री

मी पॅकेज घोषित करणारा मुख्यमंत्री नाही तर मदत करणारा मुख्यमंत्री : उद्धव ठाकरे

एसपीची फुकट बिर्याणी महागात, पुण्यातील महिला डीसीपीच्या ऑडिओ क्लीपची चौकशी करण्याचे गृहमंत्र्यांचे आदेश

(cm uddhav thackeray reaction on relief package from central government)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI