VIDEO | पती पोलिस अधीक्षक, पत्नी ZP CEO, रत्नागिरीच्या ‘क्लास वन’ दाम्पत्याचा ‘वरचा क्लास’ डान्स

रत्नागिरी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग (Dr Mohit Kumar Garg) आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अर्थात सीईओ डॉ. इंदूराणी जाखड (Dr Indurani Jakhar) हे पती-पत्नी आहेत. त्यांनी चक्क पंजाबी गाण्यावर ठेका धरत रत्नागिरीकरांची मने जिंकली.

VIDEO | पती पोलिस अधीक्षक, पत्नी ZP CEO, रत्नागिरीच्या 'क्लास वन' दाम्पत्याचा 'वरचा क्लास' डान्स
Follow us
| Updated on: Dec 20, 2021 | 9:29 AM

रत्नागिरी : प्रशासनातील उच्च पदावर एकाच वेळी कार्यरत असणाऱ्या अधिकारी पती-पत्नींची उदाहरणं महाराष्ट्राला नवीन नाहीत. मनिषा आणि मिलिंद म्हैसकर हे आयएएस दाम्पत्य असो, किंवा औरंगाबादमधील आयपीएस अधिकारी मोक्षदा पाटील आणि आयएएस अधिकारी आस्तिक कुमार पांडेय हे जोडपे असो. रत्नागिरी जिल्ह्यातही अशाच प्रकारे एक दाम्पत्य प्रशासनातील दोन महत्त्वाची पदं सांभाळत आहेत. विशेष म्हणजे या जोडप्याने एकत्र केलेला बेफाम डान्स (Punjabi Song Viral Dance) सध्या कौतुकाचा विषय ठरत आहे.

कोण आहे हे दाम्पत्य?

रत्नागिरी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग (Dr Mohit Kumar Garg) आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अर्थात सीईओ डॉ. इंदूराणी जाखड (Dr Indurani Jakhar) हे पती-पत्नी आहेत. त्यांनी चक्क पंजाबी गाण्यावर ठेका धरत रत्नागिरीकरांची मने जिंकली. निमित्त होतं जिल्हा परिषदेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचं.

शनिवारी संध्याकाळी स्नेह संमेलनाच्या निमित्त कर्मचारी तसेच अधिकार्‍यांनी कला गुणांना वाव देण्यासाठी विविध कार्यक्रम सादर केले. यामध्ये एक नृत्य लक्षवेधी ठरलं, ते पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग आणि सीईओ डॉ. इंदूराणी जाखड यांचं. दोघांनी एका पंजाबी गाण्यावर नृत्य करत उपस्थितांची मने जिंकली. रत्नागिरी जिल्ह्याच्या प्रशासकीय इतिहासामध्ये प्रथमच असे क्लासवन अधिकारी नृत्यासाठी एकत्र आले.

पाहा व्हिडीओ :

कोण आहेत डॉ. मोहित कुमार गर्ग?

सप्टेंबर 2020 मध्ये डॉ. मोहित कुमार गर्ग यांची रत्नागिरी जिल्हा पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्याआधी दोन वर्ष ते गडचिरोलीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून सेवा बजावत होते. नक्षलग्रस्त भागात त्यांनी कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.

कोण आहेत डॉ. इंदूराणी जाखड?

मूळ हरियाणाच्या असलेल्या डॉ. इंदूराणी जाखड 2016 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. डॉ. इंदूराणी जाखड यांची एप्रिल 2021 मध्ये रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अर्थात सीईओ म्हणून वर्णी लागली. नागपूरला प्रोबेशन कालावधी पूर्ण केल्यानंतर त्या गडचिरोलीत सहाय्यक जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती झाल्या होत्या. तेथील जिल्हा परिषदेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरही त्यांनी काही महिने काम केले होते.

संबंधित बातम्या :

VIDEO | कोरोनाचा कहर थांबवण्यासाठी ‘लेडी सिंघम’ ॲक्शन मोडमध्ये, मोक्षदा पाटील उतरल्या रस्त्यावर

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.