सरकारला स्वस्थ बसू देणार नाही, हसन मुश्रीफांची गर्जना, आघाडी सरकारची ‘ती’ चूकही मान्य!

त्यावेळी आमच्याकडून जी चूक झाली, तीच चूक भाजप सरकारकडूनही झाली. आयोग न नेमता आम्ही समिती नेमून आरक्षण दिलं ही आमची चूक होती, असं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी सांगितलं.

सरकारला स्वस्थ बसू देणार नाही, हसन मुश्रीफांची गर्जना, आघाडी सरकारची 'ती' चूकही मान्य!
Hasan Mushrif


कोल्हापूर : सर्वात आधी मराठा आरक्षण पृथ्वीराज चव्हाणांच्या (Prithviraj Chavan) काळात आघाडी सरकारने दिलं. त्यावेळी नारायण राणे (Narayan Rane) समिती नेमून मराठा आरक्षण (Maratha Reservation) देण्यात आलं. पण त्यावेळी आमच्याकडून जी चूक झाली, तीच चूक भाजप सरकारकडूनही झाली. आयोग न नेमता आम्ही समिती नेमून आरक्षण दिलं ही आमची चूक होती, त्यामुळेच हायकोर्टाने आरक्षण नाकारलं, असं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी सांगितलं. कोल्हापुरातील पहिल्या मराठा मोर्चात (Kolhapur Maratha Morcha) बोलताना त्यांनी ही जाहीर कबुली दिली. (Maratha Morcha Kolhapur Maharashtra Minister Hasan Mushrif said we will fulfill all demands)

हसन मुश्रीफ म्हणाले, “छत्रपती शाहू महाराजांची ही पुण्यभूमी आहे. जगाला समतेचा संदेश शाहू महाराजांनी दिला. रयतेसाठी खजिना रिता करणारे शाहू महाराज होते. मराठा समाज फक्त राजकीय आरक्षण मागत नाही. आम्ही जी चूक केली..तीच चूक युती सरकारनेही केली. आयोग न नेमता समिती नेमून आरक्षण दिलं”.

भाजपला विनंती, राजकारण करु नका

यावेळी हसन मुश्रीफांनी भाजपला राजकारण न करण्याची विनंती केली. मुश्रीफ म्हणाले, “भाजपला हात जोडून विनंती, राजकारण करु नका, मराठा आरक्षण टिकलं नाही म्हणता, पण कायदा नीट केला असता तर टिकला असता, त्यामुळे आता एकमेकांच्या चुकांकडे लक्ष न वेधता, मराठा समाजाच्या मागण्या कशा पूर्ण करता येतील यावर लक्ष केंद्रीत करु”

शासनाला स्वस्थ बसू देणार नाही

मराठा समाजाच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक आहे. सर्व विषय पूर्ण केल्याशिवाय शासनाला स्वस्थ बसू देणार नाही, ही ग्वाही मी देतो. मराठा आरक्षणाच्या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी वेळ द्या, हे सर्व प्रश्न सोडवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असं हसन मुश्रीफ म्हणाले.

मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी कालच यावर चर्चा केली. त्यांनी चर्चेसाठी कधीही तयार असल्याचं म्हटलं आहे. मराठा समाजाने संयम दाखवला आहे. या समाजाच्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय सरकारला आम्ही स्वतः स्वस्थ बसू देणार नाही, त्यासाठी वाटेल ती किंमत त्यासाठी मोजू, असं हसन मुश्रीफ यांनी सांगितलं.

VIDEO : हसन मुश्रीफ यांचं कोल्हापुरातील भाषण

संबंधित बातम्या 

Maratha Morcha Kolhapur Live : संभाजीराजे, उद्याच मुंबईला या, सतेज पाटलांचं निमंत्रण  

हाताला सलाईनची सुई, अंगात अशक्तपणा, तरीही शिवसेनेचा खासदार भर पावसात मराठा मोर्चात अग्रस्थानी!   

Maratha Morcha : शाहू महाराजांनी आरक्षणाची बीजं कशी पेरली?; वाचा, सविस्तर 

(Maratha Morcha Kolhapur Maharashtra Minister Hasan Mushrif said we will fulfill all demands)