AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पतीच्या निवृत्तीनंतर प्रशासनाकडून पेन्शन देण्यास टाळाटाळ, 65 वर्षीय वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्येला परवानगी देण्याची मागणी

पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील इंदगावच्या 65 वर्षीय अंजनी चाबके या माउलीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आत्महत्या करण्याची परवानगी मागितली आहे.

पतीच्या निवृत्तीनंतर प्रशासनाकडून पेन्शन देण्यास टाळाटाळ, 65 वर्षीय वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्येला परवानगी देण्याची मागणी
वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्येला परवानगी देण्याची मागणी
| Edited By: | Updated on: Oct 30, 2021 | 1:05 PM
Share

पालघर : जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील इंदगावच्या 65 वर्षीय अंजनी चाबके या माउलीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आत्महत्या करण्याची परवानगी मागितली आहे. त्यांचे पती कोंडाजी चाबके यांना शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर पेन्शन देण्यास प्रशासन टाळाटाळ करीत असल्याने त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्येला परवानगी मागितली आहे. जर 1 नोव्हेंबरपर्यंत आपण तोडगा काढला नाही तर मी आत्महत्या करणार असल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांना स्मरण पत्राव्दारे कळविले आहे.

पतीच्या निवृत्तीनंतर प्रशासनाकडून पेन्शन देण्यास टाळाटाळ

पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील इंदगाव च्या 65 वर्षीय अंजनी चाबके यांचे पती कोंडाजी चाबके 17/12/1978 ला जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत जव्हार पंचायत समिती येथे शासकीय सेवेत रुजू झाले. 1978 ते 2007 पर्यंत ते शासकीय सेवेत त्यांनी काम केले त्यांनी स्थापत्य अभियांत्रिकी सहायक या पदावर होते. 2007 ला ते निवृत्त झाले. त्यांना पेन्शन मिळणे अपेक्षित असताना त्यांना शासनाकडून पेन्शन मिळाली नाही.

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्येला परवानगी देण्याची मागणी

2014 ला त्यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार होत असताना 14/08/2014 त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीने पेन्शन मिळण्यासाठी अनेक पत्रव्यवहार केले. मात्र त्यांच्या पदरी निराशाच पडली. अखेर त्यांनी 22/09/2021 ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांच्याकडे आत्महत्या करण्याची परवानगी मागितली. मुख्यमंत्री कार्यालयाकडून काहीही उत्तर आलं नसल्याने त्यांनी परत 24/10/2021 स्मरण पत्र पाठवून 1 नोव्हेंबरपर्यंत मला न्याय द्या, नाहीतर त्याच दिवशी मला आत्महत्या करायला परवानगी द्या, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

(Delay in payment of pension by the administration after the death of her husband Elderly woman seeks CM permission to commit suicide)

हे ही वाचा :

जे तीन वर्षात घडंल नाही ते यंदाच्या खरीपात लातूर विभागात पाहायला मिळालं…!

Petrol Price Today: इंधनाच्या दरात पुन्हा वाढ, पेट्रोल 121 रुपये, तर डिझेलने 112 रुपयांचा टप्पा ओलांडला

पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.