धुळ्यात थरार, पोलिसांनी मोठ्या शिताफीने गुटख्याची अवैध वाहतूक करणारी आयसर पकडली, दोघांना अटक

राज्यात गुटखाविक्रीस बंदी आहे. मात्र, तरीही काही ठिकाणी अवैधपणे गुटखा विक्री केली जाते (Dhule police seize illegal transport truck of Gutkha)

धुळ्यात थरार, पोलिसांनी मोठ्या शिताफीने गुटख्याची अवैध वाहतूक करणारी आयसर पकडली, दोघांना अटक
धुळ्यात थरार, पोलिसांनी मोठ्या शिताफीने गुटख्याची अवैध वाहतूक करणारी आयसर पकडली, दोघांना अटक

धुळे : राज्यात गुटखाविक्रीस बंदी आहे. मात्र, तरीही काही ठिकाणी अवैधपणे गुटखा विक्री केली जाते. धुळ्यात गुटख्याविरोधात पोलिसांची मोठी मोहिम सुरु आहे. या मोहिमेअंतर्गत अनेक अवैध गुटखा व्यवसायिकांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश येताना दिसत आहे. धुळ्यात नुकतंच पोलिसांनी मोठी कारवाई केली. अवैध गुटख्याची वाहतूक करणारा एक भलामोठा आयसर ट्रक पोलिसांनी पकडला. या ट्रकमध्ये गुटख्याचा मोठा साठा होता. पोलिसांनी हा संपूर्ण साठा जप्त केला आहे. तसेच गाडीतील दोघांना अटक केली आहे. धुळे पोलिसांच्या या कारवाईचं शहरात कौतुक होत आहे (Dhule police seize illegal transport truck of Gutkha).

धुळे पोलिसांनी कारवाई कशी केली?

धुळ्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना गुटखाची वाहतूक करणारे पांढऱ्या रंगाचे आयसर वाहन सुरत-नागपूर महामार्गावरून जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर अधिकाऱ्यांनी या गाडीवर कारवाई करण्याच्या सूचना धुळे शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना दिली. त्यानुसार सुरत-नागपूर बायपासवरील चक्कर बर्डी येथे गुजरातहून चाळीसगावकडे जाणाऱ्या आयसर गाडीला पोलिसांनी अडवले. या गाडीचा नंबर MP 09 GH 7686 असा होता.

दोघांना अटक

पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये भलामोठा गुटख्याचा साठा असल्यातं निदर्शनास आलं. त्यानंतर त्यांनी सर्व साठा जप्त करत गाडीतील दोघांना अटक केली. पोलिसांनी आयसर गाडी पोलीस स्टेशनला आणून त्यातील मालाची पडताळणी केली. तसेच मुद्देमालाची मोजणी करून गुटख्याची वाहतूक करणाऱ्या दोघांसह मालकावर वरिष्ठांच्या आदेशानुसार रात्री उशिरा गुन्हा दाखल केला.

पोलिसांच्या कामगिरीमुळे माफीयांचे धाबे दणाणले

दरम्यान, धुळे पोलिसांनी केलेल्या या कामगिरीमुळे गुटख्याची वाहतूक करणाऱ्या माफीयांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. सध्या जिल्हा पोलीस दलाच्यावतीने गुटख्याच्या विरोधात जोरदार मोहीम सुरु असून गेल्या 2 महिन्यांपासून गुटखाची वाहतूक करणाऱ्यांच्या मुसक्या आवळले जात आहे. तसेच याप्रकरणी अनेक गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत (Dhule police seize illegal transport truck of Gutkha).

संबंधित बातम्या : 

VIDEO | वाळू तपासणी पथकातील महिला तलाठ्यावर भाजप नगरसेवकाचा हल्ला

‘थांबलास तर कोयता आणि पळालास तर गोळी, नाक्यावर फक्त आबांची टोळी’ व्हाट्सअ‍ॅप स्टेटसवर हवा करणारे जेरबंद