राज्यपालांचा नांदेड दौरा व्यापाऱ्यांच्या मुळावर, बंदोबस्ताच्या नावाखाली दुकाने बंद करण्याचे आदेश

राज्यपालांचा नांदेड दौरा व्यापाऱ्यांच्या मुळावर, बंदोबस्ताच्या नावाखाली दुकाने बंद करण्याचे आदेश
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (BhagatSinh Koshyari) आज नांदेडच्या दौऱ्यावर आहेत. मात्र राज्यपालांचा नांदेड दौरा हा व्यापाऱ्यांच्या मुळावर आल्याचे चित्र आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (BhagatSinh Koshyari) आज नांदेडच्या दौऱ्यावर आहेत. मात्र राज्यपालांचा नांदेड दौरा हा व्यापाऱ्यांच्या मुळावर आल्याचे चित्र आहे.

राजीव गिरी

| Edited By: Akshay Adhav

Aug 05, 2021 | 11:25 AM

नांदेड : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (BhagatSinh Koshyari) आज नांदेडच्या दौऱ्यावर आहेत. मात्र राज्यपालांचा नांदेड दौरा हा व्यापाऱ्यांच्या मुळावर आल्याचे चित्र आहे. बंदोबस्ताच्या नावाखाली पोलिसांनी अतिरेक करत राज्यपाल जाणाऱ्या रस्त्यावरची दुकाने बंद ठेवायला सांगितली आहेत.

सुरक्षेच्या नावाखाली पोलिसांचा अतिरेक

विशेषतः नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांचा अतिरेक जास्तच दिसून आलाय. पोलिसांनी रस्त्यावरच्या व्यापाऱ्यांना चार वाजेपर्यंत दुकाने बंद ठेवायला सांगितली आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केलाय.

राज्यपालांचा दौरा आमच्या मुळावर उठलाय, व्यापाऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

एकतर कोरोना आणि त्यात लॉकडाऊनमुळे आम्ही पुरते त्रस्त झालोय. परत त्यात दुकाने उघडी ठेवण्यासंदर्भात राज्य शासनाचे विविध नियम. अशा परिस्थितीत आज राज्यपालांचा दौरा होतोय. मात्र सुरक्षेच्या नावाखाली खरंच अतिरेक होतोय. राज्यपालांचा दौरा आमच्या मुळावर उठलाय, अशा प्रतिक्रिया नांदेडचे व्यापारी व्यक्त करत होते.

राज्यापालांचा नियोजित नांदेड दौरा, विविध कार्यक्रमांना हजेरी

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी येत्या 5 ऑगस्टला नांदेड दौऱ्यावर येणार आहेत. नांदेड विद्यापीठातील दोन नव्या वसतिगृहाचे उदघाटन राज्यपालांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यासाठी नांदेड विद्यापीठाने जय्यत तयारी केलीय. या दोन्ही नव्या वसतिगृहाचे काम अंतिम टप्प्यात आलेयत. मात्र, राज्यपालांच्या या दौऱ्यावर अल्पसंख्याक कल्याण मंत्री नवाब मलिक यांनी सवाल उपस्थित केलाय.

महाविकास आघाडीच्या विरोधानंतरही राज्यपालांचा दौरा, सगळ्याचंच लक्ष

आज नांदेड, उद्या हिंगोली आणि परवा परभणी असा त्यांचा दौरा असणार आहे. महाविकास आघाडीनं राज्यपालांच्या दौऱ्यावर नाराजी व्यक्त केल्यानंतरही दौरा होत असल्यानं त्यांच्या दौऱ्याकडे सगळ्यांच लक्ष लागलंय.

नवाब मलिक यांचा राज्यपालांना टोला

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हिंगोली, परभणी आणि नांदेडच्या दौऱ्यावर महाविकास आघाडीने आक्षेप घेतला आहे. राज्यपाल हे उत्तराखंडचे मुख्यमंत्री नाहीत तर ते राज्यपाल आहेत, हे त्यांनी समजून घ्यावं, असा टोला राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी लगावला आहे.

(nanded traders Aggressive governor BhagatSinh Koshyari nanded Tour)

हे ही वाचा :

राज्यात दोन वेगळी सत्ताकेंद्र निर्माण करण्याचं काम राज्यपालांकडून सुरु, नवाब मलिकांचा गंभीर आरोप

राज्यपालांच्या दौऱ्यावरुन राष्ट्रवादी आक्रमक, बैठक रद्द न केल्यास काळे झेंडे दाखवण्याचा इशारा

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें