AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Miraj Kolhapur Passenger:मिरज-कोल्हापूर पॅसेंजर रेल्वे सेवा पुन्हा सुरु! प्रवाशांना मोठा दिलासा

मिरजेमधून दररोज नोकरी किंवा व्यवसायानिमित्त दैनंदिन कोल्हापूरला जाणाऱ्या-येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. पॅसेंजर बंद असल्याने सामान्य प्रवाशांची गैरसोय होत होती.

Miraj Kolhapur Passenger:मिरज-कोल्हापूर पॅसेंजर रेल्वे सेवा पुन्हा सुरु! प्रवाशांना मोठा दिलासा
अखेर पॅसेंजर प्रवाशांना मोठा दिलासाImage Credit source: Indian Rail Info
| Edited By: | Updated on: Apr 15, 2022 | 1:17 PM
Share

सांगली : कोरोनामुळे (Corona Pandemic) गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेल्या मिरज-कोल्हापूर पॅसेंजर रेल्वे (Miraj-Kolhapur Passenger Railway) पुन्हा सुरु करण्यात आली. यामुळे सांगलीसह कोल्हापुरातील (Passenger in Sangli And Kolhapur) प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळालाय. कोरोनामुळे ही पॅसेंजर रेल्वेसेवा बंद करण्यात आली होती. अखेर आता पुन्हा ही पॅसेंजर गाडी सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. शुक्रवारपासून (15 एप्रिलपासून) ही पॅसेंजर रेल्वेसेवा पुन्हा प्रवाशांच्या सेवेत रुजू झाली आहे. कोरोना काळात या गाडीची सेवा थांबवण्यात आल्यानंतर या भागातील लोकांसमोर प्रवासा मोठा प्रश्न उपस्थित झाला होता. दरम्यान, आता हळूहळू राज्यातील निर्बंध पुन्हा उठवण्यात आल्यानंतर पॅसेंजर सेवा कधी सुरु होते, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या एसटी संपाचा फटकाही ग्रामीण भागातील जनतेला बसत होता. अशातच आता मिरज-कोल्हापूर-मिरज रेल्वेसेवा सुरु झाल्यानं अनेक प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

पॅसेंजर बंद असल्यानं गैरसोय

दरम्यान कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतरही ही पॅसेंजर रेल्वेसेवा बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत होता. तसंच गेल्या काही महिन्यांपासून ग्रामीण भागातील एसटी बससेवाही कोलमडली होती. अशावेळी प्रवास करण्याचा हक्काचा पर्याय असलेली पॅसेंजरही बंद असल्यानं लोकांना मनस्तापाला सामोरं जावं लागलं होतं.

अखेर मागणी पूर्ण!

मिरजेमधून दररोज नोकरी किंवा व्यवसायानिमित्त दैनंदिन कोल्हापूरला जाणाऱ्या-येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. पॅसेंजर बंद असल्याने सामान्य प्रवाशांची गैरसोय होत होती. त्यामुळे कोल्हापूर-मिरज मार्गावर पॅसेंजर सुरु करण्याची मागणी जोर धरत होती. कोरोना निर्बंध शिथिल झाल्यानंतर रेल्वे सेवाही पूर्ववत झाल्या आहेत. त्यानंतर आता मध्य रेल्वे प्रशासनाने कोल्हापूर – मिरज मार्गावर पॅसेंजर रेल्वेही अखेर सुरु करण्याचा निर्णय घेतलाय. दरम्यान, आता कोल्हापूर-मिरज पँसेंजर सेवा सुरु केल्यानंतर आता मिरज-पंढरपूर मार्गावरही पॅसेंजर सुरु करण्याची मागणी जोर धरतेय.रज-कोल्हापूर पॅसेंजरचं वेळापत्रक

  1. मिरज-कोल्हापूर पॅसेंजर दररोज दुपारी 2.14 वाजता सुटेल.
  2. दुपारी 3.30 मिनिटांनी कोल्हापूरला पोहोचेल.
  3. कोल्हापूर-मिरज पॅसेंजर दररोज सकाळी 10.30 वाजता कोल्हारातून सुटेल.
  4. दुपारी 11.45 वाजता मिरज स्थानकात पोहोचेल.

इतर बातम्या

भजे घेण्यासाठी रेल्वेतून उतरला खाली अन् ट्रेन सुरु झाली! पुढे जे घडलं ते चांगलंच अंगलट आलं…

रेल्वे प्रवाशांना दमदाटी करून लुबाडणारे तिघे गजाआड, सीसीटीव्हीच्या आधारे अटक

Video : शेतकऱ्याने दिलं नाग-नागिनीच्या जोडीला जीवदान, परिसरात कौतुक…

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.