AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: साखर कारखाना काढण्यावर बंदी आणली पाहिजे, गडकरींचे साखरसम्राटांना धक्क्यावर धक्के

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यातील साखर कारखान्यांना धक्क्यावर धक्के दिले आहेत. राज्यात साखर कारखाने काढण्यावर बंदी आणली पाहिजे, असं मोठं विधान नितीन गडकरी यांनी केलं आहे. (don't give permission for new sugar factory in india, says nitin gadkari)

VIDEO: साखर कारखाना काढण्यावर बंदी आणली पाहिजे, गडकरींचे साखरसम्राटांना धक्क्यावर धक्के
nitin gadkari
| Edited By: | Updated on: Oct 02, 2021 | 2:26 PM
Share

नगर: केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यातील साखर कारखान्यांना धक्क्यावर धक्के दिले आहेत. राज्यात साखर कारखाने काढण्यावर बंदी आणली पाहिजे, असं मोठं विधान नितीन गडकरी यांनी केलं आहे. तसेच हे विधान करण्यामागची कारणमिमांसाही त्यांनी केली आहे.

नितीन गडकरी यांनी नगरमध्ये विकास कामांचं भूमिपूजन केलं. नव्या घोषणाही केल्या. तसेच साखर सम्राटांना धक्क्यावर धक्केही दिले. आपल्या देशात 240 लाख टन साखरेची गरज आहे. मागच्या वर्षी आपण निर्मिती केली 310 लाख टन साखरेची. म्हणजे आपण 70 लाख टन साखर अधिक तयार केली. त्यामुळे मी म्हणतो महाराष्ट्राने आणि देशाने आता नवीन साखर कारखाने काढण्यास बंदी आणली पाहिजे. नाही तर परिस्थिीती खराब होईल. साखर कोणी घेतच नाही. हे अर्थचक्र जर उलटं फिरलं तर शेतकऱ्यांना परवडणार नाही, बँकाही डुबतील आणि कारखानेही बंद पडतील, अशी धोक्याची सूचनाही गडकरींनी दिली.

म्हणून साखरेत तेजी आली

ब्राझिलमध्ये दोन महिन्यापूर्वी 22 रुपये किलो साखरेचा भाव होता. आम्ही कमीत कमी 31 रुपये किलो साखरेचा भाव ठेवला होता. त्या कमिटीत मी सुद्धा आहे. आम्हाला साखरेचा भाव 2 रुपयांनी वाढवायचा होता, पण वाढवला नाही. कारण साखर महाग होईल असं सर्वांना वाटलं. पण आज मात्र ब्राझिलमध्ये साखरेचं उत्पादन कमी आहे. तिकडे दुष्काळ आहे. त्यामुळे दोन तीन महिन्यात साखरेत थोडी तेजी आली. त्यामुळे येणारी साखर जास्तीत जास्त निर्यात करणं आवश्यक आहे, असंही त्यांनी सांगितलं.

शेतकऱ्यांचं शोषण करू नका

मी नेहमी स्पष्ट बोलतो. मला साखर कारखानदारी समजल्यामुळे, मी मागच्या जन्मी पाप केल्यामुळे मी साखर कारखानदारीतून बाहेर पडलो आहे. लोकांच्या म्हणण्यानुसार मी तीन साखर कारखाने चालवत होतो. साखर कारखानदारीतून आपण बाहेर पडू शकतो. हे कसं शक्य होणार. आपण हे समजून घेतलं पाहिजे की शेतकरी जिवंत राहिले तर कारखाने जिवंत राहतील. कारखान्याची नरडी पकडून बंद करायचं ठरवलं अन् तुमचा ऊसच घेणारे टिकले नाही तर ऊस कुठं पिकवणार तुम्ही. त्यामुळे साखर कारखान्यांनी शेतकऱ्याचं शोषण करू नये, असं आवाहनही त्यांनी केलं.

ऊसापासून साखर हे सूत्र आता कमी करावं लागेल

अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे हजारो एक शेती पीक नष्ट झालं आहे. शेतकऱ्यांना वाटतं की आज खऱ्या अर्थानं आधार देणारं पीक हे ऊस आहे. सध्या एकच पीक घेण्याची प्रवृत्ती शेतकऱ्यांमध्ये वाढली आहे, ते पीक म्हणजे ऊस. अशावेळी ऊसापासून साखर हे सूत्र आता कमी करावं लागेल आणि इथेनॉल क्षेत्रात आपल्याला जावं लागेल. याबाबत गडकरी लक्ष घालतील अशी अपेक्षा असल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सांगितलं.

संबंधित बातम्या:

नगर जिल्ह्यासाठी तीन मोठ्या घोषणा, गडकरी मिष्किलपणे म्हणाले, असं वाटतं, मी महाराष्ट्राचा पीडब्ल्यूडी मिनिस्टर झालोय!

सुजय विखे म्हणाले, नगरला सर्वाधिक रस्ते मिळाले, गडकरी म्हणाले, ‘जिकडं जाईल तिकडचे असेच म्हणतात!’

प्रत्येक भाषणात नितीन गडकरी म्हणतात ऊसापासून इथेनॉल निर्मिती करा, आज पवारांनी त्याच्या पुढचा पर्याय गडकरींना सांगितला!

(don’t give permission for new sugar factory in india, says nitin gadkari)

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा.

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?.

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा.

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा

Ayesha Khan Detained : प्रसिद्ध अभिनेत्री आयेशा खान पोलिसांच्या ताब्यात, आंदोलनस्थळी आल्याने तातडीने कारवाई!.

Ayesha Khan Detained : प्रसिद्ध अभिनेत्री आयेशा खान पोलिसांच्या ताब्यात, आंदोलनस्थळी आल्याने तातडीने कारवाई!