चिपळूणमधील पूरग्रस्त व्यापाऱ्यांसाठी मदतीचे निकष बदला, राष्ट्रवादीच्या आमदाराची उद्धव ठाकरे, अजितदादांना विनंती

चिपळूणातील पुरग्रस्त व्यापाऱ्यांना मदतीचा दिलासा मिळणार आहे. मदतीसाठी निकष बदलण्यासाठी चिपळूणचे आमदार शेखर निकमांनी प्रयत्न सुरु केलेत. मदतीसाठी जाहीर झालेले निकष बदलण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आमदार निकम यांनी साकडं घातलंय.

चिपळूणमधील पूरग्रस्त व्यापाऱ्यांसाठी मदतीचे निकष बदला, राष्ट्रवादीच्या आमदाराची उद्धव ठाकरे, अजितदादांना विनंती
उद्धव ठाकरे, अजित पवार आणि शेखर निकम

चिपळूण : चिपळूणातील पुरग्रस्त व्यापाऱ्यांना मदतीचा दिलासा मिळणार आहे. मदतीसाठी निकष बदलण्यासाठी चिपळूणचे आमदार शेखर निकमांनी प्रयत्न सुरु केलेत. मदतीसाठी जाहीर झालेले निकष बदलण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आमदार निकम यांनी साकडं घातलंय.

मदतीचे निकष बदलण्यासाठी आमदार शेखर निकम यांचा पुढाकार

व्यापाऱ्यांना मदत मिळण्यासाठी शाॅपिंग अँक्टखाली रजिस्ट्रेशन आवश्यक आहे. मात्र छोट्या वापारी टपरीधारक किंवा औषध दुकानदार यांना हे रजिस्ट्रेशन नाही. त्यामुळे अशांना मदत मिळण्यासाठी आमदार शेखर निकम यांनी पुढाकार घेतलाय. शॉपिंग ऍक्ट खाली रजिस्ट्रेशन असलं पाहिजे हा निकष बदलण्याची आग्रही मागणी त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याकडे केलंय.

छोटे व्यापारी, टपरी धारक,औषध दुकानदार यांना या निकषाचा फायदा होणार आहे. पूरात व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. त्यात आर्थिक नुकसान हे मोठ्या प्रमाणावर होतं. या सगळ्या घटकांचा विचार करुन त्यांच्या फायद्याचा निर्णय घेतला जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी चिपळूण दौऱ्यात दिलं होतं.

जलसंपदा विभागाचा चिपळूणाची पूररेषा ठरवण्याचा घाट, आमदार शेखर निकम यांचा विरोध

चिपळूणात आलेल्या महापूरानंतर आता जलसंपदा विभागानं चिपळूणाची पूररेषा ठरवण्याचा घाट घातलाय. निळी आणि पिवळी रेषा आखत पूर रेषा निश्चित केली जातेय. मात्र जलसंपदा विभागाने घाटलेला घाट अमान्य असल्याची प्रतिक्रिया चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी दिलीय. सध्या चिपळूणच्या वाशिष्ठी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात गाळ आहे.

नदीपात्रातील गाळ काढून मगच पुररेषा निश्चित करावी, निळी आणि पिवळी पूर रेषा चिपळूणातील 95 टक्के बांधकामाला खो घालणारी आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांचा चिपळूणातील पूर रेषा ठरवण्याला विरोध केलाय.

मुख्यमंत्र्यांचा मदतीचा शब्द, अद्याप मदत नाही!

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी अनेक व्यापाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर व्यथा मांडल्या. पूर आला. त्यात आमचं मोठं नुकसान झालं. आमच्यावर कर्ज आहे. आम्हाला शेतकऱ्यांच्या धर्तीवर कर्जमाफी द्या. व्यापाऱ्यांना आयुष्यात एकदाच कर्जमाफी द्या. त्यानंतर आम्हाला दोन टक्क्याने कर्ज द्या. नंतर आम्ही सरकारकडे कधीही भीक मागणार नाही. तुम्हीच आमचे आईवडील आहात, आम्हाला जगवा, असा टाहोच एका व्यापाऱ्याने फोडला. त्यावर तुमच्या समस्यांवर मार्ग काढू, काळजी करु नका, असा शब्द मुख्यमंत्री दिला होता.

मुख्यमंत्र्यांची व्यापाऱ्यांशी चर्चा सुरू असतानाच एका महिलेने थेट मुख्यमंत्र्यांसमोर टाहो फोडला. ही महिला प्रचंड रडत होती. माझ्या घराच्या छतापर्यंत पाणी गेलं. होतं नव्हतं. सर्व गेलं. तुम्ही काहीही करा पण आम्हाला मदत करा. साहेब, तुम्हीच मदत करू शकता. मदत केल्याशिवाय जाऊ नका हो, असं ही महिला मोठमोठ्याने रडत सांगत होती. मुख्यमंत्र्यांनीही थांबून या महिलेसमोर हात जोडत तिला मदत करण्याचं आश्वासन दिलं.

(NCP MLA Shekhar Nikam efforts to help Chiplun flood hit traders)

हे ही वाचा :

VIDEO | चिपळूणमध्ये दुकानदारांसमोर उद्धव ठाकरेंनी हात जोडले, भास्कर जाधव म्हणाले, साहेब तुम्ही हात नका जोडू

साहेब, होतं नव्हतं सर्व गेलं, आम्हाला मदत केल्याशिवाय जाऊ नका; महिलेने फोडला मुख्यमंत्र्यांसमोरच टाहो

VIDEO: कुठलं सरकार? आता कुठं डिस्चार्ज झालाय घरातून, फिरताहेत; नारायण राणेंची मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI