हेल्थ ॲप्लिकेशनसारख्या सुविधा पोलिसांसाठी महत्त्वपूर्ण, अशा उपक्रमांना निधी मिळवून देऊ : यशोमती ठाकूर

पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी उपयुक्त ठरणाऱ्या चांगल्या उपक्रमांना शासनाकडून आर्थिक बळ मिळवून देण्यात येईल, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले.

हेल्थ ॲप्लिकेशनसारख्या सुविधा पोलिसांसाठी महत्त्वपूर्ण, अशा उपक्रमांना निधी मिळवून देऊ : यशोमती ठाकूर
Yashomati Thakur
Follow us
| Updated on: Jun 20, 2021 | 5:46 PM

अमरावती : कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल अहोरात्र कार्यरत असते. कोरोना काळातही त्यांनी जीवाची बाजी लावून अमूल्य योगदान दिले. अशा तणावपूर्ण आयुष्यात आरोग्य व मनाचा समतोल जपण्यासाठी योग- व्यायामाबरोबरच सकारात्मकता, तसेच ‘हेल्दी थिकिंग’ची आवश्यकता असते. त्यासाठी अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस हेल्थ ॲप्लिकेशन व इतर उपक्रम महत्वपूर्ण ठरतील. यापुढेही पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी उपयुक्त ठरणाऱ्या अशा चांगल्या उपक्रमांना शासनाकडून आर्थिक बळ मिळवून देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले. (Facilities like health application are important for police, we will provide funds for such activities: Yashomati Thakur)

जिल्हा ग्रामीण पोलीस दलातर्फे आशियाना क्लब, जोग क्रीडासंकुल, पोलीस अधीक्षक कार्यालय नूतनीकरण तसेच पोलीस हेल्थ ऍपचा शुभारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते आज झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव प्रभाकरराव वैद्य, पोलीस उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर मीना, पोलीस अधीक्षक डॉ. हरी बालाजी, श्वेता के. हरी बालाजी, अप्पर पोलीस अधीक्षक श्याम घुगे, डॉ. पद्माकर सोमवंशी, डॉ. चंद्रशेखर कुलकर्णी, डॉ. अनिल रोहणकर, डॉ. स्वप्नजा निंभोरकर, पोलीस उपअधीक्षक प्रदीप सूर्यवंशी, राखीव पोलीस निरीक्षक दीपक गेडाम आदी उपस्थित होते.

आशियाना क्लब येथे व्हीआयपी कक्ष, विश्राम कक्ष, पोलीस अधीक्षक कार्यालयात जलद प्रतिसाद पथक व दंगा नियंत्रण पथक, पुरुष व महिला बराक, ग्रामीण अधिकारी, अंमलदारांसाठी मेस, स्मृतीभवन, उपाहारगृह, तर जोग स्टेडियम येथे वॉकिंग ट्रॅक, बॅडमिंटन कोर्ट, व्हॉलीबॉल मैदान, लॉन टेनिस कोर्ट, कबड्डी मैदान, मंथन सभागृह, अन्नपूर्णा मेस, बॉईज बराक, 400 मीटर ट्रॅक, बॅडमिंटन कोर्ट आदी विविध सुविधांचा शुभारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते यावेळी झाला. श्वेता के. हरी बालाजी यांनी या सुविधांच्या नूतनीकरण व निर्मितीसाठी योगदान दिले आहे. दलासाठी 12 बलेरो व 18 बाईक या वाहनताफ्याचा शुभारंभही यावेळी झाला.

पालकमंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या की, जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस कर्मचाऱ्यांसाठी पोलीस हेल्थ ॲप, क्लब व क्रीडा संकुलात सभागृह, विश्राम कक्ष, उपाहारगृह, महिलांसाठी स्वतंत्र जीम अशा अनेक उत्तमोत्तम सुविधा निर्माण झाल्या आहेत. पोलीस अधीक्षक हरी बालाजी यांनी धडाडीने या सुविधा अंमलात आणल्या हे निश्चित वाखाणण्यासारखे आहे. यापूर्वीही रक्षादीपसारखा चांगला उपक्रम राबवला गेला. पोलीस कर्मचाऱ्यांवरील महत्वाच्या जबाबदाऱ्या, अविश्रांत काम व तणाव पाहता त्यांचे आरोग्य व मनोबल टिकवून ठेवण्यासाठी ॲपसह हे विविध उपक्रम उपयुक्त ठरतील. अशा अनेकविध उपक्रमांना पोलीस दलाने चालना द्यावी. चांगल्या कामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली. बालाजी यांनी कल्पकता व धडाडीने स्टेडियम, क्लब येथील सुविधांचे सौंदर्यीकरण करून त्यांचा दर्जा उंचावला, असे वैद्य यांनी सांगितले.

कसे आहे हेल्थ ॲप्लिकेशन?

ॲपमध्ये सर्व पोलीस कर्मचाऱ्यांच्या मेडिकल हिस्टरीची नोंद होणार असून, सर्वांच्या आरोग्याचा ताळेबंद निर्माण होणार आहे. त्यानुसार उपचार सुविधा, आरोग्य सल्ला देण्यात येणार आहे. फिजिशियन, सर्जन आदी तज्ज्ञांच्या मदतीने दक्षता, उपचार सुविधांबाबत मार्गदर्शन करणारे हे ॲप तयार करण्यात आले आहे. सकारात्मक जीवनशैली, मानसिक व्यवस्थापन, व्यायाम, योग याबाबतही ते मार्गदर्शक ठरणार आहे. इंग्रजी व मराठीत दोन्ही भाषांत ॲप उपलब्ध आहे, असे बालाजी यांनी प्रास्ताविकात सांगितले. निवेदिका क्षिप्रा मानकर यांनी सूत्रसंचालन केले. अप्पर पोलीस अधीक्षक श्याम घुगे यांनी यावेळी आभार मानले.

इतर बातम्या

प्रताप सरनाईकांनी लेटर लिहून ‘लहान तोंडी मोठा घास’ घेतला आहे का?; वाचा 5 मोठे मुद्दे

काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेना कमकुवत करतेय, भाजपशी जुळवून घ्या; प्रताप सरनाईक यांचा लेटरबॉम्ब

(Facilities like health application are important for police, we will provide funds for such activities: Yashomati Thakur)

Non Stop LIVE Update
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.