सांगलीच्या पालकमंत्र्यांना सत्तेचा माज आणि मस्ती आलीय, गोपीचंद पडळकरांची जयंत पाटलांवर टीका

शंकर देवकुळे

शंकर देवकुळे | Edited By: Yuvraj Jadhav

Updated on: Oct 08, 2021 | 7:07 PM

खरं तर पालकमंत्री जयंत पाटील यांना सत्तेचा माज आणि मस्ती असल्याने ते नीट उत्तर देत नाहीत, अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. ते सांगली मध्ये जिल्हाधिकारी कार्यलय येथे बैठकी नंतर बोलत होते.

सांगलीच्या पालकमंत्र्यांना सत्तेचा माज आणि मस्ती आलीय, गोपीचंद पडळकरांची जयंत पाटलांवर टीका
गोपीचंद पडळकर, भाजप आमदार

सांगली: भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी आणि सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्यावर टीका केली आहे. सांगली जिल्हा नियोजन समिती मार्फत जिल्ह्यात किती पैसे खर्च झाले याची अद्याप ही माहिती दिली गेली नाही. तसेच बैठकीत एका आमदाराला एक, एका आमदाराला एक न्याय का असे विचारले असता. तर आम्ही बघतो पाहतो असे उत्तर पालकमंत्री देतात. खरं तर पालकमंत्री जयंत पाटील यांना सत्तेचा माज आणि मस्ती असल्याने ते नीट उत्तर देत नाहीत, अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. ते सांगली मध्ये जिल्हाधिकारी कार्यलय येथे बैठकी नंतर बोलत होते.

आज सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यलयात जिल्हा नियोजन बैठक झाली. या बैठकीत पालकमंत्री जयंत पाटील, विश्वजित कदम, खासदार आमदार शासकीय अधिकारी उपस्थित होते. महाआघाडीच्या नेत्यांना, आमदारांना विकास कामांसाठी जास्त पैसे दिले जात आहेत. मात्र, आम्हाला कमी दिले जातात, असं गोपीचंद पडळकर कडाडले. निधी देण्यात भेदभाव होत असल्याचा आरोप करत बैठकीतून पडळकर बाहेर निघून आले. पालकमंत्री आणि या मिटिंगचा गोपीचंद पडळकर यांनी निषेध केला आहे. जयंत पाटील हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांनी सर्वाना समान न्याय द्यायला हवा होता, असं पडळकर म्हणाले.

अजित पवारांच्या म्हणण्याला महत्व नाही, यंत्रणेकडं कागदपत्रं असणार

आयकर छाप्यांवरुन अजित पवार काय म्हणतात याला महत्व नाही. आता आमच्याकडे एजन्सी का छापा टाकत नाहीत. एजन्सीकडे काही कागदपत्रे असतील त्यामुळे छापा टाकला असेल, असा टोला पवार यांना पडळकर यांनी लगावला. महापुराची अद्याप अद्यापही काही ठिकाणी पैसे दिले गेले नाहीत. माझ्या आटपाडी तालुक्यातील साठ गावांना अद्याप मदत मिळाली नाही. शेतकरी आणि पूरग्रस्तांना लुटून पैसे खायचे आहेत, असा आरोप पडळकरांनी केला.

एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवा

एस. टी. कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवा अन्यथा तोंडावर आलेल्या दसरा, दिवाळी मध्येच एस टी कर्मचारी आंदोलन करतील. जनतेचे जे हाल होतील त्याला राज्य सरकार जबाबदार राहील. एस. टी. महामंडळामधील कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. एस.टी. कर्मचाऱ्यांचे प्रश्न लवकर सोडवा अन्यथा दिवाळी दसरा करून देणार नाही, असा इशारा राज्य सरकारला पडळकर यांनी दिला आहे.

इतर बातम्या:

‘बैलगाडा शर्यतीसाठी परवानगी द्या’, नितेश राणेंची मागणी, गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले, ‘वटहुकूम काढणार’

‘जनाब संजय राऊत MIM की मुहब्बत कौन है?’, गोपीचंद पडळकरांचा तिखट सवाल

Gopichand Padalkar slam Jayant Patil at sangli over fund gave to development works

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI