AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ambadas Danve: हा तर पाळलेला… गुणरत्न सदावर्तें यांच्यावर अंबादास दानवे यांची बोचरी टीका

Ambadas Danve on Gunaratna Sadavarte: गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर जहरी टीका केली. या वादात त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना ओढले. त्यानंतर आज सकाळी आमदार रोहित पवार यांनी आणि उद्धव सेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

Ambadas Danve: हा तर पाळलेला... गुणरत्न सदावर्तें यांच्यावर अंबादास दानवे यांची बोचरी टीका
गुणरत्न सदावर्ते, अंबादास दानवे Image Credit source: एजन्सी
| Updated on: Sep 08, 2026 | 11:53 AM
Share

श्रीराम क्षीरसागर, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी: गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर जहरी टीका केली. त्यांचा बोलविता धनी शरद पवार असल्याचा आरोप केला. त्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. महाविकास आघाडीतून त्यांच्याविरोधात तोफ डागली जात आहे. पूर्व विदर्भाच्या दौर्‍यावर असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी सदावर्ते यांच्यावर सडकून टीका केली. तर धाराशिवमध्ये असताना उद्धव ठाकरे सेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी त्यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

सदावर्ते यांच्यावर जोरदार टीका

आमदार अंबादास दानवे यांची सदावर्ते वर सडकून टीका केली. तर गणेश उत्सव डीजे मुक्त व्हावेत, त्याचबरोबर पाऊस पडावा म्हणून तुळजाभवानीला साकडे घातले. सदावर्ते म्हणजे सत्ताधाऱ्यांनी आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पाळलेला एक श्वान म्हणायला काय हरकत नाही. कारण एसटीचे आंदोलन झालं त्यावेळेस उद्धव ठाकरे यांची सत्ता होती त्या आंदोलनावेळी ते शरद पवारांच्या घरात घुसले होते असा आरोप दानवे यांनी केला.

आताही सत्ता आली देवेंद्र फडणवीस यांची, मग आता का घरात बसलाय? उपोषणाला बसत नाही आता का त्यांचं थोबाड बंद पडलं? मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये हाच का समोर येतो, मी तर म्हणतो सरकारच याला पाठवत आहे, पाळलेला माणूस आहे हा अशी खरमरीत टीका दानवे यांनी सदावर्ते यांच्यावर केली.

युद्धपातळीवर निर्णय घ्यायला हवा

मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने युद्ध पातळीवर निर्णय घेणे गरजेचे आहे, असे मोठे वक्तव्य अंबादास दानवे यांनी केले. हा राज्याचा प्रश्न असताना एका कलेक्टरला जरांगे पाटला बरोबर चर्चेला पाठवले जात आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

गणेश उत्सव डीजे मुक्त करा

गणेश उत्सव डीजे मुक्त झाला पाहिजे, गणेश उत्सव ज्यावेळी लोकमान्य टिळकांनी सुरू केला. संस्कृती रक्षणासाठी सुरू केला. डीजे वर नाचण्यासाठी नाही. पारंपरिक वाद्याचा वापर करून गणेशोत्सव साजरा करावा, अशी मोठी मागणी सुद्धा त्यांनी केली.

पावसासाठी तुळजाभवानीला साकडे

पाऊस पडू दे तुळजाभवानीला आमदार अंबादास दानवे यांनी साकडे घातले. शेतकर्‍याचे पीक पूर्णपणे हातचे गेले आहे. त्यामुळे सध्याच्या घडीचा सगळ्यात महत्त्वाचा विषय पाऊस असल्यामुळे मी तुळजाभवानीला पाऊस पडावा म्हणून साकडे घातले असे ते म्हणाले. आमदार अंबादास दानवे यांनी आज तुळजापूर येथे तुळजाभवानीचे दर्शन घेतले.

Follow Us
मराठा आरक्षणावर मुनगंटीवारांचा मोठा दावा; खासदारांना काय केलं आवाहन?
Sudhir Mungantiwar | मराठा आरक्षणावर सुधीर मुनगंटीवारांचा मोठा दावा; खासदारांना काय केलं आवाहन?
बिनबुडाचं गाडगं... बिना पेंदे का लोटा! सदावर्तेंनी जरांगेंना डिवचलं
बिनबुडाचं गाडगं... बिना पेंदे का लोटा! गुणरत्न सदावर्तेंनी जरांगेंना डिवचलं
नरेंद्र मोदी हे गुजरातचे पंतप्रधान आहेत का? संजय राऊतांचा थेट सवाल
Sanjay Raut | नरेंद्र मोदी हे गुजरातचे पंतप्रधान आहेत का? संजय राऊतांचा थेट सवाल; पुढे म्हणाले, देशाचे कॅबिनेट...
श्वेता महालेंना प्रत्युत्तर देताना संजय गायकवाडांची जीभ घसरली! म्हणाले
Sanjay Gaikwad | श्वेता महालेंना प्रत्युत्तर देताना संजय गायकवाडांची जीभ घसरली! म्हणाले...
रात्री 2 वाजेपर्यंत वर्षा बंगल्यावर खलबतं! मराठा आरक्षणावर सरकारची...
Maratha Reservation | रात्री 2 वाजेपर्यंत वर्षा बंगल्यावर खलबतं! मराठा आरक्षणावर सरकारची महत्त्वाची बैठक; फडणवीसांसह...
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा