सतेज पाटलांनी लाखो रुपयांचा मुद्रांक शुल्क बुडविला, त्यांचा राजीनामा घ्या, माजी महापौर सुनील कदम आक्रमक

कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या डीवायपी समूहाने 18 लाखांचा मुद्रांक बुडविला आहे, असा गंभीर आरोप माजी महापौर सुनील कदम यांनी केलाय. सरकारचं उत्पन्न बुडविणाऱ्या पालकमंत्र्यांनी अगोदर राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी महापौर सुनील कदम यांनी केली आहे.

सतेज पाटलांनी लाखो रुपयांचा मुद्रांक शुल्क बुडविला, त्यांचा राजीनामा घ्या, माजी महापौर सुनील कदम आक्रमक
सतेज पाटील, काँग्रेस नेते

कोल्हापूर : कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या डीवायपी समूहाने 18 लाखांचा मुद्रांक बुडविला आहे, असा गंभीर आरोप माजी महापौर सुनील कदम यांनी केलाय. सरकारचं उत्पन्न बुडविणाऱ्या पालकमंत्र्यांनी अगोदर राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी महापौर सुनील कदम यांनी केली आहे.

सतेज पाटलांनी लाखो रुपयांचा मुद्रांक शुल्क बुडविला, माजी महापौर सुनील कदम आक्रमक

वरिष्ठ पातळीवर तक्रार केल्यानंतर पालकमंत्र्यांना 54 लाखाच्या दंडाची नोटीस जिल्हाधिकार्‍यांनी दिली, असा दावा माजी महापौर कदम यांनी केला. तसंच दंडाची रक्कम सात दिवसात भरावी लागणार असल्याचंही नोटिसीत असल्याचं स्पष्ट आहे. याच्याही पुढे जाऊन पालकमंत्री पाटील यांनी पदाचा गैरवापर करत सयाजी हॉटेलची जागा शंभर रुपयांच्या स्टॅम् वर घेतल्याचा कदम यांनी गंभीर आरोप केला आहे.

पालकमंत्री सतेज पाटील यांनी पदाचा गैरवापर करून, दबाव आणून मुद्रांक शुल्क चुकवले. मुद्रांकशुल्क बुडवल्याप्रकरणी दरमहा 2 टक्के याप्रमाणे 2021अखेर एकूण 54 लाख रूपये वसुलीचा आदेश जिल्हा मुद्रांक अधिकाऱ्यांनी काढला आहे. सात दिवसात ही रक्कम भरण्याचे या आदेशात म्हटलं आहे.

माजी महापौर कदम काय म्हणाले?

पुण्यातील काकडे बिल्डरला कोल्हापुरातील शेतकरी संघाची जागा २७ कोटी ८७ लाख रुपयेला विकली होती. नंतर तीच जागा पालकमंत्री पाटील यांच्या ज्ञानशांती ऍग्रो फार्म्स लिमिटेड या कंपनीने विकत घेतली. या जागेच्या खरेदीदारांमधील, सहखरेदीदारांनी आपापसातील वाटणीपत्र करताना सरकारचे 18 लाख 22 हजार रूपयांचं मुद्रांकशुल्क बुडविले आहे. या संदर्भात तक्रार केल्यानंतर मुद्रांक अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी केली. चौकशीमध्ये पालकमंत्री पाटील यांनी सरकारची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे.

(Maharashtra kolhapur EX Mayor Sunil Kadam Serious Allegation Guirdian minister Satej patel)

हे ही वाचा :

अकोल्यात वंचितच्या सत्तेला धक्का; भाजपची महाविकास आघाडीला मदत, दाेन्ही सभापतीपदांची माळ गळ्यात!

जुही चावलाच्या एका चुकीमुळे आर्यनची आजची रात्र तुरुंगात? खरं कारण समोर

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI