आषाढी वारीसाठी कडक निर्बंध, मग मंत्र्यांसाठी नियम नाहीत ?, जयंत पाटलांच्या बैठकीत कोरोना नियमांची ऐशीतैशी

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी पंढरपुरात घेतलेल्या बैठकीतसुद्धा कोरोना नियम धाब्यावर बसवण्यात आले. या प्रकारामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

आषाढी वारीसाठी कडक निर्बंध, मग मंत्र्यांसाठी नियम नाहीत ?, जयंत पाटलांच्या बैठकीत कोरोना नियमांची ऐशीतैशी
JAYANT PATIL PANDHARPUR NCP MEETING

पंढरपूर : कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडी सरकारने आषाढी वारीसाठी अनेक निर्बंध लागू केले आहेत. तर दुसरीकडे याच सरकारमधील मंत्र्यांच्या कार्यक्रमात मोठी गर्दी होताना दिसत आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पंढरपुरात घेतलेल्या बैठकीतसुद्धा कोरोना नियम धाब्यावर बसवण्यात आले. या प्रकारामुळे संताप व्यक्त केला जात आहे. (corona rules violated in Jayant Patil Solapur Pandharpur NCP meeting)

कार्यकर्त्यांच्या तोंडावर मास्क नव्हता, सोशल डिस्टंन्सिंगचाही फज्जा

जयंत पाटील आज सोलापूर तसेच पंढरपूरच्या दौऱ्यावर होते. पंढरपुरात असताना त्यांनी राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे यांच्या वसंतबाग येथील निवासस्थानी कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली. पंढरपूरमधील राष्ट्रवादी पक्षातील अंतर्गत गटबाजी थोपवण्यासाठी तसेच इतर विषयांवर चर्चा करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या बैठकीत कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याचे पाहायला मिळाले. येथे अनेक कार्यकर्त्यांच्या तोंडावर मास्क नव्हता. तसेच सोशल डिस्टंन्सिंगही पाळगे गेले नाही.

पंढरपुरात आजपासून संचारबंदी

एकीकडे 20 जुलैला होणाऱ्या आषाढी एकादशीसाठी राज्य सरकारने अनेक निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधांतर्गत पंढरपुरात आजपासून (17 जुलै) संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच वारीसाठीदेखील वारकऱ्यांची संख्या मर्यादीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, जयंत पाटील यांच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी केलेली गर्दी पहता एकीकडे वारीसाठी कडक निर्बंध तर दुसरीकडे मंत्र्यांच्या बैठकांमध्ये कोरोना नियांची पायमल्ली असे चित्र निर्माण झाले आहे.

विरोधकांनी सत्तेची स्वप्ने बघू नयेत

दरम्यान, आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली या भेटीवर जयंत पाटील यांनी भाष्य केलं. “आमच्या पक्षाला हितशत्रू फार आहेत. शरद पवार कोणालाही भेटले तरी त्याच्या वावड्या उठत असतात. विरोधकांनी सत्तेची स्वप्ने बघू नयेत,” असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.

इतर बातम्या :

“साहेबांना उदंड आयुष्य लाभावं, राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत” अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त तब्बल 30 क्विंटल साखरेचे वाटप

45 वर्ष संसार केला, एकत्रच हृदयविकाराचा झटका आला, एकाच दिवशी पती-पत्नीवर अंत्यसंस्कार

मानाच्या पालख्यांच्या प्रस्थान सोहळ्यासाठी शिवशाही बस सज्ज, सोमवारी पंढरपूरकडे रवाना होणार: अनिल परब

(corona rules violated in Jayant Patil Solapur Pandharpur NCP meeting)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI