देवेंद्र फडणवीस माझे मित्र, मी त्यांना म्हणालो, काहीही करा पण पवार साहेबांचा नाद नाही करायचा !

धनंजय मुंडे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर खुमासदार शब्दात टीका केली. देवेंद्र फडणवीस माझे मित्र आहेत. काहीही करा पण पवारसाहेबांचा नाद नाही करायचा, असं मी त्यांना सांगितलंय असे मुंडे मिश्किलपणे म्हणाले.

देवेंद्र फडणवीस माझे मित्र, मी त्यांना म्हणालो, काहीही करा पण पवार साहेबांचा नाद नाही करायचा !
DHANANJAY MUNDE DEVENDRA FADNAVIS

अहमदनगर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे तसेच राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आज अहमदनगरच्या दौऱ्यावर होते. यावेळी धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत आमदार निलेश लंके यांच्या मतदारसंघातील विविध विकासकामांचं उद्घाटन झालं. या सोहळ्यात बोलताना धनंजय मुंडे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर खुमासदार शब्दात टीका केली. देवेंद्र फडणवीस माझे मित्र आहेत. काहीही करा पण पवार साहेबांचा नाद नाही करायचा, असं मी त्यांना सांगितलंय, असे मुंडे मिश्किलपणे म्हणाले.

काहीही करा पण शरद पवार यांचा नाद करु नका

शरद पवार यांनी माझ्यात काय पाहिलं ते मला माहिती नाही. मी निवडणुकीमध्ये पडलो तरी मला विरोधी पक्षनेतेपद दिलं. माझ्या घरातील लोकांना माझ्यामध्ये जे दिसलं नाही ते शरद पवार यांना दिसलं. लोक म्हणतात मराठा आरक्षण राष्ट्रवादीमुळे मिळालं नाही. पण शरद पवार यांनी 18 पगड जातीतील लोकांना एकत्र घेऊन काम केलं. मराठा, ओबीसी आरक्षण आता आलं. साक्षी पुरावे भाजपच्या काळात झाले. निकाल आमच्या काळात लागला. तरी दोष आम्हाला दिला जातो. देवेंद्र फडणवीस माझे मित्र आहेत. त्यांना मी म्हणालो होतो की काहीही करा पण शरद पवार यांचा नाद करु नका,” असे धनंजय मुंडे म्हणाले.

महाविकास आघाडी सरकार निधी कमी पडू देणार नाही

तसेच पुढे बोलताना त्यांनी मराठवाडा तसेच उत्तर माहराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीवर भाष्य केलं. “अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात मोठं नुकसान झालं. मात्र महाविकास आघाडी सरकार निधी कमी पडू देणार नाही. आम्ही शेकऱ्यांना मद्दत करू. विमा धोरणात सुधारणा करण्याची गरज आहे. त्यासाठी शिष्टमंडळाने दिल्लीत चर्चा करण्यासाठी जाणे गरजेचे आहे. विमा कंपन्यांकडे मनुष्यबळ नाही. विमा कंपनी दाद देत नसतील तर त्याच्यावर कारवाई करावी लागेल,” असे धनंजय मुंडे म्हणाले.

मी माणुसकी मेलेली पहिली आहे

तसेच कोरोना संसर्ग झाल्यानंतरच्या दुखद आठवणीसुद्धा मुंडे यांनी यावेळी सांगितल्या. “लंके यांच्यात अद्भुत शक्ती आहे. कोरोनाकाळात तुम्ही माणुसकी दाखवली. कोरोनाची पहिली आणि दुसरी लाट आली. यामध्ये मला कोरोना संसर्ग झाला. मला कोरोनाची लागण झाल्याचे रात्री बारा वाजता समजले. कोविडच्या संकटात मी माणुसकी मेलेली पहिली आहे. कोरोना होण्याआधी मी फिरत होतो, तेव्हा 50 लोक माझ्यासोबत असायची. मात्र कोरोना झाला तेव्हा मी एकटाच रुग्णवाहिकेमध्ये बसलो होतो. माझ्यासोबत कोणीच नव्हते, अशी वेदना धनंजय मुंडे यांनी बोलून दाखवली.

इतर बातम्या :

MI vs DC : मुंबईला धूळ चारत दिल्लीची प्लेऑफमध्ये दिमाखात एंट्री, रोहित अँड कंपनीचा मार्ग खडतर

त्यांच्या कथाकथनची महाराष्ट्रातलील जनतेला भुरळ, कथाकथनातील अस्सल मिरासदारी संपली, ज्येष्ठ लेखक द मा मिरासदार यांचं निधन

विधानसभा निवडणूक कधीही होवो, स्वबळावर जिंकण्यास भाजपा सज्ज, चंद्रकांत पाटलांचा दावा

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI