ओबीसींच्या नेतृत्व संपवणारा भाजपच आज ओबीसींच्या बाजुने गळा काढतोय : जयंत पाटील

"ओबीसींच्या नेतृत्वाला संपवण्याचे काम भाजपने केले तेच आज ओबीसींच्या बाजुने गळा काढत आहेत. याच्यासारखा विरोधाभास नाही," अशा शब्दात जयंत पाटील यांनी भाजपवर टिकास्र सोडले.

ओबीसींच्या नेतृत्व संपवणारा भाजपच आज ओबीसींच्या बाजुने गळा काढतोय : जयंत पाटील
jayant patil
Follow us
| Updated on: Jun 27, 2021 | 3:46 AM

लातूर : “ओबीसींच्या नेतृत्वाला संपवण्याचे काम भाजपने केले तेच आज ओबीसींच्या बाजुने गळा काढत आहेत. याच्यासारखा विरोधाभास नाही,” अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपवर टिकास्र सोडले. लातूर जिल्ह्यातील शिरुर अनंतपाळ येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर जयंत पाटील बोलत होते. आज (26 जून) भाजपचे नेते ओबीसी आरक्षणावर गळा काढून घोषणा देत आहेत. त्याच भाजपने ओबीसी नेते छगन भुजबळ यांना अडीच वर्षे तुरुंगात बसवले, तर दुसरीकडे एकनाथ खडसेंसारखा ओबीसी नेता घरी घालवण्याचे काम केले, असा घणाघाती आरोपही जयंत पाटील यांनी केला (Jayant Patil criticize BJP over OBC reservation protest).

“मोदी सरकारने 2011-12 ची सामाजिक आर्थिक सर्वेक्षणाची आकडेवारी जाहीर केली नाही”

जयंत पाटील म्हणाले, “ओबीसी आरक्षणाबाबत आमचे नेते छगन भुजबळ यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. 2011-12 मध्ये ग्रामविकास मंत्री असताना सामाजिक आणि आर्थिक सर्वेक्षण करण्यात आले होते. त्याची आकडेवारी दिल्लीला पाठवलेली होती. त्याचे एकत्रीकरण करून 2014-15 मध्ये जाहीर व्हायला पाहिजे होते. ती आकडेवारी जाहीर न झाल्यामुळे सुप्रीम कोर्टाने वारंवार मागणी करूनही आकडेवारी देण्यात आली नाही. त्यामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षणावर गदा आली. मात्र आज भाजपचे नेते ओबीसी आरक्षणावर गळा काढून घोषणा देत आहेत.”

“ओबीसींचे राजकीय आरक्षण मिळवून देण्यासाठी जे जे शक्य ते करणार”

राष्ट्रवादी काँग्रेसचा ओबीसींचे राजकीय आरक्षण मिळवून देण्यासाठी जे जे करणे शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न आहे, अशी भूमिकाही जयंत पाटील यांनी स्पष्ट केली. आधुनिक जगात पहिल्यांदा आरक्षणाची कल्पना जगाच्या पाठीवर कुणी अस्तित्वात आणली असेल तर ती लोककल्याणकारी राजर्षी शाहू महाराज यांनी आणली, असं मत व्यक्त करत जयंत पाटील यांनी जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन केले. युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांनी दिलेल्या विकासकामांना लवकरच निधी देण्याची घोषणा करताना येणाऱ्या काळात निलंगा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा झेंडा फडकवण्याचे आवाहन जयंत पाटील यांनी केले.

यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे, आमदार व जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील, आमदार विक्रम काळे, मराठवाडा संपर्क प्रमुख जयसिंगराव गायकवाड, प्रदेश सरचिटणीस बसवराज नागराळकर, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा :

माझा मराठा आरक्षणाला नेहमीच पाठिंबा, फक्त कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता ते द्या : छगन भुजबळ

“छगन भुजबळांनी या वयात तरी खोटं बोलू नये, तुम्ही त्यावेळी जेलमध्ये होता”

बिंदू चौकात या, समोरासमोर चर्चा करु, चंद्रकांत पाटील यांचं चॅलेंज हसन मुश्रीफांनी स्वीकारलं!

व्हिडीओ पाहा :

Jayant Patil criticize BJP over OBC reservation protest

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.