AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजितदादा, जयंत पाटील, मुनगंटीवार, विखे-पाटील आणि मला चित्रपटात भूमिका द्या, महाजन यांची सिनेनिर्मात्याला गळ; निर्मात्यानेही घेतली फिरकी

भाजप नेते गिरीश महाजन यांनी चक्क एका निर्मात्याला सिनेमात काम देण्याची गळच घातली. बरं एकट्यासाठी सिनेमात काम मागतील ते महाजन कसले? (girish mahajan says give us chance in movie)

अजितदादा, जयंत पाटील, मुनगंटीवार, विखे-पाटील आणि मला चित्रपटात भूमिका द्या, महाजन यांची सिनेनिर्मात्याला गळ; निर्मात्यानेही घेतली फिरकी
girish mahajan
| Edited By: | Updated on: Oct 16, 2021 | 12:21 PM
Share

जामनेर: भाजप नेते गिरीश महाजन यांनी चक्क एका निर्मात्याला सिनेमात काम देण्याची गळच घातली. बरं एकट्यासाठी सिनेमात काम मागतील ते महाजन कसले? महाजन यांनी चक्क उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील आणि राधाकृष्ण विखेपाटील यांनाही सिनेमात घेण्याची विनंती निर्मात्याला केली. तर तुमच्यासाठी तर इंग्रजी सिनेमाच बनवावा लागेल असं सांगून निर्मात्यानेही महाजन यांची विकेट घेतली. त्यामुळे एकच हशा पिकला.

जामनेर येथे ‘हलगट’ या सिनेमाच्या पोस्टरचे प्रमोशन माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी या चित्रपटाचे निर्माते बाबुराव घोंगडे यांनाच थेट गळ घातली. अजित पवार, सुधीर मुनगंट्टीवार, जयंत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील आणि माझी आता आमदारकीची सहा टर्म झाली आहे. त्यामुळे उद्या पक्षाने जर आम्हाला उमेदवारी दिली नाही तर आम्हाला चित्रपटात भूमिका दया, अशी मागणी महाजन यांनी एका चित्रपट निर्मत्याकडे केली. तीस वर्षे आमदारकीची झाली आहेत. पक्ष एकाच व्यक्तीला किती वेळा संधी देणार? त्यामुळे पक्षाने आम्हाला उमेदवारी नाही दिली आणि आम्ही रिटायर झालो तर भविष्यात आम्हालाही सिनेमात काम करण्याची संधी द्यावी, असं महाजन म्हणाले.

जामनेरच्या कलाकारांच्या मुख्य भूमिका

त्यानंतर चित्रपट निर्माते बाबुराव घोंगडे यांनीही षटकार ठोकला. तुमच्यासाठी इंग्रजी चित्रपट काढून त्यात काम करण्याची संधी देईन, असं घोंगडे यांनी म्हणताच एकच खसखस पिकली. जामनेर येथील बाबुराव घोंगडे यांनी ‘हलगट’ याचित्रपटाची निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात सर्व जामनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील कलाकारांनी भूमिका केल्या आहेत. हा चित्रपट लवकरच सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

सापाला जीवदान

दरम्यान, काही दिवसांपूर्वी महाजन यांनी एका सापाला जीवदान दिलं होतं. महाजन यांनी तब्बल पाच फूट लांबीचा साप पकडला. हा थरार उपस्थितांनी कॅमेरात कैद केला. महाजन हे जळगावातील जामनेर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार आहेत. फडणवीस सरकारमध्ये गिरीश महाजन यांनी मंत्रिपदही भूषवलं आहे. फडणवीस सरकार संकटात असताना महाजन अनेकदा ‘संकटमोचक’ ठरले आहेत. मंगळवारी महाजनांनी हीच भूमिका घेत सापालाही जीवदान दिले.

म्हणून महाजन लोकप्रिय झाले

महाजन हे जामनेरमध्ये प्रसिद्ध होण्यामागे आणखी एक कारण आहे. ते म्हणजे त्यांचा लोक संपर्क. कुणाचा अपघात झाला असेल तर धावून जाणे, कुणाच मृत्यू झाला असेल तर आधी त्या ठिकाणी पोहोचणे, जामनेरमध्ये मोटारसायकलवरून फिर, चहाच्या टपरीवर चहा घेता घेता लोकांशी गप्पा मार, कट्ट्यावर बसून तरुणांशी गप्पा मार, जयंती, धार्मिक उत्सवाच्या कार्यक्रमात सहभागी होणे, तरुणांबरोबर सार्वजनिक कार्यक्रमात ठेका धरणे आदी कारणांमुळे ते जामनेरमध्ये अधिक प्रसिद्ध आहेत.

संबंधित बातम्या:

ती लेडी डॉन कोण?, बॉलिवूड आणि तुमच्याशी कनेक्शन काय?; नवाब मलिक यांचा समीर वानखेडेंना सवाल

उद्धव ठाकरेंच्या मेव्हण्यांची बेनामी कंपन्यात गुंतवणूक?; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

फ्लेचर पटेलशी समीर वानखेडेंचा संबंध काय?, तीन केसेसमध्ये एकच पंच कसा?; नवाब मलिक यांचे सवाल

(girish mahajan says give us chance in movie)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.