Chandrapur Crime : चंद्रपुरातील दारुड्याची करामत लई भारी, पोलिसांच्या हेल्पलाईन गाडीला त्यांच्या नजरेसमोर किक मारून पळविले

ड्रंक अँड ड्राईव्हमध्ये दारुड्याला अटक करण्यात आली. त्याला वरोरा पोलिसांनी ठाण्यात आणले. तिथं त्यानं माझी गाडी परत करा म्हणून धिंगाणा घातला.

Chandrapur Crime : चंद्रपुरातील दारुड्याची करामत लई भारी, पोलिसांच्या हेल्पलाईन गाडीला त्यांच्या नजरेसमोर किक मारून पळविले
पोलिसांच्या हेल्पलाईन गाडीला किक मारून पळविले Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Jul 10, 2022 | 9:23 PM

चंद्रपूर : दारुडा व्यक्ती दारुच्या नशेत काय करेल, काही सांगता येत नाही. चंद्रपुरात दारुड्याने चक्क पोलिसांची गाडी पळवली. चोराला पकडणाऱ्या पोलिसाची गाडी पळविल्यानं हा दारुडा आता चर्चेत आला. पोलिसाची गाडी पळविणार कोण हा दारुड्या बघूयात. हा धक्कादायक प्रकार वरोरा पोलीस (Warora Police) ठाण्यातील हद्दीत घडला. राकेश नामेवार (Rakesh Namewar) (25) असं या पोलिसांची गाडी पळवून नेणाऱ्या दारुड्याचे नाव आहे. काल रात्री ड्रंक अँड ड्राईव्ह (drunk and drive) प्रकरणी त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले. आरोपीने त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये माझी गाडी परत द्या म्हणून खूप गोंधळ घातला. त्यानंतर नजर चुकवून आरोपीने पोलिसांची 112 ही हेल्पलाईन गाडी सेल्फ मारून पळवून नेली.

बॅरिकेट्सही उडविले

तातडीने पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. आरोपीने गाडी पळवून नेताना आनंदवन चौकातील बॅरिकेट देखील उडविले. त्यानंतर या दारुड्याला मोठ्या प्रयत्नानंतर पोलिसांनी येनसा या ठिकाणी अडवून ताब्यात घेतले. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांची टीम तिथं हजर होती. तरीही या दारुड्यानं पोलिसांच्या डोळ्यात अंजण टाकून गाडी पळवलीच कशी, अशा प्रश्न विचारला जात आहे. पोलीस स्वतःच्यात गाडीचे रक्षण करू शकत नाही. मग, दुसऱ्याच्या गाड्यांना शोधण्याची जबाबदारी किती सक्षमपणे पार पाडत असतील.

नेमकं काय घडलं?

ड्रंक अँड ड्राईव्हमध्ये दारुड्याला अटक करण्यात आली. त्याला वरोरा पोलिसांनी ठाण्यात आणले. तिथं त्यानं माझी गाडी परत करा म्हणून धिंगाणा घातला. पण, पोलिसांनी त्याच्याकडं दुर्लक्ष केलं. हा दारुच्या नशेत काहीतरी बडबड करत असेल, असं पोलिसांना वाटलं. पण, हा दारुडा चालाख निघाला. त्यानं चक्क पोलिसांच्याच ठेवलेल्या गाडीला किक मारून पळाला. विशेष म्हणजे त्यानं एका बॅरिक्टेसला धडकही दिली. त्यानंतर पोलिसांची धावाधाव सुरू झाली. पोलिसांनी या दारुड्याचा पाठलाग केला. त्याला अटक करण्यात आली. या दारुड्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.