अहमदनगर-साताऱ्यासह राज्यात अनेक ठिकाणी 15 ऑगस्टपासून निर्बंध शिथिल, काय सुरू-काय बंद?

राज्य सरकारने कोरोना निर्बंधांमध्ये काही प्रमाणात शिथिलता दिलीय. यानंतर आता अहमदनगर आणि सातारा जिल्ह्यात 15 ऑगस्टपासून निर्बंध शिथिल होण्याचा मार्ग मोकळा झालाय. दोन्ही जिल्ह्यातील जिल्हा प्रशासनाने याबाबत आदेश जारी केलेत.

अहमदनगर-साताऱ्यासह राज्यात अनेक ठिकाणी 15 ऑगस्टपासून निर्बंध शिथिल, काय सुरू-काय बंद?
काय आहेत ब्रेक द चेनच्या सुधारित मार्गदर्शक सूचना?

मुंबई : राज्य सरकारने कोरोना निर्बंधांमध्ये काही प्रमाणात शिथिलता दिलीय. यानंतर आता अहमदनगर आणि सातारा जिल्ह्यात 15 ऑगस्टपासून निर्बंध शिथिल होण्याचा मार्ग मोकळा झालाय. दोन्ही जिल्ह्यातील जिल्हा प्रशासनाने याबाबत आदेश जारी केलेत. त्यामुळे मागील मोठ्या काळापासून निर्बंधांचा सामना करावा लागल्यानं आर्थिक डबघाईला आलेल्या व्यावसायिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. निर्बंध कमी झाल्यानं व्यावसायाची घडी पुन्हा बसेल अशी आशा सर्वांनाच लागली आहे.

अहमदनगरमध्ये काय सुरू काय बंद?

 • सर्व दुकाने रात्री 10 पर्यंत सुरू ठेवण्यास मुभा
 • मात्र, दुकानदार आणि कर्मचाऱ्यांचे लसीकरण आवश्यक
 • हॉटेल आणि मॉलही रात्री 10 पर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरू ठेण्यास मुभा
 • मात्र, कर्मचारी आणि ग्राहकांनाही लसीकरण आवश्यक
 • व्यायामशाळा, सलूनलाही रात्री 10 पर्यंत मुभा
 • खुल्या प्रांगणातील विवाहाला 200 जणांना मुभा
 • मंगल कार्यालयात 50 टक्के उपस्थितीस परवानगी
 • चित्रपटगृह, नाट्यगृह बंदच राहणार
 • सर्व धार्मिक स्थळेही बंदच राहणार

साताऱ्यात काय सुरू काय बंद?

 • जिल्ह्यातील सर्व प्रकारची दुकाने रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी
 • उपहारगृहं देखील रात्री 10 पर्यंत सुरू ठेवता येणार
 • बंदिस्त कार्यालयातील विवाह सोहळ्यांसाठी 100 लोकांना परवानगी
 • सिनेमाग्रह व धार्मिक स्थळे अजूनही राहणार बंद

औरंगाबादच्या व्यावसायिकांमध्ये आनंदाचं वातावरण

राज्यातील निर्बंध शिथिल झाल्यानंतर औरंगाबाद शहरातील मंगल कार्यालय व्यवसायाला पुन्हा एकदा चालना मिळणार आहे. निर्बंध शिथिल झाल्याच्या पहिल्याच दिवशी औरंगाबाद शहरातील मंगल कार्यालयात बुकिंग सुरू झाली आहे. त्यामुळे मंगल कार्यालय व्यावसायिक आनंदित झालेत.

नाशिकमध्ये निर्बंध शिथिल झाल्यानंतर भाविकांची गर्दी

कोरोनाचे शिथिल होत असलेले निर्बंध आणि लागून आलेल्या सुट्ट्या यामुळे नाशिकच्या रामकुंड परिसरात भाविकांची गर्दी बघायला मिळते आहे. तब्बल दीड वर्षांपासून निर्मनुष्य असलेला रामकुंड परिसर भाविकांमुळे पुन्हा एकदा भरून गेला आहे. मात्र, येणाऱ्या भाविकांनी आणि इथे काम करणाऱ्या पुरोहितांनी देखील मास्क आणि सॅनिटायझरबाबत जागरूक राहावं, असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे.

हेही वाचा :

सोलापूरमध्ये ‘या’ 5 तालुक्यांमध्ये कडक लॉकडाऊन, व्यापाऱ्यांकडून घंटानाद आंदोलन

नाशिकमध्ये कोरोना डेल्टा व्हेरिएंटचा धोका, निर्बंधांच्या कडक अंमलबजावणीला सुरुवात

बारामतीमधील विकेंड लॉकडाऊन रद्द, दुकानं किती वेळ सुरू राहणार?

व्हिडीओ पाहा :

Know new restriction rules of Ahmednagar Satara and other district of Maharashtra

Published On - 9:28 am, Sat, 14 August 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI