सोलापूरमध्ये ‘या’ 5 तालुक्यांमध्ये कडक लॉकडाऊन, व्यापाऱ्यांकडून घंटानाद आंदोलन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी 13 ऑगस्टपासून अत्यावश्यक सेवा वगळून पंढरपूरसह 5 तालुक्यांमध्ये लॉकडाऊन करण्याचे आदेश काढले आहेत. याला व्यापाऱ्यांनी जोरदार विरोध केलाय. व्यापाऱ्यांनी विरोध करण्यासाठी पंढरपूर शहरात रस्त्यावर येत आज (10 ऑगस्ट) श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात घंटानाद आंदोलन केलं.

सोलापूरमध्ये 'या' 5 तालुक्यांमध्ये कडक लॉकडाऊन, व्यापाऱ्यांकडून घंटानाद आंदोलन
Follow us
| Updated on: Aug 10, 2021 | 2:17 PM

सोलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी 13 ऑगस्टपासून अत्यावश्यक सेवा वगळून पंढरपूरसह 5 तालुक्यांमध्ये लॉकडाऊन करण्याचे आदेश काढले आहेत. याला व्यापाऱ्यांनी जोरदार विरोध केलाय. व्यापाऱ्यांनी विरोध करण्यासाठी पंढरपूर शहरात रस्त्यावर येत आज (10 ऑगस्ट) श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात घंटानाद आंदोलन केलं. तसेच प्रदक्षिणा मारली.

व्यापाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्येही घंटानाद आंदोलन केलं. किमान यानंतर तरी सरकारला जाग यावी म्हणून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी आणि घंटानाद आंदोलन करत असल्याची भूमिका व्यापाऱ्यांनी मांडली. संतप्त व्यापाऱ्यांनी सलग 3 दिवस आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

व्यापाऱ्यांकडून सलग 3 दिवस वेगवेगळी आंदोलनं होणार

आंदोलक व्यापाऱ्यांकडून आज पहिल्या दिवशी घंटानाद आंदोलन करण्यात आलं. उद्या (11 ऑगस्ट) अर्धनग्न आंदोलन करण्यात येणार आहे. 13 ऑगस्टला मात्र लॉकडाऊनचे आदेश झुगारून सर्व व्यापारी आपआपली दुकाने उघडी ठेवणार आहेत. सोलापूर शहरातील लोकसंख्येच्या तुलनेत कोरोनाचे रुग्ण अत्यल्प असल्याचा दावा करत प्रशासनाने शहरावर लॉकडाऊन लादला असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केलाय.

दरम्यान, सोमवारीच (9 ऑगस्ट) सोलापूर जिल्ह्यातील 5 तालुक्यात 13 ऑगस्टपासून पुढील आदेश येईपर्यंत कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यातील माढा, माळशिरस, कसमाळा, सांगोला आणि पंढरपूर या तालुक्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जिल्ह्या प्रशासनानं हे नवे आदेश लागू केले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील या तालुक्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे कोरोना निर्बंधांबाबतच्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनीही या तालुक्यांचा उल्लेख करत कोरोना वाढीबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर जिल्हा प्रशासनानं रात्री हा आदेश काढला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील 5 तालुक्यात काय सुरु, काय बंद?

  • सोलापूर जिल्ह्यातील माढा, माळशिरस, करमाळा, सांगोला आणि पंढरपूर या तालुक्यात कडक निर्बंध
  • 13 ऑगस्टपासून अत्यावश्यक सेवांची दुकाने दुपारी 4 पर्यंतच सुरु राहणार आहेत.
  • अत्यावश्यक सेवांमध्ये नसलेली दुकानं पूर्णपणे बंद असतील
  • मेळावे, राजकीय, सामाजिक कार्यक्रमांवर बंदी असेल
  • विवाह सोहळ्यास 50 ऐवजी 25 लोकांना परवानगी असेल
  • अत्यावश्यक, वैद्यकीय सेवा वगळता इतर सर्वांसाठी पाच तालुक्यात संचारबंदी लागू
  • खासगी आणि सार्वजनिक, प्रवासी वाहतूक तसेच माल वाहतुक सुरू राहणार

हेही वाचा :

कोरोना नियम धाब्यावर, सोलापुरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत तुफान गर्दी

म्हशी पळवण्याचा कार्यक्रम महागात, कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 10 जणांविरोधात गुन्हा दाखल

तब्बल 11 वेळा निवडून येऊनही एसटीतून प्रवास करणारा अवलिया; वाचा, गणपतराव देशमुखांचे किस्से

व्हिडीओ पाहा :

Strict lockdown in 5 Taluka of Solapur district amid Corona Traders opposing

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.