AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Girish Mahajan : गिरीश महाजन यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता, पुणे पोलिसांची जळगावात छापेमारी, नेमकं प्रकरण काय?

पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात जळगावातील अ‌ॅड. विजय पाटील (Adv.Vijay Patil) यांच्या फिर्यादीवरून दाखल गुन्ह्यात भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Girish Mahajan : गिरीश महाजन यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता, पुणे पोलिसांची जळगावात छापेमारी, नेमकं प्रकरण काय?
गिरीश महाजन, भाजप आमदार
| Edited By: | Updated on: Jan 09, 2022 | 12:39 PM
Share

जळगाव: पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात जळगावातील अ‌ॅड. विजय पाटील (Adv.Vijay Patil) यांच्या फिर्यादीवरून दाखल गुन्ह्यात भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आज सकाळीच पुणे पोलिसांच्या (Pune Police) पथकाने जळगावात पाच ते सहा ठिकाणी छापेमारी केली आहे. त्यानंतर या प्रकरणातील मूळ फिर्यादी विजय पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. गिरीश महाजन हे या प्रकरणातील मूळ सूत्रधार असून त्यांच्यावर मोक्काची कारवाई होईलच, असा आपल्याला विश्वास असल्याची प्रतिक्रिया विजय पाटील यांनी दिली आहे. गिरीश महाजन यांना मराठा विद्या प्रसारक संस्था हडप करायची होती मात्र त्यांना तसं न करता आल्याने त्यांनी आपल्याला त्रास दिल्याचेही विजय पाटील यांनी सांगितले.

पुणे पोलिसांचे पथक जळगावात

पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल गंभीर गुन्ह्याच्या तपासासाठी पुणे पोलिसांचे पथक जळगावात दाखल झाले आहे.पुणे पोलिसांच्या पथकात सुमारे 60 ते 70 पोलिसांचा समावेश असल्याची माहिती आहे. जळगावात एकाच वेळी 5 ठिकाणी पुणे पोलिसांची छापेमारी असल्याचं कळतंय. जळगावातील अ‌ॅड. विजय पाटील यांनी दाखल केलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने पुणे पोलिसांनी छापेमारी केल्याची चर्चा सुरु आहे.

नेमकं प्रकरण काय?

जळगावच्या मराठा विद्याप्रासारक संस्थेशी निगडीत वादात दाखल गुन्ह्यावरून हे छापे टाकण्यात आल्याचं कळतंय. सुरुवातीला जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील निंभोरा पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. नंतर कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा वर्ग करण्यात आला आहे.

पोलीस अधिकाऱ्यांचा माहिती देण्यास नकार

पुणे पोलीस अधिकाऱ्यांनी तपासाबाबत माध्यमांना माहिती देण्यास नकार दिला आहे. अ‌ॅड. विजय पाटील यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आता आमदार गिरीश महाजन यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जळगावातील भोईटे कुटुंबीयांसह इतरांच्या घरी आज सकाळीच पुणे पोलिसांची कारवाई सुरू आहे, अशी माहिती आहे.

एकनाथ खडसेंचा टोला

मोक्का लावण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे त्या भीतीपोटी गिरीश महाजन यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण असा, टोला राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांना लगावला होता. माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे गिरीश भाऊ लवकर बरे व्हावेत. त्यांचं प्रकृती स्वास्थ्य चांगले राहावे त्यांची समाजाला महाराष्ट्राला गरज आहे मी प्रार्थना करणार आहे, असं एकनाथ खडसे म्हणाले होते.

इतर बातम्या:

Eknath Khadse | मोक्का लावण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने भीतीपोटी गिरीश महाजनांना कोरोनाची लागण-खडसे

Girish Mahajan : भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन कोरोना पॉझिटिव्ह, राजकीय नेते कोविडच्या विळख्यात

Girish Mahajan may face some problems Pune Police raids five or six places in Jalgaon in connection Maratha Vidya Prasarak Samaj Case

गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.