वारंवार आवाहन करुनही लोक विनाकारण घराबाहेर पडतायत, याची किंमत मोजावी लागेल: जयंत पाटील

दुसऱ्या लाटेत अनेक रुग्णांना व्हेंटिलेटवर लावण्याची वेळ आली, ही गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे. | Jayant Patil Coronavirus

वारंवार आवाहन करुनही लोक विनाकारण घराबाहेर पडतायत, याची किंमत मोजावी लागेल: जयंत पाटील
जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस
Follow us
| Updated on: May 01, 2021 | 11:18 AM

सांगली: कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी विनाकारण बाहेर पडू नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वारंवार लोकांना करत आहेत. मात्र, तरीही अनेक लोक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. याची किंमत त्यांना मोजावी लागेल, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केले. (NCP leader Jayant Patil warns people about Coronavirus situation)

ते शनिवारी सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अजूनही खबरदारी घेण्याची गरज असल्याचे म्हटले. कोरोनाची दुसरी लाट सुरु आहे. कोरोनापासून बचावासाठी व्यवस्था अधिक उत्तम करण्यात येईल. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेलाही आपल्याला तोंड देता आले पाहिजे. दुसऱ्या लाटेत अनेक रुग्णांना व्हेंटिलेटवर लावण्याची वेळ आली, ही गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे. त्यामुळे कोरोनाची लाट परतवून लावण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची गरज आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले.

Corona Cases India | देशात चार लाखांहून अधिक नवे कोरोना रुग्ण, एका दिवसात 3 हजार 523 कोरोनाबळी

जास्तीत जास्त लसी उपलब्ध करून देणे, हेच राज्य सरकारचे धोरण

राज्यातील नागरिकांना जास्तीत जास्त लसी उपलब्ध करुन देणे, हेच सरकारचे धोरण असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. अनेक केंद्रांवर लसी कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. यामधून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. रेमडेसिविर इंजेक्शनचा काळा बाजार होत आहे. मात्र, एका डॉक्टरांमुळे सर्वच डॉक्टर दोषी आहेत, असे मानण्यात अर्थ नाही. दोषी डॉक्टरांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन जयंत पाटील यांनी दिले.

जुलै-ऑगस्टदरम्यान कोरोनाची नवी लाट येणार?

देशात जुलै आणि ऑगस्टदरम्यान करोनाचा संसर्ग टिपेला जाईल, असा अंदाज काही तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. या अंदाजांबाबत आम्ही गंभीर नाही. कारण तोपर्यंत देशातील संसर्गाची लाट ओसरलेली असेल. पण पूर्वीसारखे करोनाचे कमी रुग्ण आढळून येत राहतील आणि स्थिती नियंत्रणात असेल, असे विद्यासागर म्हणाले. यादरम्यान करोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात येतील. पण आपण काळजी घेतल्यास ही संख्या दिवसेंदिवस कमी होईल. संबंधित बातम्या:

देशातील कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय समिती स्थापन करावी: संजय राऊत

Coronavirus India : येत्या दोन-तीन दिवसांत देशातील कोरोना संसर्ग शिगेला पोहोचणार; शास्त्रज्ञांचा अंदाज

लसींचा ‘तो’ साठा भारतासाठीच वापरला असता तर आज ही वेळ ओढावली नसती; अजितदादांचा केंद्राला टोला

(NCP leader Jayant Patil warns people about Coronavirus situation)

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.