AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Buldana Murder : आधी नवऱ्याला संपविले आता प्रियकराच्या बापाला, अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्याला दगडाने ठेचले, बुलडाण्यातील थरारक घटना

अनैतिक संबंधात नीलेशचे वडील अडथळा ठरत होते. त्यांचा काटा काढायचा हा विचार आरोपी लीलाबाईच्या मनात होता. तिने याबद्दल तिचा मित्र सागर मगर याला सोबत घेतले. खुनाचा कट रचला. काल संध्याकाळी सागरने दिनेश आराख यांना भरपूर दारू पाजली.

Buldana Murder : आधी नवऱ्याला संपविले आता प्रियकराच्या बापाला, अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्याला दगडाने ठेचले, बुलडाण्यातील थरारक घटना
अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्याला दगडाने ठेचलेImage Credit source: t v 9
| Edited By: | Updated on: Jul 11, 2022 | 3:00 PM
Share

बुलडाणा : प्रियकराचा (Boyfriend) बाप अनैतिक संबंधात अडसर ठरत होता. त्यामुळं 37 वर्षीय महिलेने मित्राची मदत घेतली. आपल्याच प्रियकराच्या बापाचा दगडाने ठेचून खून केला. घटना बुलडाणा शहरात काल सायंकाळी उघडकीस आलीय. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडालीय. पोलिसांनी खून करण्याऱ्या आरोपी महिलेला अटक केली. तिच्या मित्रालाही अटक करण्यात आली. दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल (The crime of murder) करण्यात आलाय. विशेष म्हणजे या महिलेवर यापूर्वीच स्वतःच्या नवऱ्याचा खून केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात ती जामिनावर बाहेर होती. दरम्यान तिचे एकासोबत प्रेमप्रकरण सुरू होते. पण, त्याचा बाप (Father) त्यांच्या अनैतिक संबंधात अडसर ठरत होता. त्यामुळं तीनं मित्राच्या मदतीनं प्रियकराच्या बापाचा काटा काढला. दगडाने ठेचून खून केला. यासाठी तिने मित्राच्या मदतीनं दिनेश आखाड यांना दारू पाचली. ते मद्यधुंद झाल्यानंतर त्यांच्यावर दगडाने वार करण्यात आले. जखमी अवस्थेत तसेच सोडून देण्यात आले. रुग्णालयात दिनेश यांचा मृत्यू झाला.

महिलेसोबत झाले होते भांडण

बुलडाणा शहरातील पुरभे ले-आऊट परिसरात काल दिनेश आराख हा गंभीर जखमी अवस्थेत सापडला होता. नागरिकांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केला. रात्री उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलीस तपासात दिनेश आराख याचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याचे समोर आले. यावेळी पोलिसांनी तपास करीत या खुनाचे गुढ उकलले. मृतक दिनेश यांना दोन मुले आहेत. यातील 23 वर्षीय नीलेश आराख याचे गायरान परिसरातील विधवा महिला लीला सरोकार हिच्याशी दोन महिन्यांपासून अनैतिक संबंध होते. या संबंधाची माहिती मृतक दिनेश आराख यांना कळली. माझ्या मुलाचे आयुष्य बरबाद करू नको, अशी समज त्यांनी त्या महिलेला दिली होती. दिनेश आराख यांचे महिलेसोबत भांडण झाले होते. त्यामुळे दिनेश आराखबद्दल महिलेच्या मनात प्रचंड राग होता.

आधी दारू पाजली मग दगडाने ठेचले

महिला आणि नीलेश यांच्यात अनैतिक संबंध सुरूच होते. दरम्यान, अनैतिक संबंधात नीलेशचे वडील अडथळा ठरत होते. त्यांचा काटा काढायचा हा विचार आरोपी लीलाबाईच्या मनात होता. तिने याबद्दल तिचा मित्र सागर मगर याला सोबत घेतले. खुनाचा कट रचला. काल संध्याकाळी सागरने दिनेश आराख यांना भरपूर दारू पाजली. दगडाने ठेचून त्याला फेकून दिले. याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. गोपनीय तपासाच्या आधारे वेगवान तपास केला. या खुनाचा छडा लावून आरोपी सागर मगर आणि लीलाबाई सरोजकार हिला अटक केलीय. अशी माहिती ठाणेदार प्रल्हाद काटकर यांनी दिली

कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.