कोरोनाच्या संकटात जीवावर उदार होऊन काम, आता धुळ्यात कोविड योद्ध्यांवर उपोषणाची वेळ

धुळ्यात ठेका पध्दतीने सेवा बजावणाऱ्या या कर्मचाऱ्यांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयाने कामावरुन कमी केलं. त्यामुळे या कोविड योद्ध्यांवर समायोजनासाठी गेल्या 5 दिवसांपासून आमरण उपोषण करण्याची वेळ आलीय.

कोरोनाच्या संकटात जीवावर उदार होऊन काम, आता धुळ्यात कोविड योद्ध्यांवर उपोषणाची वेळ
Follow us
| Updated on: Aug 14, 2021 | 8:09 PM

धुळे : कोरोना महामारीच्या कठीण काळात जीवावर उदार होऊन अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपलं कर्तव्य पार पाडलं. मात्र, धुळ्यात ठेका पध्दतीने सेवा बजावणाऱ्या या कर्मचाऱ्यांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयाने कामावरुन कमी केलं. त्यामुळे या कोविड योद्ध्यांवर समायोजनासाठी गेल्या 5 दिवसांपासून आमरण उपोषण करण्याची वेळ आलीय.

“आमच्या जीवाचे बरेवाईट झाल्यास याला प्रशासन जबाबदार”

या कर्मचाऱ्यांच्या आमरण उपोषणाचा आज (14 ऑगस्ट) पाचवा दिवस उजाडला आहे. कुठल्याही प्रशासनाच्या अधिकारी पदाधिकाऱ्यांनी या उपोषणकर्त्यांची दखल न घेतल्याने आणि त्यांची तब्येत देखील खालावली आहे. त्यामुळे आमच्या जीवाचे बरेवाईट झाल्यास याला प्रशासन जबाबदार राहील असल्याचा इशारा देखील या उपोषणकर्त्यांनी दिला आहे.

“कोरोना काळात 250 रुपये प्रतिदिन रोजंदारीने काम”

हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात कोरोना महामारीच्या काळात 7 मार्च 2020 ते 1 ऑगस्ट 2021 या कालावधीत 250 रुपये प्रतिदिन या रोजंदारी पध्दतीने कामगार म्हणून 70 जण काम करत होते. ज्या काळात बाधितांच्या जवळ त्यांचे जवळचे नातेवाईक जायला घाबरत. अशावेळी जीवाची पर्वा न करता या कामगारांनी सेवा बजावली. असं असताना शासनाने 1 ऑगस्टपासून आम्हाला कामावरुन कमी केले आहे. त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे, असं मत उपोषणकर्त्यांनी व्यक्त केलंय.

“अद्याप कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्याकडून उपोषणकर्त्यांची भेट नाही”

सद्यस्थितीत कोरोनाचा धोका कमी झालेला नसून तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. हिरेमध्ये या कामासाठी 150 कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. कामावरुन काढून टाकणे हा अन्याय आहे. बिकट परिस्थितीत काम केले म्हणून शासनाने कोविड योध्दाची पदवी दिली. मात्र, दुसरीकडे कामावरुन काढून टाकले. त्यामुळे आम्हाला तात्काळ भरती करून घ्यावे, अशी मागणी कामगारांनी केली आहे. या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस असून अनेकांची प्रकृती खालावली आहे. मात्र, अद्यापही प्रशासनाचा कुठलाही अधिकारी या ठिकाणी आले नाही. त्यामुळे आमच्या जीविताचे बरेवाईट झाल्यास प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा या कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

हेही वाचा :

आनंदाची बातमी, महाराष्ट्रातील ‘हा’ जिल्हा कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर

ट्रॅव्हल्स कंपनीच्या दोघा कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ला, डोक्यात फरशी टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न

VIDEO: गाईनं घर पोसलं, धुळ्यात सर्पदंशाने मृत्यू झाल्यानं शेतकऱ्याकडून माणसाप्रमाणे वाजतगाजत अंत्ययात्रा

व्हिडीओ पाहा :

Health worker fast and protest in Dhule for job demand

Non Stop LIVE Update
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.