विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही कोरोनाची धास्ती, नुकसान टाळण्यासाठी घरातच शिक्षणाचे धडे

विशेष म्हणजे गावातील मुलांचा अभ्यास बुडू नये आणि त्यांची सुरक्षितता बघता गावकरीही आपल्या घरात मुलांना शिकविण्यासाठी सहकार्य करीत आहेत.

विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही कोरोनाची धास्ती, नुकसान टाळण्यासाठी घरातच शिक्षणाचे धडे
school (फोटो प्रातनिधिक)

गोंदिया : अरे वा!!! घरात भरली शाळा!!! होय, आतापर्यंत आपण शिक्षणासाठी शाळेची प्रशस्त इमारत-पटांगण अशा बाबी शाळेबाबत बघितल्या आहेत. मात्र गोंदियात चक्क घरातच शाळा भरली आहे. गोंदिया जिल्ह्यात कोरोनाच्या भीतीने आपल्या पाल्यांना पालक शाळेत पाठवायला तयार नाहीत. त्यामुळे ग्राम सिरपूर येथे गावातील 7 घरांमध्येच शाळा भरवली जात आहे. या ठिकाणी शाळेप्रमाणेच शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत आहेत. या गावातील 131 विद्यार्थी यात शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. सिरपूर येथील हा आगळावेगळा उपक्रम सध्या परिसरात चर्चेचा चांगलाच विषय बनला आहे.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

गोंदिया जिल्ह्यात कोरोनाची लाट ओसरत आहे. सध्या अनेक ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात आली आहे. गोंदिया जिल्ह्यात आता मोजकेच सक्रीय रुग्ण उरले आहेत. गोंदियात परिस्थिती नियंत्रणात आलेली स्थिती बघता शासनाकडून आता शाळा उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र कोरोनाच्या भीतीने पालक आजही आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्यास राजी नाही. पण यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.़

गावातील 7 घरांमध्ये शाळा

मात्र यावर गोंदिया जिल्ह्यातील ग्राम सिरपूर येथील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी भन्नाट तोडगा काढला आहे. गोंदियातील शिक्षक गावातील 7 घरांमध्ये शाळा भरवत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टळत आहे.  गेल्या 1 जुलैपासून नियमितपणे 131 विद्यार्थी या शाळेत उपस्थिती नोंदवत आहेत. विशेष म्हणजे गावातील मुलांचा अभ्यास बुडू नये आणि त्यांची सुरक्षितता बघता गावकरीही आपल्या घरात मुलांना शिकविण्यासाठी सहकार्य करीत आहेत.

विद्यार्थी कोरोनापासून सुरक्षित

घरातील शाळा याअंतर्गत एका घरात 21 विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे.  या शाळांमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांचा सर्वच विषयांचा अभ्यास करवून घेत आहे. त्यामुळे आम्हालाही खूप आनंद होत असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली आहे. खास बाब म्हणजे, या उपक्रमामुळे विद्यार्थी कोरोनापासून सुरक्षित राहतात. त्यामुळे पालकही संकोच न करता आपल्या पाल्यांना शाळेत पाठवत आहेत.

सिरपूर येथील हा आगळावेगळा उपक्रम सध्या परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. त्यामुळे अन्य गावांतील नागरिकही असाच उपक्रम राबवण्याची मागणी करीत आहेत.

(Gondia teachers started school at house due to covid pandemic fear in children and parents)

संबंधित बातम्या :

Mumbai rains: मुंबईची तुंबई होऊ नये म्हणून 6 हजार कोटी खर्च, तरीही मुंबई पाण्यात; वाचा सविस्तर

VIDEO : Ashadhi Ekadashi 2021 | दुर्घटना टाळण्यासाठी मुळशी आपत्ती व्यवस्थापनाची बोट चंद्रभागेतीरी

Ashadhi Ekadashi 2021 | कुठे समुद्रकिनाऱ्यावर, तर कुठे विटेवर विठ्ठलाची प्रतिमा, कलाकारांच्या भक्तीचं आगळंवेगळं रुप

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI