हाताला सलाईनची सुई, अंगात अशक्तपणा, तरीही शिवसेनेचा खासदार भर पावसात मराठा मोर्चात अग्रस्थानी!

मराठा मोर्चात सहभागी होण्यासाठी अशक्तपणा असतानाही खासदार धैर्यशील माने सलाईन लावून सहभागी झाले.

हाताला सलाईनची सुई, अंगात अशक्तपणा, तरीही शिवसेनेचा खासदार भर पावसात मराठा मोर्चात अग्रस्थानी!
खासदार धैर्यशील माने
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अनिश बेंद्रे

Jun 16, 2021 | 11:41 AM

कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी यंदाचा पहिला मराठा मोर्चा कोल्हापुरात निघाला. खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांच्या नेतृत्त्वात हा मराठा मूक मोर्चा काढण्यात आला. कोल्हापुरातील हातकणंगले मतदारसंघातील शिवसेना खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यावेळी सलाईन लावून मराठा मोर्चात सहभागी झाले. महाराष्ट्रातील सर्व 48 खासदार आणि सर्व आमदारांनी एकत्र यावं आणि केंद्राला विशेष अधिवेशन घेण्यासाठी भाग पाडावं, असं आवाहन मानेंनी मोर्चाच्या सुरुवातीला भाषणातून केलं. (Shivsena MP Dhairyasheel Mane Particiapates in Maratha Morcha at Kolhapur with Saline)

अंगात अशक्तपणा, भर पावसातही सहभाग

खासदार धैर्यशील माने यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतरही अशक्तपणा असल्याने ते घरात उपचार घेत होते. 10 दिवसांपूर्वीच त्यांना डिस्चार्ज मिळाला. मात्र मराठा मोर्चात सहभागी होण्यासाठी प्रकृती नाजूक असतानाही ते सलाईन लावून सहभागी झाले. कोल्हापुरात आज जोरदार पाऊस कोसळत आहे. मोठ्या पावसातही हा मराठा मोर्चा निघत आहे. मानेही पावसाची पर्वा न करता मोर्चात सहभागी झाले.

“संभाजीराजे आणि प्रकाश आंबेडकरांनी रणशिंग फुंकलं”

“महाराष्ट्राला दिशा देण्यासाठी कोल्हापूरने एक पाऊल पुढे घेतलं. सर्व लोकप्रतिनिधींना एकत्र केलं. संभाजीराजे छत्रपती यांनी सर्वांना हाक दिली, प्रकाशजी आंबेडकर सुद्धा कोल्हापूमध्ये आले, हे पाऊल निश्चित पणे यशस्वी होतील. संभाजीराजे आणि प्रकाश आंबेडकरांनी रणशिंग फुंकलं आहे” असा विश्वास शिवसेना खासदार धैर्यशील माने यांनी व्यक्त केला.

“पंतप्रधान, राष्ट्रपतींनाही भेटेन”

“आरक्षण कोणामुळे थांबलं? आरक्षणाला कोणीच विरोध करत नसताना हा पेच सुटत का नाही? असे प्रश्न समाजाला पडले आहेत. महाराष्ट्रातील सर्व 48 खासदार आणि सर्व आमदारांनी एकत्र यावं आणि केंद्राला विशेष अधिवेशन घेण्यासाठी भाग पाडावं. मराठा आरक्षणासाठी मी लोकसभेत आवाज उठवेन, पंतप्रधान, राष्ट्रपतींनाही भेटेन” अशी ग्वाही खासदार धैर्यशील माने यांनी दिली.

“न्यायालयीन लढाईत बाजू व्यवस्थित मांडण्यासाठी समिती गठीत झाली आहे. महाराष्ट्राने नवीन मागास आयोगही नेमला. हा राज्याचा की केंद्राचा हा प्रश्न समाजाला आहे. एका बाजूला जनरेटा तयार होतोय, 48 खासदारांनी अधिवेशनाची मागणी करावी, लोकसभेचं अधिवेशन मराठा समाजासाठी झालं पाहिजे, राजेंनी संयमाने भूमिका घेतली आहे” असंही धैर्यशील माने म्हणाले.

सर्वपक्षीय नेते सहभागी

या मराठा मोर्चाला सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. काँग्रेस नेते आणि पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शिवसेना खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक यासारख्या सर्व आमदार-खासदारांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

Kolhapur Dhaiyasheel Mane Maratha Morcha

खासदार धैर्यशील माने

बेळगावात धैर्यशील मानेंचा सायकलवर प्रचार

निवडणूक आल्यावर विविध संकल्पना लढवत उमेदवार प्रचार करत असतात. जास्तीत जास्त मतदारांचे लक्ष वेधून घेत चर्चेत राहण्यासाठी उमेदवार प्रयत्नांची शिकस्त करत असतात. बेळगाव शहरात चक्क शिवसेना खासदार धैर्यशील माने यांनी आगळावेगळा प्रचार केला. विमान, चारचाकी, दुचाकी अशी वाहने वापरात असताना शिवसेनेचे हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने सायकलवर फिरत होते.

वक्तृत्वशैलीसाठी प्रसिद्ध

खासदार धैर्यशील माने हे वक्तृत्वशैलीसाठी राज्यभरात प्रसिद्ध आहेत. आपल्या तडफदार भाषणांनी धैर्यशील माने यांनी यापूर्वी अनेक सभा गाजवल्या आहेत. 2019 मध्ये दसऱ्याच्या मुहूर्तावर इस्लामपुरातील त्यांचं भाषण विशेष चर्चेत राहिलं होतं. कारण उभ्या पावसात धैर्यशील माने यांनी न थांबता भाषण केलं होतं. जोरदार पावसाला जणू धैर्यशील माने यांनी धारदार भाषणाने उत्तर दिलं होतं.

संबंधित बातम्या :

मराठा मोर्चाला सुरुवात, आंदोलनस्थळी आमदार-खासदारांची हजेरी

राजकारणातील नवा ‘कोल्हापुरी पॅटर्न’ दाखवणारे धैर्यशील माने शिवसेना प्रवक्तेपदापासून दूर

(Shivsena MP Dhairyasheel Mane Particiapates in Maratha Morcha at Kolhapur with Saline)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें