AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुकाने 4 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा, सिनेमागृहे बंदच, जाणून घ्या जळगाव जिल्ह्यात नवे नियम काय ?

येथे नाट्यगृहे, सिनेमागृहे तसेच मल्टिप्लेक्स पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून इतर आस्थापनांवरदेखील विवध निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

दुकाने 4 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा, सिनेमागृहे बंदच, जाणून घ्या जळगाव जिल्ह्यात नवे नियम काय ?
काय आहेत ब्रेक द चेनच्या सुधारित मार्गदर्शक सूचना?
| Edited By: | Updated on: Jun 27, 2021 | 3:56 PM
Share

जळगाव : कोरोनाची दुसरी लाट सरली असली तरी निर्बंध शिथील केल्यामुळे आता राज्यातील काही जिल्ह्यांत रुग्णसंख्या पुन्हा वाढत असल्याचे दिसत आहे. तसेच उत्परिवर्तीत डेल्टा प्लस कोरोना विषाणूचा धोकासुद्धा वाढला आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन राज्य सरकार आता पुन्हा एकदा निर्बंध कडक करते आहे. याच पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातसुद्धा कोरोना प्रतिबंधक नियम कडक करण्यात आले आहेत. येथे नाट्यगृहे, सिनेमागृहे तसेच मल्टिप्लेक्स पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून इतर आस्थापनांवरदेखील विवध निर्बंध लागू करण्यात आले आहेत. (mall theater cinema hall will remain closed in Jalgaon district know all corona lockdown new rule latest update)

पाचपेक्षा अधिक ग्राहकांना प्रवेश नाही

जळगावात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व प्रकारची दुकाने व आस्थापना सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु ठेवता येणार आहेत. तसेच शनिवारी व रविवारी हे दुकाने पूर्णपणे बंद असतील. या काळात दुकानात 5 पेक्षा अधिक ग्राहकांना प्रवेश देता येणार नाही. तसेच दुकानाच्या दर्शनी भागात काच किंवा पारदर्शक शीट लावावी असे सांगण्यात आले आहे. सॅनिटायझेशनची व्यवस्था करण्याच्या सूचनाही प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत. या काळात अत्यावश्यक सेवा पूर्ण वेळ सुरु ठेवल्या जातील.

शॉपिंग मॉल, थिएटर्स, नाट्यगृह पूर्णपणे बंद

तसेच शॉपिंग मॉल, थिएटर्स, नाट्यगृह, सिंगल स्क्रिन मल्टिप्लेक्स हे पूर्णपणे बंद असतील. हॉटेल, रेस्टॉरंट व बार 50 टक्के ग्राहक क्षमतेसह सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 पर्यंत सुरु ठेवता येतील. तर दुपारी 4 ते रात्री 9 पर्यंत केवळ पार्सल सेवा उपलब्ध असेल. शनिवारी व रविवारी डायनिंग पूर्णपणे बंद असेल. या काळात केवळ पार्सल सेवा उपलब्ध असेल.

शासकीय कार्यालये हे नियमित वेळेत सुरु

सार्वजनिक ठिकाणं, मॉर्निंग वॉक, सायकलिंग दररोज सकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत सुरू असतील तर खासगी कार्यालये हेसुद्धा 50 टक्के क्षमतेसह दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु असतील. शासकीय कार्यालये हे नियमित वेळेत सुरु ठेवली जातील. या काळात 50 टक्के कर्मचारी उपस्थिती असेल.

जळगाव जिल्ह्यात आंतरजिल्हा प्रवास करता येईल. मात्र लेव्हल 5 मध्ये समावेश असणाऱ्या जिल्ह्यात प्रवासासाठी पोलिसांकडून ई-पास आवश्यक असेल.

जीम, सलून, ब्युटी पार्लर, स्पामध्ये 50 टक्के ग्राहक क्षमता

क्रीडा प्रकार, तत्सम स्पर्धा दररोज सकाळी 5 ते 9 दरम्यान सुरू राहतील. तर जीम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा तसेच वेलनेस सेंटर्स 50 टक्के ग्राहक क्षमतेसह दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु ठेवता येतील. या ठिकाणी एसी वापरण्यास मनाई असेल.

लग्न समारंभाला एका वेळी 50 लोकांना जमण्यास मुभा

सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रम हे 50 टक्के क्षमतेसह 2 तासांच्या आत पूर्ण करावे लागतील. सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत या कार्यक्रमांना वेळ असेल. लग्न समारंभाला एका वेळी 50 लोकांना उपस्थितीत राहता येईल. लग्नाची वेळ ही दुपारी 4 वाजेपर्यंत असेल. तर अंत्यविधीसाठी केवळ 20 लोकांना जमता येईल.

सर्व बैठका, ग्रामपंचायत व को. ऑपरेटिव्ह निवडणुका 50 टक्के क्षमतेसह घेण्यास मुभा आहे. तर सर्व बांधकामे दुपारी 4 वाजेपर्यंत करण्यास मुभा आहे.

शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस तसेच शैक्षणिक प्रशिक्षण संस्था बंद

ई- कॉमर्स सेवा दररोज सुरू असेल. तसेच सार्वजनिक वाहतूक ही 100 टक्के क्षमतेसह सुरू राहील. मालवाहतूकही सुरू असेल. मात्र, यावेळी मालवाहूतक करताना केवळ 3 व्यक्तींना प्रवासाची मुभा असेल. शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस तसेच शैक्षणिक प्रशिक्षण संस्था बंद असतील. या काळात ऑनलाईन व दूरस्थ प्रणालीने शिकवले जाईल.

इतर बातम्या :

शुभमंगल ऑनलाईन ! मुलगा सातासमुद्रापार, वडिलांचा पुढाकार, डोंबिवलीतून अनोख्या पद्धतीत विवाह

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका, पण नवी मुंबईत अनेक नागरीक लसीकरणापासून वंचित

कोरोना काळात नाशिकमधून 69 मुली घरातून पळाल्या, सोशल मीडियावरील मैत्रीतून पाऊल

(mall theater cinema hall will remain closed in Jalgaon district know all corona lockdown new rule latest update)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.