AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांना कंपन्यांनी फसवलं! पेरणी करूनही काहीच नाही उगवलं…अकोल्यात दुबार पेरणीचं मोठं संकट… मायबाप सरकार कारवाई करणार का?

Bogus Seeds Farmers: अकोला जिल्ह्यात सोयाबीन, तूर आणि कपाशी पेरलं पण साधा अंकूरही फुटला नाही. बियाणं बोगस असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट उभे ठाकले आहे. कंपन्यांवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांना कंपन्यांनी फसवलं! पेरणी करूनही काहीच नाही उगवलं...अकोल्यात दुबार पेरणीचं मोठं संकट... मायबाप सरकार कारवाई करणार का?
शेतकर्‍यांना कंपन्यांनी फसवलं! पेरणी करूनही काहीच नाही उगवलं
| Edited By: | Updated on: Jul 08, 2026 | 3:22 PM
Share

Bogus Seeds Farmers: अकोला जिल्ह्यातल्या तेल्हारा परिसरात सोयाबीन, तूर आणि कपाशी पेरली केली पण साधा अंकूरही फुटला नसल्याची परिस्थिती समोर आली आहे. यासाठी कारण ठरलंय पेरलेलं बियाणंचं निकृष्ट दर्जाचे असल्याचं. अनेक भागांमध्ये शेतकर्‍यांनी खरीप हंगामासाठी सोयाबीन, तूर आणि कपाशीची पेरणी केली. तर पेरणीनंतर 2 आठवड्यानंतरही अंकुर न फुटल्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडं तक्रारी केल्या आहेत. पण या प्रकारामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागतो. तर अनेकांनी कर्ज काढून बियाणं खरेदी केलं होतं. मात्र बियाणं उगवलंच नाही, त्यामुळे दुबार पेरणी करण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. तर यामुळे मजुरी, बियाणं, खते अशा सर्व गोष्टींवर दुहेरी खर्च होणार आहे.

विधिमंडळातही गाजला बोगस बियाण्यांचा मुद्दा

बियाणे न उगवल्याचा मुद्दा विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात देखील गाजलाय. बोगस बियाणे कंपन्यांवर तात्काळ कारवाई करीत विक्री थांबवण्यात यावी, आणि शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी भाजप आमदार हरिष पिंपळे यांनी विधानसभेत केली आहे.

या बियाणे कंपनीची विक्री थांबवा, आमदाराची मागणी

‘अंकुर सीड (चारू तूर)’, ‘न्यूझीलम व मंगलम सीड (कपाशी)’. ‘बूस्टर, इंगो, रवी, ओसवाल, केडियम, ग्रीन गोल्ड, एशियन ऍग्रो, आदित्य, बिंगर, ईगल’ या सर्व सोयाबीन बियाणे कंपन्यांच्या विक्रीवर तात्काळ बंदी घालण्याची मागणी आमदार पिंपळे यांनी केली आहे.

कंपन्यांवर कडक कारवाई करा

ज्या बियाण्यांमुळे शेतकर्‍यांचे नुकसान झाले, त्या दोषी कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून कडक कारवाई झालीच पाहिजे. आणि बियाणे न उगवलेल्या शेतांचे तातडीने शासकीय पंचनामे करण्यात यावेत. बाधित शेतकऱ्यांना बियाणे कंपन्या आणि शासनाकडून तात्काळ आर्थिक मदत व नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

सरकार बोगस कंपन्यांवर मकोका लावणार का?

अनेक भागात भिज पाऊस, रिमझिम, दमदार पावसाने हजेरी लावली आहे. शेती मशागतीला आणि पेरणीला वेग आला आहे. पावसामुळे शेतकऱ्यांनी बि-बियाणे, खते आणि इतर साहित्य खरेदीसाठी गर्दी केली आहे. तर बोगस बि-बियाणे, खतांच्या विक्रीचाही धोका वाढला आहे. सरकारने अनेकदा कारवाई करून, सक्त नियम करूनही शेतकऱ्यांची फसवणूक थांबलेली नाही. बोगस बि-बियाणे विक्रेत्यांवर कृषी विभागाकडून अर्थपूर्ण डोळे झाक होत असल्याची ओरड नेहमी होते. अशा बोगस बियाणे-खत विक्रेत्यांवर ‘मकोका’ लावा अशी मागणी उद्धव ठाकरे गटाचे आमदार प्रवीण स्वामी यांनी यापूर्वी विधानसभेत केलेली आहे. मकोका लागला तर अशा कंपन्यांना आणि विक्रेत्यांना चांगला दणका बसेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Follow Us
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक